Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : भरधाव डंपरने चिरडले, वृद्ध जागीच ठार !
    क्राईम

    धक्कादायक : भरधाव डंपरने चिरडले, वृद्ध जागीच ठार !

    editor deskBy editor deskMarch 30, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :  प्रतिनिधी

    भरधाव डंपरने धडक देत चिरडल्याने बशीरशा मकबूलशा शाह फकीर (७५, रा. वराड, ता. जळगाव) हे जागीच ठार झाले. हा अपघात २८ मार्च रोजी रात्री वराड, ता. जळगाव येथे झाला. अपघात होताच नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. एमआयडीसी पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला. या प्रकरणी चालक नितीन वसंत मिस्तरी (रा. दापोरे, ता. एरंडोल) व मालक भूषण सुधाकर चव्हाण (रा. धानोरा, ता. जळगाव) या दोघांना अटक करण्यात आली असून दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार,  वराड येथील बशीरशा फकीर हे कामानिमित्त गावातील बसस्थानकाकडे गेले होते. त्यावेळी एक डंपर (क्र. एमएच ४७, एएस ५१४८) गावातून जात असताना जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच मयताचे कुटुंबीय व नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. हा डंपर गावात वाळू खाली करून जात होता, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. भरधाव वाळूचे डंपर नागरिकांच्या जीवावर उठले असून प्रशासन कठोर भूमिका घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. अपघात होताच गावातील नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. भरधाव डंपरचा बंदोबस्त झालाच पाहिजे, अशी मागणी केली. या वेळी अनेक जण आक्रमक झाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढत संबंधितांवर कारवाईची ग्वाही देत डंपर पोलिस ठाण्यात नेला.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘धनंजय मुंडे दुसरे खरातच’; करुणा मुंडे यांचा खळबळजनक आरोप, चौकशीची मागणी

    April 15, 2026

    चाकणकर प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; अदिती तटकरे यांच्यावर थेट सवालांचा भडिमार !

    April 15, 2026

    कासमवाडीत शस्त्रांसह फिरणाऱ्या दोघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.