मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील भाजपचे मंत्री व ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता धाराशिव येथे आयोजित केलेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे उपस्थित राहिले होते. यावेळी नितेश राणे यांनी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय, हे लक्षात ठेवा, अशी धमकीच घटक पक्षातील नेत्यांना दिली होती. नितेश राणे यांच्यामुळे सत्ताधारी गटात अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याबद्दल शिंदे गटाने मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नाही तर, ‘आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?’, असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला होता. त्यानंतर ठाण्यात ठाकरे…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील वावडे येथे विहिरीचे पाणी भरण्यावरून वाद होऊन सहा जणांनी मारहाण केल्याने हात मोडल्याची घटना ७ रोजी घडली. सविस्तर वृत्त असे कि, वावडे येथील नरेंद्र भीमराव वानखेडे (३०) हा ७ जून रोजी शेतात कपाशीला पाणी देत असताना बाजूच्या शेतात काम करणारे त्याचे काका शिवाजी विठ्ठल पाटील यांनी मोटरचा फ्यूज काढून घेतला. नरेंद्र याने याबाबत विचारले असता त्याचा राग आल्याने दोघात बाचाबाची झाली. त्यामुळे बाजूच्या शेतात काम करणाऱ्या फिर्यादीच्या काकू सुलाबाई शिवाजी पाटील, दुसरे काका गुलाब विठ्ठल पाटील, चुलत भाऊ ज्ञानेश्वर गुलाब पाटील, त्याची पत्नी आशाबाई ज्ञानेश्वर पाटील, पुतण्या प्रतीक ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, काठीने…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तमगव्हाण येथून जवळच असलेल्या माळशेवगे येथील प्रकाश विक्रम पाटील यांच्या शेतातील शेडमध्ये बांधलेल्या बकऱ्यांवर अज्ञात हिंस प्राण्याने हल्ला केला. यात १७बकऱ्या व १ मोठा बोकड अशा १८ जनावरांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश पाटील यांनी त्यांच्या शेतात शेड उभारले होते. यात ४० शेळ्या ठेवल्या होत्या. ९ जूनला रात्री चारा टाकून ते घरी आले. मात्र, रात्री हिंस्र प्राण्यांनी या शेडमधील शेळ्यांवर हल्ला करून ४० पैकी १७ शेळ्या व एक बोकड अशा १८ जनावरांना ठार मारले. सकाळी प्रकाश पाटील हे शेडमध्ये गेले असता त्यांना एकूण १८ जनावरे मृतावस्थेत दिसली. त्यांनी वनविभाग तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला. यावेळी वनविभागाचे…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील रजा कॉलनी परिसरातील रहिवासी रहीम पटेल हे कामावर तर आई नातेवाईकांकडे गेलेली असताना घरी एकटीच असलेल्या हुमेरा रहीम पटेल (१६, रा. रजा कॉलनी) या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (१० जून) दुपारी रजा कॉलनीत घडली. बाहेर खेळत असलेला तिचा भाऊ घरात गेला त्या वेळी ही घटना लक्षात आली. सविस्तर वृत्त असे कि, मजुरी काम करणारे रहीम पटेल हे नेहमीप्रमाणे मंगळवारी कामावर गेलेले होते व त्यांच्या पत्नी नातेवाईकांकडे गेल्या होत्या. वीज नसल्याने उकाड्यामुळे मुलगा घराबाहेर खेळत होता. त्यावेळी घरात एकटीच असलेल्या हुमेरा हिने गळफास घेतला. मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी…
जळगाव : प्रतिनिधी वीज मीटर बदलण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना भूषण शालिग्राम चौधरी (३७) या कंत्राटी वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (१० जून) पकडले. सविस्तर वृत्त असे कि, ४६ वर्षीय तक्रारदाराच्या राहत्या घराचे वीज मीटर पूर्वीच्या मालकाच्या नावावर होते. ते बदलण्यासाठी प्रभात कॉलनी कक्षातील वायरमन भूषण चौधरी हा तीन दिवसांपूर्वी तक्रारदाराच्या घरी गेला होता. त्यावेळी तुम्ही मीटरमध्ये छेडछाड केली असल्याने तुम्हाला दंड होईल व वीजचोरीचा गुन्हा दाखल होईल, असे सांगितले, तसेच हा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि वीज मीटर टेस्टिंगचा सकारात्मक रिपोर्ट देण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. याविषयी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तुरखेडा येथील 74 वर्षीय शेतकरी रमेश उत्तम धीवर यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (९ जून) तुरखेडा शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, रमेश धीवर यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले होते. मात्र हवे तसे उत्पन्न येत नसल्याने त्यांच्यावर कर्ज वाढत गेले. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते असायचे. त्यात त्यांनी सोमवारी शेतात गळफास घेतला. हा प्रकार त्यांच्या मुलाच्या लक्षात आला. त्यावेळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची…
जळगाव : प्रतिनिधी दक्षिण भारतात फिरण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या वाहनावर भरधाव कंटेनर येऊन धडकल्याने ऋषभ सुरेशचंद तोडरवाल (३८) व त्यांची पत्नी वृषाली ऋषभ तोडरवाल (३६) दोन्ही रा. देवकर नगर, जळगाव हे ठार झाले. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दाम्पत्याचे दोन्ही मुले व सासरे दुकानावर गेलेले असल्याने ते सुखरुप आहेत. हा अपघात रविवारी (८ जून) तामिळनाडुतील वेलूर जवळ झाला. मंगळवारी रात्री मयताचे मृतदेह जळगावात पोहचले. जळगावातील रहिवासी व सावदा येथे सुवर्ण पेढीमध्ये व्यवस्थापक असलेले ऋषभ तोडरवाल हे पत्नी वृषाली, मुलगी चहेती (११), मुलगा तक्ष (७) सासरे, आते सासू यांच्यासह दोन चालक घेऊन वाहनाने चेन्नई व दक्षिण भारतातील इतर ठिकाणी फिरण्यासाठी…
मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींनी स्वतःच्या आरोग्याकडे आणि मानसिक स्थितीकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आज तुम्हाला कामात भरपूर उत्साह जाणवेल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडाल. कुटुंबासोबत विशेषतः आई-वडिलांसोबत वेळ घालवाल. यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. आर्थिक बाबतीत चढ-उतार दिसू शकतात. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन त्यावर मात कराल. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींची आज तुमची आर्थिक परिस्थिती थोडी गडबडू शकते. त्यामुळे कोणत्याही मोठ्या निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगा. सतत काम करण्याऐवजी छोटे ब्रेक घ्या. यामुळे तुमची कार्यक्षमता टिकून राहील. तुम्ही थकणार नाही. तुमच्या बॉसशी बोलताना किंवा महत्त्वाच्या चर्चा करताना शहाणपणाने आणि विचारपूर्वक बोला.…
चाळीसगाव : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली ७ जून ते १० जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेली ‘रायगड मोहीम 2025’ यंदाही उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात पार पडली. या मोहिमेद्वारे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील हजारो शिवभक्त, विद्यार्थी आणि तरुणाईने रायगडाचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवला. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या ऐतिहासिक मोहिमेचे यंदाचे आयोजन अधिक भव्य स्वरूपात झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनाधीश रूप व भव्य-दिव्य दुर्गराज रायगडचे स्वरूप मनात साठवत चाळीसगाव तालुक्यातील हजारो शिवभक्तांचा ताफा आज भल्या पहाटे चाळीसगाव येथे सुखरूप परतला व रायगड मोहिमेची यशस्वी सांगता झाली. रायगडावरील मुख्य शिवराज्याभिषेक…
मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. १० जून) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आगामी विधिमंडळ अधिवेशनात याबाबत विधेयक आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 6,250रुपयांची वाढ,पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10,000 ची वाढ, तर बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार 8,000 विद्यावेतन (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये) सामाजिक न्याय विभाग : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा.…

