Author: editor desk

किल्ले रायगड : वृत्तसंस्था साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी तत्कालीन राजवटीमध्ये असलेल्या परकीय लोकांना पातशाहींना येथून घालवले. त्यानंतर सार्वभौम साम्राज्याची निर्मिती करून स्वतःचा शिवराज्याभिषेक करून घेतला. हा दिवस आज सर्वांसाठी पवित्र आहे. आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला असला तरी शिवराज्याभिषेक दिनाचे महत्त्व ओळखून शासनाने हा दिन राष्ट्रीय सण म्हणून घोषित करावा, अशी मागणी रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज (दि.६) केली. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित लाखो शिवभक्तांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रतिवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर तारखेनुसार आज (दि. ६) अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील  वाडी गावाजवळील शेवाळे येथे एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा लोखंडी रॉडने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना ५ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास येथे एका उघडकीस आली आहे.  या घटनेत जनाबाई माहरु पाटील यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील सोन्याच्या बाळ्या ओरबाडून पोबारा केला. या घटनेने पाचोरा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शेवाळे येथील जनाबाई पाटील या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा कृष्णराव माहरु पाटील हे शेजारील दुमजली घरात राहतात. घटनेच्या दिवशी, गुरुवारी कृष्णराव पाटील हे त्यांच्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा येथे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीने (एमपीसीने ) धोरण आढाव्यात रेपो दर ५० बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.५% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आज (दि. ६ जून) आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. एमपीसीने लिक्विडिटी ॲडजस्टमेंट सुविधेअंतर्गत पॉलिसी रेपो रेट हे तात्काळ लागू होईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. दरम्‍यान, एकीकडे, दर कपातीमुळे सामान्य लोकांवरील गृहकर्जाचा भार कमी होईल तर दुसरीकडे, त्यांच्या FD वरील व्याज देखील कमी हाेणार आहे. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा म्‍हणाले की, एमपीसीने लिक्विडिटी ॲडजस्टमेंट सुविधेअंतर्गत पॉलिसी रेपो रेट ५० बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.५% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील विचेखडेजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ४ रोजी घडली घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विचखेडेजवळ दि. ४ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास विजय अंभोरे (२४), नितीन पगारे (२४), रामा कौतिक कंडारे (१८, पारोळा) हे दुचाकीने वसनगर येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जात असताना गाडी नादुरुस्त झाली होती. ही गाडी लोटून आणत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (एमएच०१/एएक्स ९९१६) जोरदार धडक दिली. त्यात तिघेही गंभीररित्या जखमी झाले. दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तिघांनाही तात्काळ रुग्णवाहिकेतून चालक आशुतोष शेलार यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता विजय अंभोरे याचा वाटेतच मृत्यू…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी मेहुणबारे येथून जवळच असलेल्या शिदवाडी येथे शेतीच्या वादातून सख्ख्या काकांच्या त्रासाला कंटाळून ४१ वर्षीय पुतण्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. चरणसिंग जाधव (राजपूत) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून व्हॉटस्अॅप ग्रुपवर टाकून आपले जीवन संपवले. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. चरणसिंगचे भाऊ चेतन जाधव (राजपूत) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जामदा शिवारातील शेतीच्या वाटणीवरून दोन्ही काका व त्यांची मुले यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होता. चरणसिंग जाधव याला मारून टाकण्याच्या धमक्या काकांकडून दिल्या जात होत्या. शेतीचा…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी विजेच्या तारांचे काम करणाऱ्या मध्यप्रदेशातील मजुरांनी ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप व पहारने मारून गंभीर जखमी केल्याची घटना २९ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पातोंडा येथे वि. का. सोसायटीच्या गोदामात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे राजेश शामसिंग प्रजापती (खापरखेडा, ता. पिपरिया, मध्यप्रदेश) याने विद्युत वाहिनी टाकण्याचे काम घेतले असून त्याचा भाऊ कैलास शामसिंग प्रजापती हा कामासाठी मजूर आणत असतो. २९ रोजी तो बिजाधना छिंदवाडा येथून मजूर घेऊन पातोंडा येथे पोहचला. २९ रोजी कैलास मजुरांसह पातोंडा येथील वि. का. सोसायटीच्या गोदामात झोपले होते. रात्री सलीम उर्फ संदीप धुर्वे, गोपाळ धुर्वे, साहुलाल धुर्वे, पंकज सेलू उमरावसिंग, शिवम फुलसिंग…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आजारातून होण्यासाठी सोनपोत मंत्रवून देण्याचा बहाणा करीत कस्तुराबाई लक्ष्मण पाटील (६०, रा. जामणेगाव, ता. पाचोरा) यांच्या गळ्यातील सोनपोत लांबविल्याप्रकरणी गुलजार लाठिया बजरंगी (७७, रा. जाखनीनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणात बजरंगीच्या मुलाचाही समावेश असून, त्याचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल रोजी, भजे गल्लीतून पायी जाणाऱ्या कस्तुराबाई पाटील यांचा विश्वास संपादन करून त्यांची सोन्याची पोत दोन अज्ञातांनी फसवणूक करून लांबविली होती. याचा तपास सुरू असताना फसवणूक करणारे बाप-बेटे असून ते जाखनी नगरात राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी पोउनि. शरद बागल, सहायक फौजदार अतुल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली प्र.बो येथे घरासमोर लावलेल्या कारवर सिमेंट उडण्याच्या कारणावरून हेमंत साहेबराव खलसे (वय २२) यांच्यासह त्यांच्या घरातील चार जणांना चौघांनी कोयता, फायटरने मारहाण केली. ही घटना ४ जून रोजी शिरसोली येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे हेमंत खलसे यांच्या शेजारी घराच्या अंगणात कार उभी होती. त्यावर सिमेंट उडाल्याने वाद झाला. त्यातून चार जणांनी हेमंत यांच्यासह त्यांचे काका भगवान खलसे यांना कोयत्यासारख्या शस्त्राने व फायटरने मारहाण करीत गंभीर जखमी केले. तसेच भाऊ किरण खलसे व आई मंगलाबाई खलसे यांनाही शिवीगाळ करीत मारहाण केली.  या प्रकरणी हेमंत…

Read More

मेष राशी तुमच्या कामाच्या पद्धतीत सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न करा. निरुपयोगी वादात अडकू नका. तुम्हाला परीक्षा किंवा स्पर्धेशी संबंधित काम, अभ्यास करण्याची इच्छा होणार नाही. मन इकडे-तिकडे भटकत राहील. वृषभ राशी आज तुम्हाला जवळचा मित्र भेटू शकतो. कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. न्यायालयीन प्रकरणांमध्ये वेळेवर काम करा. तुरुंगात असलेल्या लोकांना तुरुंगातून सुटका मिळू शकते. तुम्हाला काही अनावश्यक कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. मिथुन राशी आज तब्येत थोडी नरम असेल. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. शारीरिक आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल. कर्क राशी आज तुम्हाला छान बातमी मिळू शकेल. नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या मदतीने कामाच्या क्षेत्रातील अडचणी कमी होतील.…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपने ‘सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता’ हे समीकरण चांगलं खेळलं आहे. नागपूर महापालिकेत अनेक समस्या प्रलंबित असताना भाजपने केवळ पैशाच्या बळावर सत्तेवर ताबा मिळवण्यावर भर दिला आहे. शहराच्या विकासाऐवजी सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारला आहे. आम्ही हे सर्व प्रश्न जनतेसमोर मांडणार आहोत. महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी नागपूरच्या विकासाऐवजी फक्त व्यक्तिगत फायद्यासाठी निर्णय घेतले आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूरचेच असूनही शहराच्या विकासाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आहे, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व…

Read More