मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यात सोन्याच्या किमतीने १ लाख रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. मात्र, तेव्हापासून त्यात सतत चढ-उतार येत आहेत. बुधवारी, प्रति १० ग्रॅम सोन्याच्या किमतीत १०० रुपयांची घसरण झाली आहे. आर्थिक राजधानी मुंबईत २२ कॅरेट सोने ८९,३५० रुपयांना विकले जात आहे, तर २४ कॅरेट सोने ९७,४८० रुपयांना व्यवहार करत आहे. मुंबईत चांदीच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही आणि ती १,००,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. एमसीएक्सवर, सोन्याचा भाव ०.४२ टक्क्यांनी घसरून ९६,०१४ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे, तर…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी दुचाकी लावण्याच्या शुल्लक कारणाने किरकोळ वाद होवून एरंडोल शहरातील गाढवे गल्लीत राहणाऱ्या अमोल कैलास पाटील (वय ३४) या तरूणाला बेदम मारहाण करून डोक्याला गंभीर दुखापत केल्याची घटना घडली होती. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना बुधवारी २८ मे रोजी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला आहे. यावेळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल शहरातील गाढवे गल्लीत अमोल पाटील हा परिवारासह वास्तव्याला असून दि.२५ मे रोजीच्या सायंकाळी मोटारसायकल लावण्याच्या कारणावरून त्यांच्या घराशेजारी राहणारे तुकाराम उर्फ आप्पा सिताराम पाटील, रोहित उर्फ बंटी तुकाराम पाटील, आशिष उर्फ आशू तुकाराम पाटील, दीपक (गोल्या) नामदेव पाटील…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच असून मंगळवारी मराठवाड्यातील २५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यात मायलेकींसह पुतणी असे तीन तर अहिल्यानगरात पावसामुळे भिंत कोसळून २ महिला ठार झाल्या तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वीज पडून ३ बळी गेले आहेत. नांदेड जिल्ह्यात शेतातून घरी येताना नाल्याच्या पुरात मायलेकी आणि पुतणी अशा तिघी जणी वाहून गेल्याची घटना वरवट (ता. हदगाव) येथे मंगळवारी दुपारी घडली. या घटनेत तिघींचा मृत्यू झाला. अरुणाबाई बळवंत शकर्गे (३७), दुर्गा बळवंत शकर्गे (१०) या मायलेकींसह पुतणी समीक्षा विजय शकर्गे (८) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. लातूरला मंगळवारी विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाने मुख्य रस्त्यांवर पाणी साचले.…
पारोळा : प्रतिनिधी सबगव्हाण टोल नाक्यावर दि २५ रोजी पावणेतीन वाजेच्या सुमारास टोल भरण्याच्या कारणावरून शाब्दिक वाद झाल्याने दुसऱ्या दिवशी आठ ते दहा तरुणांनी मिळून टोलनाक्यावर हुज्जत घालून कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, सबगव्हाण येथे दि. २५ रोजी पावणेतीन वाजेच्या सुमारास टोल नाक्यावर चारचाकी गाडी (एमएच १०/एलएन६९९०) आली असता चालक विनायक भोई याने टोल प्रशासनातील कर्मचाऱ्यांशी टोल भरण्याच्या कारणावरून वाद घातला. याप्रकरणी दि २६ रोजी विनायक मोतीलाल भोई, भूषण भागवत सोनवणे, गोविंदा वसंत माळी महेश किरण चौधरी, ऋषिकेश महेश माळी, लोकेश संजय गायकवाड, चेतन छोटू भोड़, कैलास संजय भोई, पवन मोतीलाल भोई,…
जळगाव मिरर | २८ मे २०२५ चुचांळेकडून चोपडा श-हराकडे येत असलेल्या दुचाकीस्वारावर चोपडा पोलिसांनी कारवाई केली. त्या दुचाकीस्वाराकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरात दुचाकीवरुन गांजाची वाहतुक होत असल्याची माहिती चोपडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सपोनि एकनाथ भिसे, पोहेकॉ संतोष पारधी, लक्ष्मण शिगाणे, रितेश चौधरी, ज्ञानेश्वर जवागे, पोना संदिप भोई, पोकॉ विनोद पाटील, निलेश वाघ, महेंद्र पाटील यांचे पथक रवाना केले. या पथकाने मंगळवारी सकाळच्या सुमारास चुंचाळे रोडवरील एमएसडबल्यू महाविद्यालयाजवळ सापळा रचला. यावेळी चुंचाळेकडून चोपड्याकडे येत असलेल्या (एमपी ४६,…
धरणगाव : प्रतिनिधी शेतात काम करीत असतांना पाणी पिवून येतो असे सांगून गेलेल्या गिरीश सुकदेव माळी (वय ३५, रा. रामलीला चौक) या तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास धरणगाव शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव येथील रामलीला चौकात राहणारे गिरीश माळी हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. त्यांचे धरणगाव शिवारात शेत असून मंगळवारी सकाळच्या सुमारास ते शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते. भेंडी तोड असतांना गिरीश माळी हे सोबत काम करणाऱ्यांना मी पाणी पिवून येतो असे सांगून विहरीजवळ गेले. परंतू बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने त्यांचा…
जळगाव : प्रतिनिधी सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून तरुणीसोबत हॉटेलमध्ये फोटो आणि व्हिडीओ काढले. त्या फोटोंसह व्हीडीओ आणि तरुणीसोबत झालेली चॅटींग तरुणीच्या आई वडीलांना दाखविण्याची भीती दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार केला. ही घटना दि. २६ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे (वय २७, रा. बोरजवळा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका तालुक्यात २३ वर्षीय तरुणी वास्तव्यास असून ती शिक्षण घेत आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये या तरुणीचे विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे या तरुणासोबत इन्सटाग्राम या सोशल मीडियावर ओळख झाली. त्यानंतर तरुणाने त्या तरुणीला शहरातील एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलाविले. त्याठिकाणी…
जळगाव : प्रतिनिधी चोपडा ते यावल रस्त्यावरील गॅस पंपाजवळ २७ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दुचाकी आणि अज्ञात वाहनात झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आ हे. तर सोबतचा बसलेला तरुणही गंभीर जखमी झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील पिंटू प्रकाश सोनवणे (वय २१) हा या अपघातात जागीच ठार झाला. तर सोबत असलेला तालुक्यातील अड-ावद येथील आकाश गणेश कोळी (वय २१) हा गंभीर जखमी झाला आहे. तसेच जळगाव तालुक्यातील नांद्रा येथील अक्षय जगन्नाथ सोनवणे याला किरकोळ मार लागला आहे. दरम्यान, चोपडा शहरातून अडावद येथे दुचाकीने जात असताना चोपडा ते यावल रस्त्यावर दुचाकी…
मेष राशी आज तुम्ही साहस दाखवाल. तुम्हाला वरिष्ठ नातेवाईकाकडून मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन करार होतील. कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळा सरकारी मदतीने दूर होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमची जवळीक वाढेल. वृषभ राशी आज तुम्ही तुमच्या जवळच्या जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवाल. कुटुंबात तुम्ही करत असलेल्या त्यागामुळे, तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून अपार प्रेम आणि आदर मिळेल. मिथुन राशी कामाच्या ठिकाणी संयम ठेवा. सहकाऱ्यांमध्ये, विशेषतः कामाच्या ठिकाणी, समन्वय राखण्याची गरज असेल. तुमच्या विरोधकांशी जास्त वाद घालण्याची परिस्थिती टाळा. तुमच्या विरोधकांपासून सावध राहा. काम पूर्ण होईपर्यंत ढोल पिटू नका. कर्क राशी आज पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. व्यवसायात सामान्य आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून त्यामध्ये 10 मोठ्या निर्णयावर मोहोर लावण्यात आली आहे. राज्यात यापुढे शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे. महसूल खात्यामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची आपसामध्ये वाटणी करायची असेल तर एकूण रेडीरेकनरच्या एक टक्के किंमत मोजावी लागायची. आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता फक्त 500 रुपयांमध्ये ही वाटणी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे…

