Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी तू मातून गेला आहे तुला बघतोच म्हणत छत्री लावण्यासाठी काढलेल्या काठीने मधूकर चिंतामणी वाणी (वय ५५, रा. ईश्वर कॉलनी) यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा हात फॅक्चर झाला. ही घटना दि. २१ रोजी सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास भजेगल्लीत घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात संशयित हर्षल विजय चौरसिया (रा. नाथवाडा, सिंधी कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील ईश्वर कॉलनीतील लाठी शाळेजवळ मधुकर चिंतामणी वाणी हे वात्तसतव्यास असून त्यांचे भजेगल्लीत कटलरी साहित्य विक्री करुन उदनिर्वाह करतात. दि. २१ रोजी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे गाडी लावली. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा हर्षल चौरसिया हा तेथे आला. त्याने काहीही कारण नसतांना मधुकर…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी बकरी ईदचे प्रत्येकी ४० हजार रुपये मिळवून देतो, असे सांगत एका दाम्पत्याजवळून ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अनोळखी व्यक्तीने फसवुन पळवून नेल्याची घटना १९ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कि, अशरफबी फकीर मोहम्मद शेख ही मूळची अमळनेर येथील महिला सध्या सुरत येथे राहते. पुतणीच्या लग्नासाठी ती पतीसोबत अमळनेरला आली होती. १९ रोजी ती स्टेट बँकेतून लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी अर्बन बँकेसमोर उभी असताना एकजण आला व त्यांना म्हणाला की, तुम्हाला बकरी ईदचे प्रत्येकी ४० हजार रुपयांप्रमाणे ८० हजार रुपये काढून देतो. कोणाशी तरी फोनवर बोलण्याचे नाटक करून नंतर साडेबारा वाजता रिक्षामध्ये बसवून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील समता नगरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, येथे राहणाऱ्या ४९ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भात रामानंदनगर पोलिस ठाण्यात सकाळी १० वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, ईश्वर सुखदेव वाघ (वय ४९) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर वाघ हे पत्नी संगीता आणि मुलगा रणजित यांच्यासोबत समता नगरात राहत होते. हातमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. बुधवारी रात्री ११ वाजता जेवण केल्यानंतर ते मागच्या खोलीत झोपायला गेले.…

Read More

बोदवड : प्रतिनिधी शहरातील भर चौकात रस्त्यावर असलेली हॉटेल अमर चोरट्यांनी लक्ष केले. खिडकी तोडून हॉटेलमधील ५० हजाराची रोकडसह सीसीटीव्ही कॅमेरे तोडून चोरटे पसार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. चोरट्यांनी हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या खिडकी फोडून आत प्रवेश केला. त्यात हॉटेलमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडत चोरट्याने हॉटेलच्या गल्ल्यात असलेले ४७ हजार शंभर रुपये चोरून नेले. गुरुवारी सकाळी हॉटेल उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिसांना बोदवड माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला. याप्रकरणी बोदवड पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Read More

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, ग्रहांची स्थिती शुभ आहे. यावेळी तुमचे वर्तन आणि भूतकाळातील चुका दुरुस्त करा. तुम्ही यावरही काम करत आहात. अशा प्रकारच्या प्रयत्नांमुळे लोकांशी संबंधांमध्ये आश्चर्यकारक सुधारणा होईल. चुकीच्या मजा आणि बाह्य कामांमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. यामुळे तुम्ही तुमची वैयक्तिक कामे योग्यरित्या करू शकणार नाही. घरातील वडीलधाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ग्रहांच्या स्थितीत काही सकारात्मक बदल होतो. पती-पत्नीमध्ये योग्य सुसंवाद निर्माण होऊ शकतो. वृषभ राशी श्रीगणेश म्‍हणतात की, ग्रहांचे संक्रमण सकारात्मक असेल. अडकलेल्या कामांना गती मिळेल. प्रतिष्ठित लोकांशी भेटीगाठीमुळे फायदे आणि आदर मिळेल. त्यामुळे तुमची कार्यक्षमता देखील सुधारेल. स्वार्थी मित्रांपासून दूर रहा. त्यांचा चुकीचा सल्ला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोगस बियाण्यांच्या मुद्यावरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र हा बोगस बियाण्यांचा अड्डा बनला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत, असे ते म्हणाले. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण आत्महत्येचे नव्हे तर हत्येचे असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. विजय वडेट्टीवार गुरुवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र हा बोगस बियाण्यांचा अड्डा बनला आहे. यासंबंधी तुम्ही – आम्ही मिळून खाऊ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मी मागील अनेक वर्षांपासून या प्रकरणाला वाचा फोडत आहे. विधानसभेतही आम्ही हा प्रश्न वारंवार लावून धरला आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांचे शुद्ध वाण मिळत नाही. याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूडच्या क्षेत्रात अनेक अभिनेते व अभिनेत्री चर्चेत येत असतांना आता बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीने चित्रपटसृष्टीला कायमचा निरोप दिला आहे. हा धक्कादायक खुलासा तिचे वडील आणि अभिनेते सुनील शेट्टी यांनी केला आहे. एका मुलाखतीत सुनील शेट्टी यांनी सांगितले की, अथिया यापुढे चित्रपटांमध्ये काम करू इच्छित नाही आणि तिने तिच्या करिअरसाठी नवीन मार्ग निवडला आहे. वयाच्या 2015 मध्ये सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत प्रदर्शित झालेल्या ‘हिरो’ चित्रपटातून अथिया शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या करिअरची सुरुवात खूपच चर्चेत होती, पण त्यानंतर ती बॉलिवूडमधील मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसली. ‘मुबारकां’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ती अचानक चित्रपटसृष्टीतून गायब झाली.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली असून सर्वाधिक २५ रुग्ण मुंबईतील आहेत. याच वेळी पुण्यातही एक रुग्ण आढळून आला आहे. या वर्षभरात करोनाचे एकूण १३२ रुग्ण आढळून आले असून, त्यांपैकी १२६ मुंबईतील आहेत. राज्यातील करोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या २४ तासांत राज्यात आणखी २६ रुग्ण आढळले असून, त्यातील सर्वाधिक २५ रुग्ण मुंबईतील आहेत. याच वेळी पुण्यातही एक रुग्ण आढळून आला आहे. तर दुसरीकडे राज्यात मान्सूनपूर्व खबरदारी घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महापालिकांना आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत, राज्यात जानेवारी ते २१ मेपर्यंत करोनाच्या ६ हजार २०६ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १३२ रुग्णांना करोनाचे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून अनेक विषयावर ठाकरे गटाचे नेते आक्रमक होत असतांना आता आदित्य ठाकरे देखील आक्रमक होवून थेट इशारा दिला आहे. मुंबईत वरळीमधील आर्थर रोड नाका येथील शंभर वर्षे जुन्या श्री लक्ष्मीनारायण मंदिर समितीला बीएमसी आणि बिल्डरमार्फत नोटीस देण्यात आली आहे. यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिका आणि बिल्डरला थेट इशारा दिला आहे. मंदिर तोडण्यासाठी पुढे सरसावलेल्या महापालिका आणि बिल्डरची दादागिरी आम्ही सहन करणार नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी ठणकावले आहे. अर्थर नाक्यावरील बीएमसी कर्मचारी निवासस्थान परिसरात श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे शंभर वर्षे जुने आहे. मुंबई महापालिका आणि बिल्डर्समार्फत या मंदिराला नोटीस बजावण्यात आली. आदित्य…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी चहा पिण्यासाठी हॉटेलवर आलेल्या चौघांना चहाचे पैसे मागितल्याचा राग येऊन हॉटेलचालकासह कामगारास मारहाण करीत चॉपरसह अन्य लोखंडी वस्तूने डोक्यावर वार करून जबर जखमी केल्याची घटना शहरातील नागद रस्त्यावर घडली. याप्रकरणी नागदरोड झोपडपट्टी भागातील चौघांविरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मझहर खान इक्बाल खान (रोशननगर, पाटणादेवी) याचे नागद रोडवर चहाचे हॉटेल आहे. १६ रोजी रात्री ८ वाजता हॉटेलमालक मझहरखान व कामगार उमेर शेख रफीक है ग्राहकांना चहा देत असताना करीम खान रसुल ऊर्फ पप्पू तसेच शोएब खान जमील खान व त्यांच्या सोबत दोन व्यक्ती (नागदरोड झोपडपट्टी) चहा पिण्यासाठी आल्या. चहा…

Read More