जळगाव : प्रतिनिधी घरगुती वापरासह व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा करून ठेवणाऱ्या वसीम चंगा शाह (२८, रा. वीर सावरकर नगर, पिंप्राळा) याला रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेत १९ गॅस सिलिंडर जप्त केले. ही कारवाई २७ जून रोजी वीर सावरकर नगरात करण्यात आली. या प्रकरणी शाह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, पिंप्राळा परिसरातील वखारीजवळ एका व्यक्तीच्या घरात विक्री करण्याच्या उद्देशाने गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या साठा केल्याची माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोउनि सचिन रणशेवरे, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, विनोद सूर्यवंशी, अजय सपकाळे यांना कारवाईच्या…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावर दि.२६ जून रोजी घराकडे जात असलेल्या भूषण मोतीलाल पवार (३४) व त्यांचा मोठा भाऊ शरद पवार यांची दुचाकी अडवून जुन्या वादातून तीन जणांनी त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भूषण पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सुरेश आव्हाड करीत आहेत. जुन्या जोशी कॉलनीतील रहिवासी भूषण पवार व त्यांचा भाऊ शरद पवार हे दुचाकीने घरी जात होते. शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावर तीन जणांनी जुन्या वादातून दुचाकी अडविली व शिवीगाळ करीत…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या गृह विभागाच्या निकालामध्ये दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक नारायण व्यंकटराव पाटील यांची लिपिक पदी निवडीबद्दल त्यांचे दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा. वासुदेव पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आपल्या मनोगतात नारायण पाटील यांनी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे आभार व्यक्त केले. शासकीय नोकरीची ही माझी चौथी वेळ आहे याअगोदर माझी डाक सहाय्यक, कालवा निरीक्षक व तलाठी या तीन ठिकाणी निवड झाली होती. परीक्षेचा अभ्यास करत असतांना अनेक वेळा अपयशाला तोंड द्यावे लागते पण विद्यार्थ्यांनी ध्येय, जिद्द, अभ्यासात सातत्य चालू ठेवले पाहीजे यश निश्चित मिळतेच. नारायण पाटील यांनी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये अनेक…
मेष : श्रीगणेश म्हणतात की, वेळ आव्हानात्मक असेल. तथापि, तुम्ही तुमच्या योग्यतेने आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊ शकाल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. भविष्यातील योजनांबाबत कुटुंबासोबत काही चर्चा होऊ शकते. आर्थिक बाबतीत कोणाशी तरी थोडे मतभेद होऊ शकतात. व्यवसायातील घडामोडी मंदावू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकते. आरोग्यामध्ये थोडे चढ-उतार असू शकतात. वृषभ : आजची वेळ थोडा अनुकूल असेल. तुम्ही तुमची विशेष कौशल्ये सुधारण्यात चांगला वेळ घालवाल. फोन किंवा इंटरनेटद्वारे नातेवाईक आणि मित्रांना भेटणे सोपे होईल. विद्यार्थी वर्ग आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेईल. आर्थिक अडचणी आणि त्रास समोर येतील. पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही. कुटुंबातील सदस्यांचे…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या मुद्यावरून काढण्यात येत असलेल्या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ही केवळ राजकीय भूमिका आहे असे मी म्हणणार नाही. कोणाच्याही समोर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतका वेगळ्या पद्धतीने विरोध झाला नसता. असा दावा फडणवीस यांनी केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत. म्हणून काय झाले? मात्र त्यांच्या काही भूमिका आहेत. तर माझ्या काही भूमिका आहेत. सर्वांच्या सारख्या भूमिका असत्या तर सर्व एका पक्षात राहिले असते. त्यामुळे भूमिका वेगळ्या असू शकतात. मात्र उद्धव ठाकरे यांनी जर…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरून वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सरकारला हा निर्णय मागे घेण्यास वेळोवेळी सांगितलेही होते. मात्र त्यावर तोडगा निघत नसल्याने आता ठाकरे बंधूंचा हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा निघणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही, तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे. भाषा, शिक्षण हा एक असा मुद्दा आहे, जो खूप गांभीर्याने घेतला पाहिजे. आपण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जायला पाहिजे. इतर कोणतेही राज्य अशाप्रकारे काम करत नाही. महाराष्ट्र इतका आग्रही पवित्रा…
जग्लाव : प्रतिनिधी कोट्यावधी रुपयाचा चोपडा धरणगाव रस्ता मस्तवाल ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे तसेच कामाच्या दर्जा न राखल्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रोटवद येथील महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर अनेक वाहने खड्ड्यात घसरले असे प्रकार सातत्याने होत आहे. मस्तवाल ठेकेदार विरुद्ध प्रशासन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का की पाकीट घेऊन गप्प बसणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. मस्तवाल ठेकेदार ने मुरूम टाकण्याऐवजी काळी क्षार माती रस्त्यावर नेऊन ठेवली आहे तसेच कामाचा दर्जा देखील खालावला आहे अवघ्या वीस ते तीस टक्के मध्ये हे काम सुरू असून 70 टक्के प्रशासन व मस्तवाल ठेकेदाराच्या खिशात रक्कम जाणार आहे असे चित्र या रस्त्यावरील…
भुसावळ : प्रतिनिधी दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात गुरुवारी (दि. २६ जून) रोजी कामाच्या दरम्यान झालेल्या अपघातात यशवंत भास्कर सोनवणे (वय अंदाजे ४०) या कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे फेकरी गावासह परिसरात शोककळा पसरली असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सविस्तर वृत्त असे कि, मागील १२ वर्षांपासून सोनवणे हे कंत्राटदार धर्मेश पटेल यांच्या अधिपत्याखाली दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत होते. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता ५०० मेगावॅट युनिटमधून १५ कोळशाच्या डब्यांच्या गाड्या २१० मेगावॅट युनिटमध्ये हलविण्याचे काम सुरू होते. यावेळी रेल्वे लोकोमोटिव्हद्वारे रिलीव्ह करताना सोनवणे हे कपलिंग सेटिंगचे काम करत होते. दरम्यान, अचानक पाण्याचा फवारा सुरू झाल्यामुळे चालकाचे लक्ष…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील जोगलखेडे शिवारात दि. २७ रोजी ८ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. या जखमींना घेण्यासाठी गेलेल्या रुग्णवाहिकेलाही आग लागली. त्यात वाहन जळून खाक झाले. सविस्तर वृत्त असे कि, जोगलखेडे शिवारात दोन मोटरसायकलींचा समोरासमोर अपघात झाला. त्यात विमल सुकल्या वसावे रा. वेलखेडी, जि. नंदुरबार, रोहन विश्राम पावरा, रा. हिसाळे, ता. शिरपूर, जि. धुळे व मनीषा जितेंद्र राठोड, जितेंद्र राठोड दोन्ही रा. आडगाव तांडा, ता. पारोळा हे चारही जण जखमी झाले. जखमींना घेण्यासाठी गेलेल्या दोन रुग्णवाहिका गेल्या होत्या. नरेंद्राचार्य महाराज यांच्या संस्थानच्या या रुग्णवाहिकेतून चारही जखमींना बसवण्यात आले व पारोळा…
जळगाव : प्रतिनिधी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अपघातांमध्ये तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी रामानंद नगर, शनिपेठ व एमआयडीसी पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, नेरी नाका परिसरात २५ जून रोजी भरधाव ट्रकने (एमएच १९ सीवाय ५९४०) दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीस्वार मधुकर पाटील (७३, रा. तुळसाई नगर) हे खाली कोसळले. मागून येणाऱ्या डंपरचे (एमएच १९ सीवाय ४१८०) चाक वृद्धाच्या हातावरून गेले. त्यामुळे वृद्ध गंभीर जखमी झाले. या प्रकरणी ट्रक व डंपर चालकाविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सोबतच रस्ता ओलांडण्यासाठी कडेला उभे असलेल्या शेख मुक्तार मोहंमद शफी पिंजारी (५८, रा.…

