यावल : प्रतिनिधी तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील माथन या आदिवासी पाड्यावरील दांपत्याचा मद्याच्या नशेत बाजारातून घरी जाताना गाडऱ्या शिवारातील नदीच्या डोहात पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दांपत्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातपुड्याच्या कुशीत माथन हा आदिवासी पाडा आहे. या पाड्यावरील रहिवासी थावरा उर्फ भावऱ्या रजान पावरा (वय ५४) व त्यांची पत्नी धोंडीबाई थावरा उर्फ भावऱ्या पावरा (वय ३२) हे दांपत्य मंगळवारी बाजार करण्यासाठी गेले होते. दरम्यान, बाजार केल्यानंतर दोघेही मद्य प्राशन करुन घराकडे निघाले होते. मद्याच्या नशेत रात्री घरी जात…
Author: editor desk
चोपडा : प्रतिनिधी शहरातील मेणबत्ती चौक परिसरातील न्यू बापू टी हाऊसमध्ये अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी हॉटेल मालक राहुल भगवान महाजन (वय ३८, रा. अशोक नगर, चोपडा) याच्याविरुद्ध बालकामगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यू बापू टी हाऊसमध्ये १७ व १५ वर्षे वयोगटातील दोन अल्पवयीन मुलांना कामावर ठेवण्यात आले होते. या मुलांकडून नियमबाह्य पद्धतीने दीर्घकाळ काम करून घेतले जात असल्याची माहिती संबंधित यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान हा प्रकार उघड झाला. तपासात असे आढळून आले की, संबंधित मुलांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला दिला जात नव्हता.…
जळगाव : प्रतिनिधी मध्यरात्री हॉटेल बंद करुन आणि रस्त्याने जाणाऱ्या चार जणांना चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या वाहनाची तोडफोड करुन त्यांच्याजवळ असलेली ७हजार ८०० रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना दि. ११ जून रोजी पहाटे महामार्गावर घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तालुका पोलिसांनी तपासचक्रे फिरवित पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार चेतन उर्फ बटाटा रमेश सुशिर (वय २१), उमाकांत दत्तात्रय जाधव (वय, दोघ रा. संत मिराबाईनगर), गौरव संजय जाधव (वय २१, रा. साईनगर) व रोशन भगवान पाटील (वय २६, रा. पांडुरंग नगर) यांना दोन तासात अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांभोरी येथे हॉटेलवरील मॅनेजर असलेले चेतन प्रकाश पाटील…
आजचे राशिभविष्य दि.१२ जून २०२६ मेष राशी आज तुमच्याथ खूप ऊर्जा आणि उत्साह असेल. काहीतरी नवीन करून पाहण्याची प्रेरणा मिळेल आणि त्याचा प्रभाव तुमच्या कामात तसेच व्यवसायात स्पष्टपणे दिसून येईल. प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होतील आणि तुमच्या व्यवसायाच्या कामकाजाला गती मिळेल. जर तुम्ही नवीन भागीदारीचा विचार करत असाल, तर निर्णय घेण्यापूर्वी थोडा वेळ घ्या. मुलांच्या आनंदासाठी तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. पाहुण्यांच्या आगमनामुळे घरात चैतन्य निर्माण होईल, तरीही वडिलांच्या आरोग्याबाबत काहीशी चिंता कायम राहू शकते. वृषभ राशी आज तुम्हाला थोडं अस्वस्थ किंवा गोंधळल्यासारखं वाटू शकतं. एखाद्या विशिष्ट कामाबाबतची भीती किंवा अनिश्चितता तुम्हाला चिंतेत टाकू शकते, परंतु संयम…
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचे अनुदान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर आता मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार असून 12 ते 15 जूनदरम्यान 1,500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्यांचे मिळून 3,000 रुपये अनेक महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र काही लाभार्थींना केवळ एका महिन्याचाच हप्ता मिळाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. याच दरम्यान मे महिन्याच्या हप्त्याबाबत महिलांमध्ये उत्सुकता होती. भाजपच्या आमदार…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव-बांभोरी महामार्गावरील शासकीय आयटीआयसमोर गुरुवारी कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातामुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली. कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून बांभोरीच्या दिशेने (एमएच १९ सीयु १३६७) क्रमांकाची कार जात होती. त्याच मार्गावर पुढे (आरजे ०६ जीई ३९४१) क्रमांकाचा कंटेनरही प्रवास करत होता. शासकीय आयटीआयसमोर कार चालकाने कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र ओव्हरटेक करताना वाहनावरील नियंत्रण बिघडल्याने कारचा कंटेनरला धक्का लागून अपघात झाला. अपघातानंतर…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरालगतच्या मानराज पार्क परिसरात गुरुवारी दुपारी कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकासह एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली. कारचालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी रिक्षा कारवर आदळल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, (एमएच १२ टीवाय १७६२) क्रमांकाची कार जळगावकडून बांभोरीच्या दिशेने जात होती. मानराज पार्क परिसरात आल्यानंतर कारचालकाने अचानक वाहनाचे ब्रेक दाबले. त्याचवेळी कारच्या मागून येणारी (एमएच १९ सीडब्ल्यू ६८७७) क्रमांकाची रिक्षा वेगात असल्याने चालकाला वाहन नियंत्रित करता आले नाही आणि रिक्षा थेट कारच्या मागील भागावर आदळली. धडक इतकी जोरदार होती की रिक्षाच्या पुढील भागाचा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात भाजपला प्रभावी पर्याय उभा करण्यासाठी काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या पक्षांनी पुन्हा एकत्र येण्याचा विचार करावा आणि “अखंड काँग्रेस” ही संकल्पना पुढे आणावी, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी म्हटले. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर राऊतांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, देशात काँग्रेस अधिक सक्षम आणि मजबूत होणे गरजेचे आहे. काँग्रेसमधून विविध काळात वेगळे झालेले पक्ष आजही स्थानिक पातळीवर कार्यरत आहेत. मात्र,…
बोदवडः प्रतिनिधी तालुक्यातील मनुर बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी रमेश पंढरी बाठे (वय ६०) यांचे उपचार सुरू असतांना जिल्हा रुग्णालयात निधन झाले. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे ते सतत मानसिक तणावात रहात असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, मनुर खुर्द शिवारातील शेतामध्ये रविवार ७ जून २०२६ रोजी सकाळी कपाशी लागवड करण्यास गेले होते. मात्र, दुपारपर्यंत शेतातून घरी न आल्यामुळे मुलगा त्यांना शेतामध्ये बघण्यासाठी गेला असता अर्धवट बेशुद्ध अवस्थेमध्ये कडूनिंबाच्या झाडाखाली आढळून आले. मुलाने त्यांना काय झाल असे विचारले असता त्यांनी विषारी औषधे घेतल्याचे सांगितले त्यानंतर त्यांना खाजगी वाहनाने बोदवड ग्रामीण रुग्णालयमध्ये नेण्यात आले. त्यांच्या प्राथमिक उपचार करून सरकारी रुग्णवाहिकेने त्यांना जिल्हा…
चाळीसगाव : प्रतिनिधी धुळे राष्ट्रीय महामार्गावरील दहिवद फाट्यावर भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर एका बालिकेसह अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. तर जखमींवर धुळे येथे उपचार सुरू आहेत. या अपघातात तालुक्यातील सेवानगर तांडा येथील चिमा तंगत धनगर (वय ४८) यांचा मृत्यू झाला असून हा अपघात १० जूनला दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, चिमा धनगर हे आपली मुलगी व साडूसह दुचाकी (एमएच १९, सीबी ३८५७) ने सेवानगर तांड्याकडे जात होते. दहिवद फाट्यावर महामार्ग ओलांडून दुचाकी वळवत असताना धुळ्याकडून चाळीसगावच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कार (एमएच ४८, एव्ही…

