Author: editor desk

जळगाव, दि. २५ मे (जिमाका वृत्तसेवा) “शासन आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारित ‘समाधान शिबिरा’चे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. यावेळी त्यांनी प्रशासन व जनतेमधील आपुलकीचा सेतू दृढ करत नागरिकांशी थेट संवाद साधला. “या शिबिराचं नावच ‘समाधान’ आहे… आणि खरं समाधान म्हणजे इथं येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर हसू उमटणं. नागरिकाच्या डोळ्यांत दिसणारं समाधानच आमच्या कार्याचं खरं मोजमाप आहे,” असे भावनिक उद्गार पालकमंत्र्यांनी काढले. “पूर्वी नागरिकांना कामासाठी तहसील कार्यालयात जावं लागायचं; पण आता शासनच त्यांच्या दारी पोहोचत आहे. ही केवळ औपचारिकता नसून प्रशासन व जनतेमधील माणुसकीची नाळ दृढ करणारा उपक्रम आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी क्रूरपणे वाहतूक केल्या जाणाऱ्या एकूण ३० उंटांची सावदा पोलिसांनी वेळेत सुटका करून त्यांचे प्राण वाचवले. या उंटांना पुढील उपचारासाठी आणि सुरक्षित निवाऱ्यासाठी जळगावनजीकच्या कुसुंबा येथील ‘अहिंसा तीर्थ, रतनलाल सी. बाफना गोशाळा येथे सोपविण्यात आले आहे. सावदा पोलिसांनी १६ मे २०२५ रोजी केलेल्या कारवाईत २१ उंटांची सुटका केली. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९६० अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. दोन मोठ्या गाड्यांमध्ये कोंबून नेण्यात येत असलेल्या या उंटांबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. १६ मे रोजी पोलिसांनी १७ नर आणि ४ मादी असे एकूण २१ उंटांची सुटका केली होती. यातील १०-१२ उंट गंभीर जखमी अवस्थेत होते. २४ मे रोजी पहाटे ३…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला अमळनेर येथील एक तरुण पळवून नेत असताना काही सजग तरुणांनी त्याला पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील बँड पथकाचा मालक अस्लमअली युसूफअली सय्यद (२९) याची ओळख तालुक्यातील अल्पवयीन झाली. मुलीशी संशयित हा मुलीच्या संपर्कात होता. दोन महिन्यांपूर्वी त्याने या मुलीस यावल भागात बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. संशयित हा विवाहित असून, त्यास तीन अपत्ये असल्याची माहिती पोलिस तपासात पढे आली आहे. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अस्लमअली सय्यद याच्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. त्याला २८ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ धावत्या रेल्वेत चोरी करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एक जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. मध्य रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिस यांनी शनिवारी संयुक्तपणे ही कारवाई केली. भुसावळ स्थानकाच्या दक्षिण भागातील मुसाफिरखान्यातून देवास आणि नाशिक येथील संशयितांना अटक करण्यात आली.  अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये गिरिजा शंकर बाबूलाल शर्मा (७१, रा.नेपानगर), लक्ष्मीनारायण दयाराम बागरी (५९), रवी लक्ष्मीनारायण बागरी (२५, दोन्ही रा.उज्जैन), विनोद राधेश्याम बागरी (३५), महेंद्र देवकरण यादव (२२, दोन्ही रा.देवास) आणि राजू निंबा खैरनार (६०, रा. नाशिक) यांचा समावेश आहे. सविस्तर वृत्त असे कि, नेपानगर आणि उज्जैन येथील संशयितांनी हावडा सीएसएमटी मेल एक्स्प्रेसच्या एसी…

Read More

मेष राशी आज तुम्हाला एखाद्या गंभीर समस्येपासून आराम मिळू शकेल. राजकारणात गुंतलेल्या लोकांना एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीकडून मार्गदर्शन आणि संगत मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवा. नोकरीच्या शोधात तुम्हाला घराबाहेर जावे लागू शकते. वृषभ राशी आज उत्पन्न कमी असेल. मित्र आणि कुटुंबाच्या मदतीने तुम्ही कोणताही अपूर्ण व्यवसाय योजना पुन्हा सुरू करण्यात यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित मालमत्तेत वाढ होण्याचे संकेत आहेत. मिथुन राशी आज तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कटू बोलण्यामुळे तुम्हाला मनातून वेदना जाणवतील. कामाच्या ठिकाणी विरुद्ध लिंगी जोडीदाराकडून चांगली बातमी मिळाल्याने तुमचे मन आनंदी होऊ शकते. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीमुळे भांडण होऊ शकते. घरातील गोष्टी बाहेर चर्चा करू नका. कर्क…

Read More

जळगाव, दि. २४ मे (जिमाका वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘१०० दिवस कार्यक्रम’ अंतर्गत अमळनेर उपविभागाने उल्लेखनीय कामगिरीची नोंद करत संपूर्ण नाशिक विभागात सर्वोत्तम उपविभाग म्हणून आपली वेगळी छाप पाडली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल अमळनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांचा सन्मान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. विभागीय आयुक्त नाशिक डॉ. प्रवीण गेडाम यांची या वेळी विशेष उपस्थिती होती. ‘१०० दिवस कार्यक्रम’ अंतर्गत विविध महसूल विषयक उपक्रम, नागरिक केंद्रित सेवा, दस्ताऐवजांचे सुलभीकरण, ई-हक्क नोंदणी, महसूल अभिलेखांचे अद्ययावतकरण, जलद निर्णय प्रक्रिया, वादांचे त्वरित निराकरण, तक्रार निवारण यंत्रणा यासारख्या बाबींमध्ये अमळनेर उपविभागाने उल्लेखनीय प्रगती साधली. उत्कृष्ट…

Read More

जालना : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना उघडकीस येत असतांना आता जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात मायलेकींचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अंजना पुरुषोत्तम सापनर (वय ३०), अनुसया पुरुषोत्तम सापनर (वय १४ रा. धानोरा ता. शेणगाव जि. हिंगोली) असं अपघातात मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. या अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असून जवळपास सहा जण किरकोळ जखमी झाले आहे आहे. ही घटना मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास सुखापुरी फाट्यावर अंबड – वडीगोद्री रोडवर घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बीड वरून जालना कडे येणारी…

Read More

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असतांना आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार वारे आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा धोका कायम आहे. पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये आज (हलका ते मध्यम स्वरूपाचा) वादळी पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागच्या 48 तासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचं धुमशान सुरू आहे. पुढचे दोन दिवस पाऊस सुरूच राहील असा अंदाज वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतरस्त्याची किमान रुंदी ३ मीटर असावी असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. शेतरस्त्याची नोंद आता ७/१२ च्या ‘इतर हक्कां’मध्येच होणार आहे. प्रत्येक शेतरस्ताप्रकरणाचा निर्णय ९० दिवसांत देणं बंधनकारक आहे. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागानं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला असून, त्यानुसार शेतरस्त्यांची किमान रुंदी आता ३ मीटर अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच, या रस्त्यांची नोंदणी ७/१२ उताऱ्यावर ‘इतर हक्क’ म्हणून करावी लागणार असून, संबंधित प्रकरणांचा निर्णय ९० दिवसांच्या आत देणे बंधनकारक ठरणार आहे.…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी पिकअप वाहन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. ही घटना मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावर गुरुवारी रात्री घडली. यात वाहन चालकास अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, या अपघातात पुंडलिक रामकृष्ण कोळी (५४) आणि भागवत महारू कोळी (६२) या दोघांचा मृत्यू झाला. भागवत कोळी हे शिंदे सेनेचे तालुका उपप्रमुख होते. मुक्ताईनगर पोलिसात लखन वसंत मोरे राहणार लोहारखेडा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे की, गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगर खामखेडा रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ पिकअप व्हॅनने दुचाकीला धडक दिली. यात वरील दोन जण ठार झाले. पिकअप वाहन चालक धर्मेंद्र नंदकिशोर साहू (रा.इंदूर) यास अटक करण्यात आली आहे.…

Read More