Author: editor desk

मेष राशी आजचा दिवस आनंददायी असेल. आज तुम्ही तुमच्या घराच्या नूतनीकरणाकडेही लक्ष द्याल. मित्र आणि कुटुंबासमवेत वेळ घालवा. भौतिक सुविधांमध्ये वाढ होईल. आज तुम्हाला कोणत्याही वादात पडणे टाळावे लागेल, ते तुमच्यासाठी चांगले असेल. मुले आज एखाद्या स्पर्धेत भाग घेतील, ज्यामध्ये त्यांना यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमचा कोणताही निर्णय तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. वृषभ राशी या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमची प्रतिभा दाखवू शकाल. आज जर तुम्ही अंदाजपत्रक तयार करून पुढे गेलात तर ते भविष्यासाठी चांगले ठरेल. आज तुम्हाला मित्रांच्या पुढे पुढे करणं टाळावं लागेल, अन्यथा तुमचे अतिरिक्त पैसे खर्च होऊ शकतात. जर तुम्हाला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरूण तलावात दि.७ जून २०२५ रोजी रविवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय मोहम्मद नदीम शेख या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली असून, तब्बल दोन ते अडीच तासानंतर प्रशासनाच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद नदीम शेख हा काही मित्रांसह तलाव परिसरात गेला होता. पोहत असताना त्याचा श्वास घ्यायला त्रास झाल्याने तो पाण्यात बुडाला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र प्रशासनाची मदत पोहोचायला दोन तासांचा विलंब…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील भारतीय स्टेट बँकेचे (SBI) ग्राहक असाल तर ही महत्त्वाची माहिती आहे. बँकेच्या देखभाल व प्रणाली अद्ययावत करण्याच्या कामामुळे काही डिजिटल सेवा ८ जून २०२५ रोजी पहाटे काही काळासाठी बंद राहणार आहेत. बँकेने ही माहिती अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे. बँकेने कळवले आहे की नियोजित देखभाल कार्यामुळे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI), IMPS, YONO, रिटेल इंटरनेट बँकिंग, NEFT आणि RTGS या सेवा ८ जून रोजी पहाटे ३.४५ ते ४.३० या वेळेत उपलब्ध राहणार नाहीत. त्यानंतर सर्व सेवा सुरळीतपणे पुन्हा सुरू होतील. बँकेने ग्राहकांना सल्ला दिला आहे की, या वेळेत आवश्यक व्यवहार आधीच पूर्ण करून घ्यावेत. तसंच, UPI…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यात ठाकरे बंधू यांची युती होणार असल्याचे संकेत असतांना राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. मात्र, या संभाव्य एकीबाबत कोणताही ठोस निर्णय अद्याप झाला नसल्याचे स्पष्ट आहे. अशा स्थितीत, एकीकडे ठाकरे गटात नेत्यांची सतत ‘इनकमिंग’ सुरू असून दुसरीकडे मनसेमधून नेत्यांची गळती वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पुणे दौऱ्यावर असताना पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी राज ठाकरे यांच्या सभांबाबत खळबळजनक निरीक्षण मांडले. “राज ठाकरे यांच्या सभा आकर्षक आणि गजबजलेल्या असतात, त्यांना चांगली गर्दी मिळते, मात्र त्या सभा मतांमध्ये रूपांतरित…

Read More

पुणे  : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेवर विरोधकांनी टीका केलीच आहे, परंतु आता शिंदे गटाच्याच आमदाराने घरचा आहेर दिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. लोकांवर असा कोट्यवधींचा निधी उधळण्यापेक्षा ते पैसे गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी खर्च करा, असा सल्ला गायकवाड यांनी दिला आहे. रायगड येथे माध्यमांशी बोलताना संजय गायकवाड म्हणाले, 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. शिवरायांची भक्ती आणि कीर्ती ही ओसांडून वाहत आहेत. राजेंची कीर्ती जगात पसरलेली आहे. रायरीचा डोंगर राजेंनी किल्ले रायगडसाठी निवडला. या ठिकाणी 350 इमारती असलेला किल्ला…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी चार दुकानांचे शटर फोडून रोकड व इतर साहित्य चोरून नेले. तर दोन दुकानांच्या बाहेरून एसीच्या तांब्याच्या नळ्याही कापून नेल्या. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी स्वराज्य पान सेंटर, टीडीसी कुरिअर कॅमेरा या चार ठिकाणच्या शटरचे कुलूपे तोडली. तर सोहम डिजिटल कलर लॅब व आर. पी. इंटरप्रायझेस या दोन दुकानांच्या एसीच्या तांब्याच्या नळ्या बाहेरच्या बाहेर कापून नेल्या. मिळालेल्या माहितीनुसार, काही ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले आहेत हे व्यापारी संकुल बाजारपेठ पोलिस ठाण्यालगत असतानाही चार दुकाने फोडली गेली. ही गंभीर बाब व्यापारी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चांदीची भाववाढ सुरूच असून, शुक्रवारी (६ जून) एकाच दिवसात ४ हजार १०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी एक लाख पाच हजार ८०० रुपये अशा नव्या उच्चांकी भावावर पोहोचली आहे. सोन्याच्या भावातही ३०० रुपयांची वाढ होऊन ते ९७ हजार ८०० रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या पाच दिवसांपासून सोने चांदीचे भाव दररोज वाढत आहेत. यात सोन्याच्या भावात फारशी वाढ झाली नाही. मात्र, चांदीच्या भावात गुरुवार, ५ जूनवगळता दररोज मोठी भाववाढ सुरू आहे. २ जून रोजी ५०० रुपयांची वाढ होऊन चांदी ९८ हजारांवर पोहोचली होती. ३ रोजी दोन हजार ५००, ४ रोजी एक हजार १०० रुपयांच्या वाढीसह चांदी एक लाख एक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील निंभोरा येथील ३३ वर्षीय तरुणाला नाशिक येथे नोकरी मिळाल्यानंतर आईसह गावी परतत असताना आनंदा अशोक रजाने या तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. रेल्वेत आई त्याची वाट पाहत राहिली… पण काही वेळातच मुलाचा मृतदेहच तिच्या नजरेस पडला! ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी, ६ जून रोजी सकाळी आसोदा शिवारात घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, निंभोरा येथील आनंदा रजाने हा तरुण नाशिक येथे मामाकडे आईसह कामाच्या शोधात गेला होता. तेथे एका कंपनीत त्याला नोकरी मिळाली. अवघ्या आठवडाभराच्या कामानंतर तो शुक्रवारी सकाळी आईसह गावी परतण्यासाठी रेल्वेने भुसावळ मार्गे निघाला.…

Read More

मेष राशी आज सौख्याचा दिवस आहे. आज तुम्ही तुमच्या घराच्या नूतनीकरणाकडेही लक्ष द्याल. मित्र आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवाल. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आज तुम्ही कोणत्याही वादविवादात अडकू नका, हेच तुमच्यासाठी योग्य ठरेल. तुमचा मुलगी किंवा मुलगा आज एखाद्या स्पर्धेत भाग घेईल, आणि त्यात त्याला यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. तुमचाच एखादा निर्णय तुमच्यासाठी अडचणीचं कारण ठरू शकतो. वृषभ राशी आज कर्जातून मुक्त व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमचं कौशल्य इतरांना दाखवू शकाल. आज बजेट तयार करून पुढे गेलात, तर ते भविष्यासाठी लाभदायक ठरेल. भपकेगिरीपासून दूर राहा, अन्यथा तुमचा पैसा अधिक खर्च होऊ शकतो. एखाद्या गोष्टीमुळे मन अस्वस्थ…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने माऊली आणि तुकोबांच्या पालख्या सुरु होण्याअगोदर एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांवर माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांंचा पंढरीच्या दिशेने प्रस्थान सोहळा येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून प्रस्थान सोहळ्याच्या तयारीला सुरूवात केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या वाकऱ्यांची संख्या मोठी असते. यामुळे माहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने आषाढी वारीकरिता पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी ७५० बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून वारीला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर या बसेस सोडण्यात येणार आहेत. पुणे विभागातील १४ आगारांतून पंढरपूरसाठी एसटी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सहा जुलै रोजी आषाढी…

Read More