Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी  तालुक्यातील तपत कठोरा येथे बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात डंपरखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेली चार वर्षीय नात सुदैवाने बचावली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त डंपरला आग लावल्याने परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. तपत कठोरा येथील रहिवासी अनिल मुकुंद पाटील (वय ५७) हे आपल्या चार वर्षीय नात दिव्या हिच्यासह दुचाकी (एम.एच.१९ बी.एफ. ९३२०) वरून पिंप्रीसेकम शिवारातील शेतातून घरी परतत होते. यावेळी शिवारातील अरुंद रस्त्यावर मुरूम वाहतूक करणारा डंपर (एम.एच. १९ ई.यू. ३७३७) रिव्हर्स घेत असताना दुचाकीला जोरदार धडक बसली. धडकेनंतर अनिल पाटील हे डंपरखाली दाबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  रायगड जिल्ह्यातील काशीद बीचवर सोमवारी जळगाव जिल्ह्यातील अमीन मजीद शेख या २५ वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाचे प्राण लाइफगार्ड आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले. अमीन मजीद शेख (वय २५), मलिक नजीर शेख (वय २१) आणि इम्रान अन्वर खान (वय ३७, सर्व रा. कासोदा, ता. एरंडोल, जि. जळगाव) हे ताडपत्री विक्रीच्या व्यवसायानिमित्त काशीद-मुरुड परिसरात आले होते. मोकळ्या वेळेत ते काशीद बीचवर फिरण्यासाठी गेले असता अमीन आणि मलिक हे समुद्रात पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात अडकले. घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलिसांचे कर्मचारी यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. अमीन याचा बुडून मृत्यू झाला.…

Read More

आजचे राशिभविष्य दि.११ जून २०२६  मेष राशी आज तुम्हाला तुमचा राग आणि शब्दांवर विशेष नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. क्षुल्लक गोष्टींवर प्रतिक्रिया दिल्याने तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. सकारात्मक बाजू म्हणजे, कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होण्याची चिन्हे आहेत. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होणार असली, तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. जोडीदारासोबत घालवलेला वेळ तुमच्या नात्यात गोडवा निर्माण करेल. वृषभ राशी राजकारण किंवा सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. इतरांच्या सल्ल्यावरून गुंतवणुकीचे निर्णय घेणे टाळा. आहाराबाबत निष्काळजीपणा केल्यास समस्या वाढू शकतात. वृषभ राशी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला तब्बल २८ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा गुटखा आणि पानमसाल्याचा साठा जप्त केला. या कारवाईत मालवाहू बोलेरो वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना ९ जून रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, जळगाव शहरातील महामार्गावरून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोलीस उपनिरीक्षक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  अमळनेर येथील ढेकू रोडवरील जिजाऊ नगर येथील रहिवासी डॉ सुमित पाटील याच्या मोटरसायकलची उभ्या असलेल्या ट्रकला धडक लागून अपघात झाल्याची घटना ७ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास लखनऊ येथे घडली. उपचार घेताना ९ रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला. डॉ सुमित पाटील हा सारबेटेकर प्रा आर एस पाटील यांचा मुलगा व जळगाव जिल्हा परिषदेचे अधिकारी डी एस पाटील यांचा पुतण्या आहे. तो लखनऊ येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता. ७ रोजी तो आपल्या मोटरसायकलने जेवायला जात असताना वळणावर एक ट्रक उभा होता. मागील टेल लॅम्प बंद असल्याने मोटरसायकल ट्रकवर धडकल्याने सुमित याच्या पोटाला मार लागला होता. उपचारसाठी त्याला लखनऊ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी लग्नात झालेल्या वादाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी होऊन एकमेकांवर तलवार, लोखंडी – पाईप, आसारीने वार करण्यात आले. ही घटना दि. ६ जून रोजी नशिराबाद येथे घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नशिराबाद येथील सैयद वसीम सैयद बिसमिल्ला (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा लहान भाऊ लग्नाच्या पंगतीत झाडत असताना त्याने एका जणाला बाजूला होण्यास सांगितले. त्यावरून त्यांना मारहाण करीत तलवार व आसारीने वार केले. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटातील मोहंमद रफीक अब्दुल हक (वय ४६,…

Read More

जळगाव : [प्रतिनिधी एका लग्न सोहळ्यात भेट झाल्यानंतर दोघांमध्ये प्रेम बहरले. यानंतर लग्न करण्याचे आमिष दाखवत शेख शाहीद फारुख (रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) याने धुळे येथील २३ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. हा प्रकार सन २०२४ पासून सुरू होता. याप्रकरणी शेख शाहीद याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दोन मुलांची आई असलेल्या धुळे येथील महिलेची शेख शाहीद याच्याशी एका लग्न सोहळ्यात ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम बहरले. त्यावेळी तीन मुलांचा पिता असलेल्या शेख शाहीद याने महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर जळगाव व धुळे येथे वेळोवेळी अत्याचार केला. दोन वर्षांहून अधिक काळ उलटला तरी हा तरुण लग्न करीत नसल्याने महिलेने…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१० जून २०२६ मेष राशी आजचा दिवस तुमच्या आयुष्यात नवी आशा आणि ऊर्जा घेऊन येईल. दिवसाच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि एखादी चांगली बातमी तुमचा उत्साह वाढवेल. तुम्हाला करिअरची एखादी उत्तम संधी मिळू शकते, ज्यामुळे भविष्याबाबतचा तुमचा आत्मविश्वास उंचावेल. घरातील वातावरणही शांत आणि सुखद असेल. मात्र, धावपळीच्या गडबडीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; बाहेरचे खाणे टाळा आणि पुरेशी विश्रांती घ्या. कायदेशीर किंवा कागदपत्रांशी संबंधित कोणत्याही बाबीबाबत एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. वृषभ राशी आज तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल, परंतु या प्रयत्नांचे भविष्यात मोठे फायदे मिळतील. तुमच्या व्यवसायात एखादी नवीन कल्पना किंवा उत्पादन सुरू करण्यासाठी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासन, वित्त आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना, वस्तू व सेवा कर (GST) कायद्यात सुधारणा तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) कर्जउभारणीच्या अधिकारात वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या निर्णयांमुळे प्रशासन अधिक गतिमान होण्याबरोबरच उद्योग आणि करप्रणालीतही सुलभता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाच्या मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार एकाच विभागातील काही उपविभागांना स्वतंत्र विभागाचा दर्जा देण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ३३ प्रशासकीय विभागांची संख्या वाढून ४३ होणार आहे. विशेष म्हणजे या पुनर्रचनेमुळे नवीन…

Read More

नाशिक : प्रतिनिधी नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर येऊ लागला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करणारे गोकुळ गिते यांनी अद्याप माघार घेतलेली नसल्याने शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चिंता वाढली आहे. गिते यांच्या भूमिकेमुळे महायुतीसमोर प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला असून, बंडखोरी शमवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अद्याप पूर्ण यश आलेले नाही. गेल्या तीन दिवसांपासून राज्याचे मंत्री उदय सामंत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकून बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या चर्चांमध्ये मंत्री दादा भूसे यांनीही सक्रिय सहभाग घेतला. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या सलग बैठका…

Read More