मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल होत असतांना आता मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्येही मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 8 जून रोजी संपूर्ण राज्यामध्ये पाऊस सक्रिय राहणार आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे सामान्यतः ढगाळ आकाश राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरीला 8 जूनसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सोलापूरमध्ये…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील पिंपळगांव हरेश्वर येथून जवळ असलेल्या शेवाळे गावात एका वृद्ध महिलेवर निर्घृण हल्ला करून तिचा खून केल्याची घटना ५ जून २०२५ रोजी रात्री घडली. या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व पिंपळगांव हरेश्वर पोलिसांच्या संयुक्त तपासातून केवळ ४८ तासांत लागला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, गेल्या गुरुवारी रात्री ९ ते ११ वाजेच्या दरम्यान शेवाळे गावातील श्रीमती जनाबाई महारु पाटील (वय ८५ वर्षे) यांच्या राहत्या घरात अज्ञात इसमांनी मागच्या दरवाजातून प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर टणक हत्याराने वार करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. तसेच त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथून जवळच असलेल्या वराड गावात तलवार घेऊन फिरणाऱ्या अन् दहशत माजवणाऱ्या २५ वर्षीय तरुणास पाळधी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त असे कि, येथून जवळच असलेल्या वराड गावात एक तरुण हातात तलवार घेऊन फिरत असून दहशत निर्माण करत असल्याची माहिती पाळधी पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर तत्काळ पाळधी पोलिसांनी तेथे धाव घेतली. या वेळी तेथे राहुल आधार येशराय (वय २५, रा. वराड) हा तरुण हातात तलवार घेऊन फिरत असताना आढळून आला. त्याला पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेऊन पाळधी पोलीस चौकीत आणले. त्या नंतर त्याच्यावर विविध कलमांनुसार कारवाई करून त्याला अटक केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील बाळद येथील २६ वर्षीय तरुणाने आपल्या शेतातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्येचे कारण गुलदस्त्यातच आहे. सविस्तर वृत्त असे कि, बाळद येथील समाधान बाळू चव्हाण हा पुण्यातील एका नामांकित कंपनीत अभियंता म्हणून गेल्या पाच सहा वर्षांपासून नोकरीला होता. शनिवारी सकाळी तो पुण्याहून बाळदला आल्यावर त्यांने आपल्या स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच, गावातील ग्रामस्थांसह पोलिस पाटील नितीन पाटील यांनी नगरदेवळा दूरक्षेत्राला घटनेची माहिती दिली. समाधान चव्हाण याची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. वडिलांचा व्यवसाय शेती असून, मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी आपले शेत विकून त्याचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर त्याला पुण्यातील एका नामांकित कंपनीत पाच-सहा…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील अकबर टॉकीज परिसरात शुक्रवारी सायंकाळी ७:३० वाजता डॉ. फिरोज खान यांच्या दवाखान्यात त्यांचे सहकारी मोहम्मद अली आणि आवेश खान यांना मारहाण करण्यात आली. रुग्णालयात विनाकारण बसण्यावरून झालेल्या वादातून ८ जणांच्या टोळीने दोघांवर हल्ला केला. या प्रकरणी डॉ. फिरोज खान (रा. खडका रोड, भुसावळ) यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी अजीम खान, रजीम खान, कैफ खान, सैफ खान, साहिल खान, सोहेल खान, मजेत खान व शफिक खान (सर्व रा. अकबर टॉकीज परिसर, भुसावळ) यांनी रागाच्या भरात मोहम्मद अली व आवेश खान या डॉक्टरच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केली. लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे दोघे…
एरंडोल : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून आली. याबाबत एरंडोल पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर येथील पथकाने एका दुचाकीस्वारास अटक केली आहे. १९ मे रोजी एरंडोल तालुक्यातील कढोली येथील किशोर सुरेश बडगुजर (३६) यांची दुचाकी (एमएच१९/सीएन१७७२) ही चोरीस गेल्याची फिर्याद त्यांनी एरंडोल पोलिस स्टेशनला दिली होती. पोलिसांनी पारोळा तालुक्यातील टिटवी येथील संशयित दिलीप पाटील यास भडगाव तालुक्यातील बांबरुड (महादेवाचे) येथून ताब्यात घेतले आहे. दरम्यान शहर व तालुक्यातील अनेक ठिकाणी दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असून आरोपीकडून अजून काही दुचाकी चोरीच्या उलगडा होईल, असे पोलिस सुत्रांनी सांगितले. तपास पोनि निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ महेंद्रसिंग पाटील,…
चोपडा : प्रतिनिधी आडगाव शिवारातील एका शेतात सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास स्त्री जातीचे मृत अर्भक मिळून आल्याची घटना घडली आहे. पोलिस पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या आडगाव शिवारातील कैलास रामकृष्ण पाटील यांच्या शेतात ७रोजी सकाळी १०:३० वाजता स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्याची माहिती पोलिस पाटील संगीता गोविंद पाटील यांनी चोपडा शहर पोलिस स्टेशनला दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार शहर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोउनि योगेश्वर हिरे करीत आहेत.
मेष राशी आजचा दिवस आनंददायी असेल. आज तुम्ही तुमच्या घराच्या नूतनीकरणाकडेही लक्ष द्याल. मित्र आणि कुटुंबासमवेत वेळ घालवा. भौतिक सुविधांमध्ये वाढ होईल. आज तुम्हाला कोणत्याही वादात पडणे टाळावे लागेल, ते तुमच्यासाठी चांगले असेल. मुले आज एखाद्या स्पर्धेत भाग घेतील, ज्यामध्ये त्यांना यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमचा कोणताही निर्णय तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. वृषभ राशी या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमची प्रतिभा दाखवू शकाल. आज जर तुम्ही अंदाजपत्रक तयार करून पुढे गेलात तर ते भविष्यासाठी चांगले ठरेल. आज तुम्हाला मित्रांच्या पुढे पुढे करणं टाळावं लागेल, अन्यथा तुमचे अतिरिक्त पैसे खर्च होऊ शकतात. जर तुम्हाला…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरूण तलावात दि.७ जून २०२५ रोजी रविवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय मोहम्मद नदीम शेख या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली असून, तब्बल दोन ते अडीच तासानंतर प्रशासनाच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद नदीम शेख हा काही मित्रांसह तलाव परिसरात गेला होता. पोहत असताना त्याचा श्वास घ्यायला त्रास झाल्याने तो पाण्यात बुडाला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र प्रशासनाची मदत पोहोचायला दोन तासांचा विलंब…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील भारतीय स्टेट बँकेचे (SBI) ग्राहक असाल तर ही महत्त्वाची माहिती आहे. बँकेच्या देखभाल व प्रणाली अद्ययावत करण्याच्या कामामुळे काही डिजिटल सेवा ८ जून २०२५ रोजी पहाटे काही काळासाठी बंद राहणार आहेत. बँकेने ही माहिती अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे. बँकेने कळवले आहे की नियोजित देखभाल कार्यामुळे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI), IMPS, YONO, रिटेल इंटरनेट बँकिंग, NEFT आणि RTGS या सेवा ८ जून रोजी पहाटे ३.४५ ते ४.३० या वेळेत उपलब्ध राहणार नाहीत. त्यानंतर सर्व सेवा सुरळीतपणे पुन्हा सुरू होतील. बँकेने ग्राहकांना सल्ला दिला आहे की, या वेळेत आवश्यक व्यवहार आधीच पूर्ण करून घ्यावेत. तसंच, UPI…

