मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मान्सून दरवर्षी प्रमाणे यंदा लवकर सुरु झाला असून आता मुंबईत देखील मान्सून दाखल झाला आहे. सध्या मुंबई शहर आणि उपनगरात सध्या जोरदार पाऊस कोसळत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही तासांमधील पावसामुळे आताच मुंबईतील सखल भाग आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. रस्त्यांवर आणि घरात देखील पाणी साचल्याचे दिसत आहे. मुंबई आणि उपनगरातील पावसाचा लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पहिल्याच पावसात पुन्हा एकदा मुंबई तुंबल्याने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. “गेल्या ३ वर्षांपासून बीएमसीवर नियंत्रण ठेवणाऱ्या भाजप सरकारच्या पूर्ण उदासीनतेमुळे…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात यंदाच्या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाल्याने २५ मे रोजीच दक्षिण कोकणात तो दाखल झाला आहे. तब्बल दहा दिवस आधी पावसाने राज्यात वर्दी दिली आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवसात मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असून राज्यातील हवामानात लबवकरच मोठे बदल दिसून येणार आहेत. शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात रविवारी करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने रविवारी केले आहे. ज्यातील अनेक भागात मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल, अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून…
चोपडा : प्रतिनिधी धानोरा -चोपडा महामार्गावर २० दिवसांपूर्वी कोसळलेल्या भल्या मोठ्या वृक्षावर दुचाकी धडकून सुरेश पीतांबर महाजन (६२) या धानोरा येथील निवृत्त शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. मयत शिक्षक हे राज्यस्तरीय खो-खो पंच होते. सविस्तर वृत्त असे कि, ६ मे रोजी धानोरा परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेक वृक्ष कोसळले. अंकलेश्वर-ब-हाणपूर महामार्गावर धानोराहून चिंचोलीकडे जाताना गावाजवळच भला मोठा वृक्ष कोसळला आहे. हा वृक्ष अनेक वाहनांना त्याचा अडथळा ठरतो आहे. मात्र, तरीही सा. बां. विभागाने दुर्लक्ष केले आहे. अखेर याठिकाणी दुचाकीला अपघात होऊन त्यात निवृत्त शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला आहे गेल्या २० दिवसांपासून हा वृक्ष तसाच पडून आहे. याच वृक्षामुळे शनिवारी रात्री १०…
जळगाव : प्रतिनिधी आव्हाणे रोड परिसरातील रोहनवाडीत एका महिलेला शिक्षिकेचा पत्ता न दिल्याच्या रागातून चार महिलांनी घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलिसांत चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुनंदा आनंदा निकम (वय ५७, रा. रोहनवाडी, आव्हाणे शिवार) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे मंगल मुरलीधर सुरवाडे, अश्विनी शालिक सुरवाडे, गीता धनराज वाघ आणि सरिता संजय दांडगे (सर्व रा. महादेव नगर, कानळदा रोड, जळगाव) या चार महिला त्यांच्या घरात घुसल्या. त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. यात नातीलाही मारहाण केली.
जळगाव : प्रतिनिधी शिवाजीनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर चाकू आणि दगडांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना २३ मे रोजी घडली आहे. यात तरुणाचा पाय फॅक्चर झाला असून, त्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी, २४ मे रोजी जळगाव शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार गजानन विकास बाविस्कर (वय ३०, रा. शिवाजीनगर, हुडको, जळगाव) हा खासगी कंपनीत नोकरीला आहे. २३ मे रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास, जुन्या वादाच्या कारणावरून मनीष रामू बिन्हाडे, संगम देवा भोई आणि कृष्णा पांडुरंग सोनवणे (सर्व रा. जळगाव) यांनी गजाननला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, मनीषने चाकूने गजाननच्या डोक्यावर आणि हातावर वार…
एरंडोल : प्रतिनिधी शहरातील गाढवेगल्ली परिसरात दुचाकी लावण्याच्या कारणावरून ४ ते ५ जणांना जबर मारहाण करण्याची घटना घडली असून, यातील युवकाची प्रकृती चिंताजनक आहे. सविस्तर वृत्त असे कि, अमोल कैलास पाटील (३१) याच्यासह कुटुंबातील ४ ते ५ जणांना लाठ्याकाठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पांडव वाड्यामागे घडली. यात अमोल पाटील हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेबाबत एरंडोल पोलिस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला असून, घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. पोलिस उपविभागीय अधिकारी (अमळनेर) विनायक कोते यांनी रात्री…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील ओम साई श्रद्धा नगरमधून अज्ञात चोरट्यांनी एक चार चाकी चोरून नेल्याची घटना २४ रोजी रात्री घडली. या संदर्भात प्रवीण हरिश्चंद्र ठाकूर यांनी फिर्याद दिली आहे. यात प्रवीण ठाकूर यांचे मेव्हणे मनीष राजाराम पवार यांची सुमारे दीड लाखाची चारचाकी (एमएच १८, एजे- ३११०) वर ठाकूर हे त्यांच्या परिवाराला अमळनेर येथे आले होते. तर त्यांचे मेहुणे कामानिमित्त दिल्लीत गेल्याने त्यांनी चारचाकी अमळनेर येथे प्रवीण ठाकूर यांच्या घरासमोर लावली होती. पहाटे ५ वाजता ते लघु शंकेला उठले असता त्यांना चारचाकी दिसली नाही. याबाबत ठाकूर यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.उ.नि.…
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, सकारात्मक विचारसरणीच्या लोकांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत वाटेल. घाईघाईने घेतलेले निर्णय बदलावे लागू शकतात. तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामांसाठी वेळ काढू शकणार नाही, ज्यामुळे मन थोडे निराश होऊ शकते. आज तुमचे बाहेरील संपर्क किंवा कोणताही प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात इच्छित परिणाम मिळू शकतो. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येऊ शकतो. कधीकधी तणाव किंवा नैराश्याची स्थिती अनुभवता येते. वृषभ राशी श्रीगणेश म्हणतात की, भविष्यातील योजनांवर चर्चा करण्यासाठी आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी हा योग्य वेळ आहे. विशेषतः महिला त्यांच्या कामांबद्दल अधिक जागरूक असतील आणि त्यांना यश देखील मिळेल. कधीकधी तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येण्यामुळे घरातील वातावरण बिघडू…
पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील नागरिक ज्या मान्सूनची वाट पाहत होते, तो आज रविवार, 25 मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला. हवामान खात्याने याबाबत अधिकृत घोषणा केली असून, यावर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा तब्बल 12 दिवस आधी राज्यात पोहोचला आहे. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षी साधारणतः 7 जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सून दाखल होत असतो. शनिवारी केरळात पोहोचलेल्या मान्सूनला, महाराष्ट्रात आगमनासाठी एक ते दोन दिवस लागतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र मात्र यंदा हवामानातील पोषक स्थितीमुळे अवघ्या काही तासांतच मान्सून रविवारी महाराष्ट्रात दाखल झाला. आज 25 मे 2025 रोजी नैऋत्य मान्सून पश्चिममध्य आणि…
चोपडा : प्रतिनिधी शहरातील पं.स. सभापती निवास असणाऱ्या स्थळी एका अज्ञाताचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी काही तासांतच आरोपीस अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा शहरात कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणारे दोन पुरुष व एक स्त्री हे सोबत कचरा गोळा करतात. यापैकी मृत व्यक्ती आणि सोबत असणारी जानू राजू बारेला (३५) यांचे अनैतिक संबंध असल्याचा राग मनात ठेवत राजेश काशीनाथ बारेला याने मृताच्या डोक्यात दगड मारून खून केला. तसेच जानू बारेला हिलादेखील मारहाण करून जखमी केल्याची घटना २५ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली होती. पंचायत समितीसमोर…

