Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भुसावळात दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
    क्राईम

    भुसावळात दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

    editor deskBy editor deskMay 30, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शहरातील एका लॉजमध्ये थांबलेल्या दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी पुणे येथून दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, मूळच्या बांगलादेशातील दोन तरुणी दिल्लीहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान त्या भुसावळमधील एका लॉजमध्ये थांबल्या. त्यांनी लॉजमध्ये दाखवलेले आधार कार्ड हे संशयास्पद वाटल्याने लॉज व्यवस्थापकाने पोलिसांना याची माहिती दिली. बाजारपेठ पोलिस स्टेशनच्या पथकाने तत्काळ कारवाई करत दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. तपासात आधार कार्ड बनावट असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात पोलिसांनी पुणे येथून रंगा देवअप्पा अरकरी (वय ४५) व कुलमणी रंगा अरकरी (३६) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, हे पती-पत्नी असून पत्नी पश्चिम बंगालची व पती कर्नाटकचा रहिवासी आहे.

    गुरुवारी या दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत. बांगलादेशी महिला भुसावळात थांबल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणी सखोल तपास सुरु आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    नशिराबादमध्ये पोलिसांची धडक कारवाई; बसस्थानक परिसरातून कट्ट्यासह सराईत आरोपी अटकेत

    April 20, 2026

    गावठी पिस्तूलसह दोन संशयित पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.