Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात मोकाट कुत्र्याच्या हल्यात बालकाचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    जळगावात मोकाट कुत्र्याच्या हल्यात बालकाचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskJune 2, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील नागेश्वर कॉलनी परिसरात अंगणात खेळत असलेल्या अरविंद सचिन गायकवाड (४ वर्षे) या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला करीत, त्याच्या चेहरा, मान, गळ्याचे अक्षरशः लचके तोडले. यात या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी नागेश्वर कॉलनीत घडली, याशिवाय अन्य चार ते पाच जणांनाही कुत्र्याने चावा घेतला. दरम्यान, या घटनेनंतर नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात महापालिकेच्या कारभारावर रोष व्यक्त केला. मजुरी काम करणारे सचिन गायकवाड यांचा मुलगा अरविंद हा रविवारी संध्याकाळी अंगणात खेळत होता. त्यावेळी अचानक कुत्र्याने या बालकावर हल्ला केला. मानेवर व गळ्यावर जोरदार चावा घेतल्याने खोलवर जखमा झाल्या आहेत. या बालकाला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.

    शहरात मोकाट भटकणाऱ्या व नागरिकांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या कुत्र्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी शाळेत व क्लासला जाणारे मुले, मॉर्निंग वॉक करणारे नागरिक, रात्री उशिरा कामावरून घरी परतणारे कर्मचारी कामगारांवर ही मोकाट कुत्रे हल्ले करतात. शहरात अनेक भागातून जाणे आता धोक्याचे झाले आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेने निर्बिजीकरण व भटक्या कुत्र्याच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

    April 14, 2026

    पत्नीसमोरच तरुणाची हत्या; जुन्या वैमनस्यातून हल्ला, सहा आरोपी अटकेत !

    April 14, 2026

    मनपाच्या महासभेत व्हीसीव्दारे उपस्थित राहण्याची परवानगी द्या ; वैशाली पाटील यांची मागणी !

    April 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.