पुणे : वृत्तसंस्था पतीच्या आयुष्याची दोरी बळकट होऊ दे, अशी प्रार्थना करण्याचा सण वडाला धागा बांधून वटपौर्णिमा यंदा महिलांना दोन दिवस साजरी करता येणार आहे. यंदा मंगळवारी (दि.१०) साडेअकरानंतर पाैर्णिमेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी वटपुजन न करता दुपारनंतर महिला वटपूजन करणार आहेत. बुधवारी (दि.१०) सुर्याने पाहिलेली तिथी याही दिवशी दुपारी १.१५ वाजेपर्यंत पौर्णिमा असणार आहे. त्यामुळे यंदा दोन दिवस सुवासिनी महिलांना वटपूजनाची संधी मिळणार आहे. वटपौर्णिमेचा उपवास करुन सुवासिनी वडाला धागा गुंडाळून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. भ्रदायोग असला तरी वटपौर्णिमा करता येते, अभ्यासकांनी स्पष्ट केले. दरम्यान, वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बाजारात महिलांची भाज्या, आंबे खरेदीसाठी मोठी गर्दी केली…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसापासून शहरातील अनेक ठिकाणी तलवार व कोयत्यासारखी शस्त्रे घेऊन खुलेआम फिरून दहशत माजवण्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अशा व्यक्तींविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने इस्माइल गल्लीतून एका संशयितास अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, दिनांक ९ जून २०२५ रोजी पो.ना. श्रीकृष्ण ईश्वरू यांनी मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे, शेळके व महालक्ष्मी माता मंदिर, तपोवन येथे एक इस्माइल बोबडे नावाचा युवक तलवार व कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती समोर आली. यावरून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला.…
जळगाव : प्रतिनिधी मध्यप्रदेशातून गावठी कट्टूयाची तस्करी करणाऱ्यांना पथकाने थांबवले. मात्र ते पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून जावू लागले. एलसीबीच्या पथकाने त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करीत संशयित गोविंदसिंग ठानसिंग बरनाला (वय ४५, रा. शिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, मध्यप्रदेश) व निसानसिंग जीवनसिंग बरनाला (वय २३, रा. उमर्टी, ता. वरला, जि. बडवाणी. ह. मु. शिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, मध्यप्रदेश) यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकींसह दोन गावठी कट्टे हस्तगत केले. सविस्तर वृत्त असे कि, मध्यप्रदेशातील सिरवेल येथून अवैधरित्या गावठी कट्टे विक्री करणारे दोन जण रावेर तालुक्यातील पाल मार्गे महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ रवी नरवाडे व पोहेकॉ गोपाळ गव्हाळे यांना मिळाली…
जळगाव : प्रतिनिधी कासमवाडी परिसरातील आठवडे बाजारात खरेदीसाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातून अज्ञात चोरट्याने १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे फॅन्सी मंगळसूत्र लंपास केल्याची घटना ७ जून रोजी सायंकाळी ५:३० वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जयश्री संजय धरम (वय ३०, रा. महाबळ) या ७ जून रोजी संध्याकाळी ५:३० ते ७:४५ वाजण्याच्या सुमारास शहरातील कासमवाडी भागात, आठवडे बाजार परिसरात एका हॉस्पिटलसमोरील रोडवर उभ्या होत्या. याचवेळी गर्दीचा फायदा घेऊन, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे फॅन्सी मंगळसूत्र चोरून नेले. या प्रकारानंतर जयश्री धरम यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांकडे धाव…
जळगाव : प्रतिनिधी वाढदिवसाच्या दिवशी नवीन गॉगल घेण्यासाठी आलेल्या एका तरुणाला गॉगल चोरल्याच्या संशयावरून गोलाणी मार्केटमध्ये बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी ४:०० वाजता घडली. या प्रकारामुळे मार्केटमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन दुकाने बंद करण्यात आली होती. सविस्तर वृत्त असे कि, चौघुले प्लॉटमधील एका तरुणाचा सोमवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास तो गोलाणी मार्केटमधील एका दुकानात गॉगल घेण्यासाठी गेला होता. शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्यानंतर दुकानदाराने आपल्या इतर मित्रांना बोलावून घेत त्या तरुणाला बेदम मारहाण केली. ही हाणामारी सुरू झाल्यामुळे मार्केटमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे मार्केटमध्ये पळापळ सुरू झाली. या घटनेमुळे मार्केटमध्ये मोठी गर्दी जमली…
जळगाव : प्रतिनिधी लग्नात मानपान न दिल्याच्या कारणावरून आणि पतीच्या व्यवसायासाठी माहेरून १० लाख रुपये आणण्याची मागणी करत जळगावचे माहेर असलेल्या विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात महिलेच्या पतीसह सासरच्या ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नेहरू नगर परिसरातील सपना सुदर्शन पाटील (वय ३९) यांचा विवाह जळगाव तालुक्यातील पाथरी येथील सुदर्शन रवींद्रसिंग पाटील यांच्याशी झाला आहे. सपना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सासरच्या मंडळींनी लग्नात मानपान न दिल्यावरून शिवीगाळ केली. याशिवाय सपना पाटील यांना शासकीय नोकरीतून येणाऱ्या पूर्ण पगाराची मागणी करत आणि पतीच्या व्यवसायासाठी माहेरून १०…
नेवासा : वृत्तसंस्था बंगळुरू येथे आयपीएलचा जल्लोष ११ क्रिकेटप्रेमींच्या मृत्यूचे कारण ठरल्याची घटना ताजी असतानाच आता महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) चे बोदवडचे चाहते आणि उदयोन्मुख क्रिकेटपटूंवरही आपत्ती कोसळली आहे. पुणे येथे एमपीएलचा सामना पाहून परत येणाऱ्या या क्रिकेटप्रेमींचे वाहन नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात सोमवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास ट्रकवर मागच्या बाजूने आदळले. या अपघातात दोन जण ठार तर चालक व तीन प्रशिक्षकांसह १५ जण जखमी झाले आहे. यात प्रथमेश योगेश तेली (वय १४, रा. बोदवड) याचा जागेवरच तर ऋषभ बबनराव सोनवणे (१४, रा. चिखली, ता. बोदवड) याचा उपचारादरम्यान नगर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींवर नेवासा फाटा येथे उपचार करण्यात येत…
मेष राशी आजचा दिवस मेष राशीसाठी भाग्यवान ठरेल. तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. ज्यामुळे अनेक अडलेली कामे मार्गी लागतील. अनावश्यक खर्च टाळून तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीवर नियंत्रण ठेवू शकाल. कामावर अधिक लक्ष केंद्रित करा. तुमच्या जीवनसाथीकडून आर्थिक पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी आणि चांगल्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. संधीचा फायदा घ्या. आर्थिकदृष्ट्या स्वतःला अधिक मजबूत करा. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींचा आज आत्मविश्वास वाढलेला दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देतील. ज्यामुळे तुमचे उद्दिष्ट्ये साध्य करणे सोपे होईल. तुम्हाला बोनस किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील कोरपावली येथील शेळ्या मेंढ्या चालून उदरनिर्वाह करणाऱ्या एका अठरा वर्षीय तरुणाला सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने त्याचा चिखलात गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यावल तालुक्यातील कोरपावली गावाबाहेर आठ जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. यात जयेश संतोष महाजन (वय १८, रा. कोरपावली, ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, कोरपावली गावाच्या बाहेर असणाऱ्या सांडपाण्याच्या खड्ड्यातील चिखलात आठ जून रोजी सायंकाळी सात वाजता जयेश महाजन हा नेहमीप्रमाणे शेळ्या मेंढ्या चारून येत असताना यातील एक शेळी खड्ड्यात पडल्याने त्याने तिला वाचवण्यासाठी तो देखील खड्ड्यात उतरण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मध्य रेल्वेच्या दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एक लोकल कसाऱ्याच्या दिशेनं येत होती. तर, दुसरी लोकल सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान, या दोन्ही धावत्या लोकल एकमेकांच्या जवळून गेल्याने फुटबोर्डवर उभे असलेल्या प्रवाशांचा तोल जाऊन काही प्रवासी खाली पडले. सेंट्रल रेल्वे दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर सीएसएमटीकडे जाणारे काही प्रवासी लोकलमधून पडले. लोकलमध्ये जास्त गर्दी असल्यामुळे हा अपघात असल्याची माहिती आहे. रेल्वे आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.…

