नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील हरियाणातील पंचकुला येथे सोमवारी रात्री उशिरा कर्जबाजारी कुटुंबातील सात जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीत सर्वांना वेदना होत होत्या. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. सर्व लोकांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. ज्यामध्ये सेक्टर २६ मधील एका खासगी रुग्णालयात ६ जणांचा आणि सेक्टर ६ मधील सरकारी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. हे कुटुंब मूळचे उत्तराखंडमधील डेहराडून येथील आहे. सोमवारी ते बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांची कथा ऐकण्यासाठी पंचकुलामध्ये आले होते. मृतांमध्ये प्रवीण मित्तल, त्यांची पत्नी, वृद्ध पालक आणि ३ मुलांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण मित्तल यांनी काही काळापूर्वी डेहराडूनमध्ये टूर अँड…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतातील परिचारिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. युरोप आणि आखाती देशांमध्ये परिचारिकांचा तुटवडा असल्याने भारतीय परिचारिकांना मागणी वाढली आहे. दरमहा २ लाख ६० हजार ते ३ लाख २० हजार रुपये वेतनाची संधी उपलब्ध झाली आहे. जर्मनी, आयर्लंड, माल्टा, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि बेल्जियम येथे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे भारतातील परिचारिकांना आकर्षक वेतन देऊन रुजू करून घेतले जात आहे. बॉर्डरप्लस या मनुष्यबळ विकास संस्थेने दिलेल्या माहितीनुसार जर्मनीत भारतीय परिचारिकांना दरमहा २,७०० युरो (सुमारे २.६ लाख रुपये) दिले जात आहेत. परवान्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर दरमहा वेतनात ३,३०० युरोपर्यंत (३.२ लाख रुपये) वाढ केली जात…
गेल्या काही वर्षापासून महिलांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय मानल्या जातात. या गोळ्या हार्मोन्सच्या साहाय्याने अंडोत्सर्ग थांबवतात व गर्भधारणा होण्याची शक्यता कमी करतात. मात्र, याचे फायदे जितके महत्त्वाचे आहेत, तितकाच धोका काही विशिष्ट परिस्थितीत होऊ शकतो. त्यामुळे या गोळ्या घेण्याआधी योग्य माहिती आणि वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो नवीन संशोधनानुसार, गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये असलेले एस्ट्रोजेन हार्मोन महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढवू शकतात. विशेषतः ज्या महिलांना आधीपासूनच उच्च रक्तदाब, धूम्रपानाची सवय किंवा वंशानुगत हृदयरोगाचा इतिहास आहे, त्यांच्यासाठी ही गोळ्या धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे या गोळ्यांचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असून अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यंदाच्या पावसाने केले आहे तर दुसरीकडे आता भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सूनने दमदार हजेरी लावली असून, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुण्याचा घाटमाथा आणि सातारा येथे २६ मे विजा, मेघगर्जनेसह अतिमुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरसाठी २७ मे ही रेड अलर्ट कायम आहे. कोकणातील रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित आहे. बुधवारनंतर पालघर, ठाणे आणि मुंबईत…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील नवीन बसस्थानकातून चाळीसगाव बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून एका ३० वर्षीय महिलेसह एका अल्पवयीन मुलीवर जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जानकीनगर, जळगाव येथील रहिवासी लक्ष्मी प्रमोद चौधरी (वय ३५) या रविवारी सायंकाळी जळगाव बसस्थानकावर चाळीसगाव बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी बसमध्ये प्रवाशांची नेहमीप्रमाणेच मोठी गर्दी होती. याच गर्दीचा गैरफायदा घेत ध्रुपता अक्षय भोसले (वय ३०, रा. छत्रपती संभाजीनगर) आणि तिच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलीने लक्ष्मी चौधरी यांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची पोत कापली.…
जळगाव : प्रतिनिधी ‘खुन्नस देऊन बघितल्याच्या’ कारणावरून शिवाजीनगरात एका ५८ वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना २५ मे रोजी मध्यरात्री २:०० वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून, शहर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शनिवारी सायंकाळी ७:०० वाजता मंगला संजय राठोड यांचा मुलगा विजय घराबाहेर बसलेला असताना, प्रेम सांगोरे दुचाकीवरून जाताना त्याने खुन्नस देऊन बघितल्याचा आरोप विजयने केला. यावरून दोघांमध्ये वाद होऊन प्रेम सांगोरेने आपल्या कुटुंबीयांना बोलावून घेतले. प्रेम विलास सांगोरे, विलास रमेश सांगोरे, अमोल रमेश सांगोरे आणि ओम कैलास सांगोरे (सर्व रा. शिवाजीनगर) यांनी विजयला शिवीगाळ करत मारहाण…
जळगाव : प्रतिनिधी इच्छादेवी चौक परिसरात एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने, प्रेम धीरज ठाकूर (वय २०, रा. शिंदे नगर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (२६ मे) पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शिंदे नगर येथे आपल्या कुटुंबासह राहणारा प्रेम ठाकूर हा टुर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता. सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तो शिंदे नगरातून अजिंठा चौकाकडे दुचाकीने जात होता. याचवेळी ईच्छादेवी चौक परिसरात एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, प्रेम ठाकूरचा जागीच…
बोदवड : प्रतिनिधी शहरातील एका राजकीय पक्षाच्या व्यक्तीची २२ वर्षीय मुलगी बाहेरगावी शिक्षण घेत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून गौरव मुकुंदा साठे (वय २३, रा. बोदवड) याने ओळख निर्माण करत या तरुणीस जळगाव येथे एका हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला. अत्याचार करत असतानाचे फोटो काढले व व्हिडीओही केला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत या तरुणीकडून वेळोवेळी ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून रक्कमही उकळली. वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीने त्रासून या तरुणीने याबाबत तिच्या आईकडे कैफियत मांडली. यानंतर आई व वडिलांनी तरुणीला विश्वासात घेतले असता तिने सर्व माहिती त्यांना दिली. ही माहिती बोदवड पोलिसांना दिली असता, रात्री उशिरापर्यंत या बाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू…
मेष राशी कामाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल. तुमचा संयम कोणत्याही प्रकारे ढळू देऊ नका. नवीन व्यवसाय सुरू कराल. सरकारी नोकरीऐवजी खाजगी कंपनीत नोकरी शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला लवकरच यश मिळेल. वृषभ राशी आज प्रेमसंबंधांमध्ये जवळीकता येईल. प्रेमविवाहातील अडथळे दूर होतील. पालकांकडून सहकार्याचे वर्तन असेल. सामाजिक कार्यात रस राहील. पती-पत्नीमध्ये आनंद आणि सहकार्य राहील. मिथुन राशी आज कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल. सरकारी नोकरीत पदोन्नती मिळेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी शोधणाऱ्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळेल. व्यवसाय वाढवण्याच्या योजना यशस्वी होतील. तुम्हाला इमारत बांधणीत यश मिळेल. कर्क राशी आज उधार दिलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी…
जळगाव दि. २६ (जिमाका वृत्तसेवा) चोपडा तालुक्यातील मौजे वैजापूर येथे आदिवासी उपयोजना क्षेत्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराचे आयोजन विश्रामगृह परिसरात करण्यात आले होते. शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिराचे अध्यक्षस्थान आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी भूषविले. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार श्री. भाऊसाहेब थोरात, प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. अण्णासाहेब घोलप, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात एकूण ३०२ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये सामूहिक वनहक्क पट्टे वाटप –…

