Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या रेल्वेत चोरी : सहा जणांना ठोकल्या बेड्या !
    क्राईम

    धावत्या रेल्वेत चोरी : सहा जणांना ठोकल्या बेड्या !

    editor deskBy editor deskMay 25, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    भुसावळ धावत्या रेल्वेत चोरी करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एक जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. मध्य रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिस यांनी शनिवारी संयुक्तपणे ही कारवाई केली. भुसावळ स्थानकाच्या दक्षिण भागातील मुसाफिरखान्यातून देवास आणि नाशिक येथील संशयितांना अटक करण्यात आली.  अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये गिरिजा शंकर बाबूलाल शर्मा (७१, रा.नेपानगर), लक्ष्मीनारायण दयाराम बागरी (५९), रवी लक्ष्मीनारायण बागरी (२५, दोन्ही रा.उज्जैन), विनोद राधेश्याम बागरी (३५), महेंद्र देवकरण यादव (२२, दोन्ही रा.देवास) आणि राजू निंबा खैरनार (६०, रा. नाशिक) यांचा समावेश आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, नेपानगर आणि उज्जैन येथील संशयितांनी हावडा सीएसएमटी मेल एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून चोरी केल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे शंकर शर्मा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.  विनोद आणि महेंद्र यांनी २३ एप्रिल रोजी ट्रेन क्र. ११०५७ च्या बी ३ कोचमधून १५ हजार रुपयांची बॅग चोरी केल्याची कबुली दिली आहे. तिसऱ्या संशयितावर चॅप्टर केस दाखल आहे.  रेल्वे सुरक्षा बलाचे ए.एस.आय शिवानंद गीते यांच्या नेतृत्वाखालील हेकॉ. महेंद्र कुशवाहा, जोगेंद्र नेरपगार, कॉ. बाबू मिर्झा, लोहमार्गचे हेकॉ. विशाल चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “तू इकडे का आला?” वादातून कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    March 9, 2026

    आर्थीक त्रासाला कंटाळून हॉटेल व्यावसायीकाने घेतला टोकाचा निर्णय : सुसाईट नोट व्हायरल !

    March 9, 2026

    भडगाव हादरले : मुलांना वाचवताना नदीत उडी; तरुण-तरुणीचा दुर्दैवी अंत !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.