Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी सोशल मीडियावर कमी किमतीत इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीच्या बहाण्याने हरयाणातील डॉक्टरची १७ लाख रुपयांत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी निखिल सुनीलकुमार मनवानी (२५, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) याला फरिदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, फरिदाबाद (हरयाणा) येथील डॉ. श्रीमंत गुईन हे सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी शोध घेत होते. त्यात त्यांचा भुसावळ येथील एका विक्रेत्याशी संपर्क साधला. मनीष शर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. गुईन यांना वस्तू देण्याच्या नावाखाली चार वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. या खात्यांमध्ये त्यांनी १७ लाख १० हजार १८० रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर कोणतीही वस्तू न देता टाळाटाळ…

Read More

रावेर : प्रतिनिधी गेल्या १० वर्षापूर्वी मुलाचा संसार उघड्यावर पडला. पहिल्या व दुसऱ्या नातवाची प्राणज्योत त्यांच्या बालपणीचं विझली. तिसरा नातू गोविंदा हा तरी वृद्धापकाळात आपली काठी ठरेल, ही आशा उराशी बाळगून असलेल्या आजोबांच्या आशेवरही क्रूर नियतीने पाणी फेरले. तिसरा नातू गोविंदाचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला आणि वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला. क्रूर नियतीच्या या क्रूर खेळाने वाघोडकर निःशब्द झाले आहेत. सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील वाघोड गावातील श्यामराव पाटील यांना चार मुले व मुलगी असा परिवार होता. सन १९८२ मध्ये पत्नीच्या अकाली मृत्यूनंतर एका मुलाचाही मृत्यू झाला. दरम्यान, त्यांचा मुलगा वामन पाटील याला भुवनेश्वर व हर्षल ही दोन मुले झाली.…

Read More

मेष राशी आज अचानक एखादा लांबचा प्रवास किंवा परदेश प्रवास घडू शकतो. न्यायालयीन प्रकरणांमध्ये वाद वाढू शकतात. धार्मिक कार्यांवरील श्रद्धा कमी होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात चढ-उतारांचा सामना करावा लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस खडतर जाऊ शकतो. वृषभ राशी आज तुम्हाला नोकरीत बढती तर होईलच पण महत्त्वाची जबाबदारी मिळेल. व्यवसायात नवीन सहकारी फायदेशीर ठरतील. राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला व्यवसायाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. तुम्हाला सरकारी सत्तेचा लाभ मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. मिथुन राशी आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल. कुटुंबात प्रेम आणि जवळीक वाढेल. आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. तब्येतीची चांगली काळजी घ्या. कर्क राशी…

Read More

जळगाव दि. २३ (जिमाका वृत्तसेवा) : सामान्य जनतेच्या अडचणी तत्काळ मार्गी लागाव्यात, यासाठी शासनातर्फे आयोजित करण्यात येणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिरे’ ही एक सकारात्मक आणि लोकाभिमुख पावले असून, प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावे, हा या उपक्रमामागील खरा उद्देश आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी (ता. धरणगाव) येथील शासकीय विश्रामगृहात महसूल विभागाच्या वतीने आयोजित शिबिरात विविध शासकीय योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला. शिबिरात शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गरजू नागरिक अशा सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शिबिरातील महत्त्वाचे उपक्रम व लाभ : शिबिरात एकूण ८८५ शासकीय दाखले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात खरीप हंगाम हे शेती क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, राज्यातील शेतकरी हा हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतो. खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा वेळेत, गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात पुरवठा होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या खरीप हंगाम 2025 च्या आढावा बैठकीमध्ये, निविष्ठांच्या गुणवत्तापूर्ण उपलब्धतेसंदर्भात शेतकरी, वितरक व विक्रेत्यांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याच्या दृष्टीने निर्देश देण्यात आले. त्यानुसार, कृषि आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी खालील सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. WhatsApp क्रमांक: 9822446655, टोल फ्री क्रमांक: 18002334000 , ई-मेल: controlroom.qc.maharashtra@gmail.com निविष्ठांच्या गुणवत्ता, किंमत, साठेबाजी,…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. छत्रू परिसरातील सिंहपोरा भागात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत मिळालेल्या माहितीवरून लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, देशासाठी लढताना महाराष्ट्रातील सुपुत्राला वीरमरण आले. संदीप गायकवाड असे शहीद जवानाचे नाव आहे. शहीद जवान संदीप गायकर हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या करंडी गावचे रहिवासी होते. अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी त्यांनी मराठा रेजिमेंटच्या आरआर बटालियनमध्ये लष्करी सेवेत प्रवेश केला होता. गुरुवारी दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. गायकर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी अहिल्यानगरातील अकोले येथील ब्राम्हणवाडा येथे उद्या आणण्यात येणार…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही वर्षापासून अनेक वादग्रस्त विधान करण्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे हे नेहमीच चर्चेत येत असतांना आता शुक्रवारी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. रायगडावर 6 जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेकाचा सोहळा नामशेष झाला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे लोटली, पण त्यानंतरही आपण आपले मानसिक अधिष्ठान ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचेही जोरदार समर्थन केले. छत्रपी शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक झाला होता. त्यानुसार दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. पण आता संभाजी भिडे यांनी या सोहळ्यास कडाडून विरोध…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तूर उत्पादक व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 28 मे 2025 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत, केंद्र सरकारने तूर खरेदी मुदत वाढवून दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत. राज्यात तूर खरेदीची मुदत 13 मे 2025 पर्यंत…

Read More

पुणे : वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसापासून राज्यातील पुणे येथील अजित पवार गटाचे कार्यकर्ते राजेंद्र पवार यांची सून वैष्णवी हगवणे यांच्या आत्म्हत्या प्रकरणी मोठी कारवाई होण्याची मागणी सुरु असतांना वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूला जबाबदार धरला जाणारा सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे हे दोघेही गेल्या सात दिवसांपासून मोकाट फिरत होते. त्यांना आता अटक झाली असून ते मागील काही दिवसांपासून तळेगाव परिसरातच असल्याचे उघड झाले आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून हे दोघेही हॉटेलमध्ये जेवण करत असताना या सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तब्बल सात दिवस राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार होते. मात्र, हे…

Read More

चोपडा : प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील वढजाई येथील केटर्स २२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तालुक्यातील चहार्डी येथे मालवाहूक रिक्षाने जात होते. ही रिक्षा सावखेड्याजवळ उलटल्याने रिक्षातील ११ जण जखमी झाले आहेत. त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. सविस्तर वृत्त असे कि, रिक्षा उलटून झालेल्या अपघातात धुळे जिल्ह्यातील वढजाई येथील कुंदनबाई दिनेश खैरे (वय ५५), अर्चना खंडू कुवर (वय ३८), हिरकन बन्सिलाल ठाकरे (वय ६०), सरला संदीप खैरे (वय ४०), सुशीलाबाई सुकदेव वाघ (वय ७०), मीराबाई गोकुळ वानखेडे (वय ४५), वनराज गुलाब माळी (वय २६), कल्पना कृष्णा आखाडे (वय ५६), दीपक संदीप खैरे (वय १५),…

Read More