Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात प्रमुख आरोपींमध्ये समावेश असल्याचा आरोप केला जाणारा नीलेश चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. नीलेश गेल्या काही दिवसांपासून फरार होता. मात्र आता त्याला नेपाळमधून पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश चव्हाण याच्यावर बाळाची हेळसांड केल्याचा तसेच कस्पटे कुटुंबावर बंदूक रोखण्याचा देखील आरोप आहे. नीलेश चव्हाण याच्या अटकेनंतर आता या प्रकरणात अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी संबंधित प्रकरणात पीडित कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्या प्रकरणी नीलेश चव्हाण या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणावर वैष्णवीचे बाळ घेण्यासाठी गेलेल्या वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप आहे. तसेच…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या सडेतोड आणि थेट शैलीमुळे चर्चेत आले आहेत. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यावर पंचनाम्यांची मागणी होत आहे. मात्र, कोकाटे यांनी दिलेलं “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यात सुमारे सात हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान केले असून, यामध्ये कांद्याचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेला कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला होता, पण आर्द्रतेमुळे कांद्याला बुरशी लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांकडून कापणी झालेल्या पिकांचाही पंचनामा करावा, अशी मागणी होत असताना कोकाटे यांनी…

Read More

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात महिलांबाबत धक्कादायक घटना घडत असतांना आता कोल्हापूर जिल्ह्यातील राजारामपुरी येथे एक धक्कादायक उघडकीस आली आहे. एका चाळीस वर्षीय महिलेला तिच्या भाच्याने साखळदंडाने बांधून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, क्राइम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी साखळदंडातून सदरील महिलेची सुटका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजारामपुरी परिसरामध्ये एका महिलेला साखळदंडातून मुक्त करण्यात आले आहे. सारिका साळी असे या चाळीस वर्षीय महिलेचे नाव असून पोलिसांनी या महिलेची सुटका केली आहे. संबंधित महिला ही वेडसर असून रस्त्यावर फिरताना काहीही उचलून घेते आणि खाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तिच्या घरच्या मंडळींनी तिला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशात महाराष्ट्राचा कोरोनाच्या रुग्ण संख्यामध्ये दुसरा नंबर आला असताना आता राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असून गुरुवारी 76 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक 27 , ठाणे मनपा 12, पुण्यात 21, कल्याण 8 कोल्हापूर व अहिल्यानगर 1, नवी मुंबई 4, रायगडमध्ये 2 रुग्ण आढळून आला आहे. तर आजअखेरपर्यंत मृतांची संख्या 7 वर पोहोचली आहे. जानेवारी 2025 पासून राज्यात एकूण 9592 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 597 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी आज सक्रिय रुग्ण 425 आहेत. त्यातील 379 रुग्ण मुंबईत सापडले आहेत. आतापर्यंत 165 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये…

Read More

जळगाव : प्रतिनिधी व्याजाच्या पैशांवरून सुरू झालेल्या वादातून एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४:३० वाजता घडली आहे. या घटनेत संशयित आरोपींनी व्यापाऱ्याला बुलेटवर उचलून नेऊन पाइपने मारहाण केली आणि जिवे मारण्याचीही धमकी दिली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, महेश अशोक मराठे (वय ४४, रा. चौघुले प्लॉट, शनिपेठ) या व्यापाऱ्याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनेच्या दिवशी सागर सपके याने व्याजाने दिलेले पैसे परत मागितले. महेश मराठे यांनी ‘मी तुमचे सर्व पैसे परत केले आहेत,’ असे सांगितले. पण हे ऐकून सागर सपके आणि राधेश्याम शर्मा यांचा राग अनावर झाला.  त्यांनी…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी पत्नीचे मेडिकल बिल मंजूर करवून घेण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या निपाणेतील हरिहर माध्यमिक हायस्कूलमधील मुख्याध्यापक संदिप प्रभाकर महाजन (४५) याला ३ हजार ६०० रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. याप्रकरणी कासोदा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. सविस्तर वृत्त असे कि, या शाळेतील एका कर्मचाऱ्याच्या पत्नीचे २३ हजार ८१५ रूपयांचे वैद्यकीय बिल होते. हे बिल मंजूर होण्यासाठी या कर्मचाऱ्याने महाजन यांच्याकडे ते सादर केले होते. हे बिल आपण आपल्या ओळखीने जिल्हा रुग्णालय व वेतन अधिक्षक, माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडून मंजूर करवून घेतो, असे आश्वासन महाजन याने दिले होते. यासाठी महाजन याने सुरूवातीला ५ हजार…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ महामार्गावर गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास मालवाहू वाहनाने रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकला (क्रमांक आर. जे. १९, जी.एफ. ९७८६) धडक दिली. त्यात मालवाहू वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत चालकाचे नाव अक्षय सुधाकर खिल्लारे (वय २८, रा. किसन नगर, शिवणी, ता. अकोला) असे आहे. एका वाहनास ओव्हरटेक करत असताना त्याच्या पिकअपने महामार्गावर निष्काळजीपणे उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, अक्षय यास गंभीर दुखापत झाली. त्यास तत्काळ ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर येथे उपचारासाठी हलविण्यात आले.…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका लॉजमध्ये थांबलेल्या दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी पुणे येथून दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सविस्तर वृत्त असे कि, मूळच्या बांगलादेशातील दोन तरुणी दिल्लीहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान त्या भुसावळमधील एका लॉजमध्ये थांबल्या. त्यांनी लॉजमध्ये दाखवलेले आधार कार्ड हे संशयास्पद वाटल्याने लॉज व्यवस्थापकाने पोलिसांना याची माहिती दिली. बाजारपेठ पोलिस स्टेशनच्या पथकाने तत्काळ कारवाई करत दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. तपासात आधार कार्ड बनावट असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात पोलिसांनी पुणे येथून रंगा देवअप्पा अरकरी (वय ४५) व कुलमणी…

Read More

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्हाला तुमच्या कोणत्याही विशेष कामात यश मिळेल आणि लोकांना तुमच्या कौशल्यांची आणि पात्रतेची खात्री पटेल. जर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित कोणतेही काम सुरू असेल तर लगेचच कारवाई करायला सुरुवात करा. विद्यार्थ्यांनी वाईट संगत आणि सवयींपासून दूर राहावे. अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन आणि सल्ल्याचे पालन करावे. दिखाऊपणापासून दूर राहावे आणि जीवनातील वास्तवाचा सामना करावा. व्यवसायात तुमची कार्यक्षमता आणि कामाची कार्यक्षमता सुधारण्याची आवश्यकता आहे. कामात सतत मिळणाऱ्या यशाचा तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ देऊ नका. आरोग्य उत्तम राहील. वृषभ राशी प्रतिष्ठित लोकांशी भेटल्याने तुमचे व्यक्तिमत्व हलके होईल आणि काही नवीन गोष्टी देखील उघड होऊ शकतात. इतरांची मदत घेण्याऐवजी…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरु असलेली मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मोठी घोषणा करत, “ज्यांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे, त्यांना १० हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाईल,” असं स्पष्ट केलं आहे. अजित पवारांनी आज बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबुडी गावातील पावसाने बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोसळलेली घरे, वाहून गेलेले रस्ते, वीज खांब यासारख्या नुकसानीच्या ठिकाणांना भेट देत गावकऱ्यांशी संवाद साधला आणि प्रशासनाला तातडीने पंचनामे करून मदतीचे आदेश दिले. “पंचनामे सुरू आहेत. घरात पाणी शिरलेल्यांना 10 हजार रुपये देतो. लवकरच पैसे…

Read More