Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : चाळीसगावात वीज कोसळून एकाच कुटुंबातील तीन जण ठार
    क्राईम

    खळबळजनक : चाळीसगावात वीज कोसळून एकाच कुटुंबातील तीन जण ठार

    editor deskBy editor deskJune 16, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    शेतातील झाडावर वीज कोसळून त्याखाली आश्रयाला थांबलेले एकाच कुटुंबातील तीनजण ठार, तर दोनजण जखमी झाले. ही हृदयद्रावक घटना कोंगानगर (ता. चाळीसगाव) येथे रविवारी दुपारी २ वाजता घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ उदल पवार (वय २४), त्याचा पुतण्या दिलीप पवार (१४, दोघे रा कोंगानगर) आणि शालक समाधान प्रकाश राठोड (९, रा. जेहूर ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. यापैकी दशरथ याचा १५ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. उदल गणपत पवार व दिलीप उदल पवार हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पवार कुटुंबीय गावानजीकच्या शेतात रविवारी कपाशी लागवड करण्यासाठी गेले होते. दुपारी दोन वाजता वादळी वाऱ्यासह पावसासह विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यामुळे सर्वजण शेतातील झाडाच्या आडोशाला उभे राहिले. काही क्षणातच झाडावर वीज कोसळल्याने तिघे जागीच ठार झाले.

    एकाच कुटुंबातील तीनजणांचा मृत्यू झाल्याने कोंगानगरात शोककळा पसरली होती. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. रात्री उशिरा तीनही जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार संदेश निकुंभ, प्रथमेश मोहोड हे घटनास्थळी पोहोचले. आमदार चव्हाण यांनी शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीबाबतही प्रशासनाला सूचना दिल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.