Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : एसबीआयचे ‘या’ दिवशी राहणार डिजिटल सेवा बंद !
    क्राईम

    ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : एसबीआयचे ‘या’ दिवशी राहणार डिजिटल सेवा बंद !

    editor deskBy editor deskJune 7, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशभरातील भारतीय स्टेट बँकेचे (SBI) ग्राहक असाल तर ही महत्त्वाची माहिती आहे. बँकेच्या देखभाल व प्रणाली अद्ययावत करण्याच्या कामामुळे काही डिजिटल सेवा ८ जून २०२५ रोजी पहाटे काही काळासाठी बंद राहणार आहेत. बँकेने ही माहिती अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे.

    बँकेने कळवले आहे की नियोजित देखभाल कार्यामुळे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI), IMPS, YONO, रिटेल इंटरनेट बँकिंग, NEFT आणि RTGS या सेवा ८ जून रोजी पहाटे ३.४५ ते ४.३० या वेळेत उपलब्ध राहणार नाहीत. त्यानंतर सर्व सेवा सुरळीतपणे पुन्हा सुरू होतील.

    बँकेने ग्राहकांना सल्ला दिला आहे की, या वेळेत आवश्यक व्यवहार आधीच पूर्ण करून घ्यावेत. तसंच, UPI Lite व ATM सेवा या वेळेत वापरण्याचीही सूचना देण्यात आली आहे.

    UPI Lite चा वापर करून लहान रकमेचे व्यवहार UPI PIN शिवाय करता येतील. तर एटीएमच्या माध्यमातून रोख रक्कम काढणे व काही मूलभूत सेवा उपलब्ध असतील.

    एसबीआयने स्पष्ट केले आहे की, ही देखभाल प्रक्रिया नेहमीच ठराविक कालावधीत केली जाते आणि यामुळे काही सेवा काही वेळेसाठी बंद ठेवण्यात येतात.

    ग्राहकांनी आपल्या महत्त्वाच्या व्यवहारांपूर्वीच पूर्ण करून घ्यावेत, तसेच कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास तत्काळ बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन एसबीआयने केले आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव तालुक्यातील भोलाणे येथे तरुणाचा खून; जवळच्या मित्रावर संशय

    January 14, 2026

    सोनवद–अहिरे रस्त्यावर भीषण अपघात; भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

    January 12, 2026

    जळगाव महापालिका रणसंग्राम : प्रफुल्ल देवकर यांना अपक्षांचा पाठिंबा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

    January 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.