Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
    क्राईम

    दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

    editor deskBy editor deskJune 14, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील तासखेडा येथे विजेचा धक्का बसून पित्यासह लेकीचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना तासखेडा (ता. रावेर) येथे शुक्रवारी सकाळी ६ वाजता घडली. समाधान अशोक कोळी (३६) आणि त्यांची मुलगी मानवी कोळी (११) अशी या मृतांची नावे आहेत. समाधान यांच्या वडिलांनाही सुरुवातीला विजेचा धक्का बसला होता, त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात असताना ही घटना घडली.

    सविस्तर वृत्त असे कि, समाधान यांचे वडील अशोक माधव कोळी हे घरात कापडे टांगण्यासाठी बांधलेल्या तारेवरील रुमाल घेण्यासाठी गेले असता त्या तारेत वीज प्रवाह उतरला होता. रुमालाला स्पर्श होताच तार तुटली आणि ते बाजूला फेकले गेले. हा प्रकार पाहताच समाधान व मानवी हे त्यांना उचलण्यासाठी पुढे आले. त्यांना तुटलेल्या तारेचा स्पर्श झाला आणि ते तिथेच तारेला चिकटले. त्यांना रुग्णालयात आणले असता मृत घोषित केले. मृत बाप-लेकीवर शुक्रवारी तासखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. समाधान यांचे वडील अशोक कोळी यांच्यावर गावात खासगी डॉक्टरकडे उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. १५ रोजी जागतिक पितृ दिन आहे (फादर्स डे) विशेष म्हणजे पितृ दिनाच्या एक दिवस आधीच वडिलांना वाचवण्याच्या प्रयत्नात मुलगा व नातीचा मृत्यू झाल्याने या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावातील घरफोड्यांचा भंडाफोड; मध्यप्रदेशातील टोळी उघड

    December 13, 2025

    महिला बचत गटांसाठी ऐतिहासिक विजय : उमेद अभियान अधिकारी कर्मचारी यांच्या आंदोलनाला यश !

    December 13, 2025

    बेपत्ता तरुणीचा विहिरीत मृतदेह; गांधली गावात शोककळा

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.