Author: editor desk

मेष : दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. विरोधकही सहकार्य करतील. नवीन काम सुरू करू शकता, ज्याचा भविष्यात फायदा होईल. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस सकारात्मक राहील. नफा मिळण्याची शक्यता आहे. वृषभ : कामाच्या ठिकाणी नफा मिळण्याची शक्यता आहे. जुने काम सोडून देऊ शकता. नवीन काम सुरू करणे शक्य आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबाच्या खरेदीवर खर्च होऊ शकतो. मिथुन : कामात अस्थिरता असेल. बाह्य प्रवास शक्य आहे, परंतु यशाची शंका आहे. केलेले काम बिघडू शकते, सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. खर्च वाढू शकतो, अनावश्यक खर्च टाळा. अभ्यासात रस कमी वाटेल. लक्ष विचलित होऊ शकते. कर्क : तुम्हाला खूप मेहनत करावी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लातूरमध्ये छावा संघटनेचे नेते विजयकुमार पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेने राज्यात खळबळ उडवली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुनील तटकरेंनीच मराठा द्वेषातून छावाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला घडवून आणला, असे मनोज जरांगे म्हणालेत. तसेच या प्रकरणी गृहमंत्र्यांनी कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही मनोज जरांगे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे रविवारी लातूर दौऱ्यावर आले असताना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पत्ते फेकत सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषि मंत्र्याचा राजीनामा…

Read More

दिल्ली : वृत्तसंस्था आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला ‘देशातील २५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर आल्याचा आणि महागाईचा दर सुमारे दोन टक्क्यांपर्यंत घसरल्याचा,’ दावा केला आहे. जगाने भारतीय सैन्याची ताकद पाहिली असल्याचे सांगत त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे कौतुकही केले. पावसाळी अधिवेशनापूर्वी संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, संपूर्ण जगाने भारताच्या लष्करी सामर्थ्याचे, भारतीय सैन्याच्या ताकदीचे रूप पाहिले आहे. भारतीय सैन्याने ठरवलेले १०० टक्के लक्ष्य साध्य केले. शत्रूच्या घरात घुसून, दहशतवादी अड्डे २२ मिनिटांत उद्ध्वस्त केले. संपूर्ण जगाने मेक इन इंडियाची शक्ती पाहिली आहे. जेव्हा जेव्हा मी परदेशातील सहकाऱ्यांना भेटतो तेव्हा त्याचे कौतुक…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था जिल्ह्यातील आडगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका २० वर्षीय विद्यार्थिनीने, ‘आई माझ्या शिक्षणाचा त्रास नको घेऊ’, अशी भानविक चिठ्ठी लिहित जीवन संपवले आहे. सदर मुलीचे आई पोलिस अंमलदार आहे. तिने गळफास घेण्यापूर्वी आईला चिठ्ठी लिहिली आहे. पूजा दीपक डांबरे (२०, रा. विहंग अपार्टमेंट, व्ही. डी. कामगारनगर, अमृतधाम, पंचवटी) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पूजा नुकतीच बारावी पास झाली. तिने प्रथम वर्षात प्रवेश घेत महाविद्यालयीन शिक्षणही सुरु केले होते. पूजाचे वडील विभक्त राहत असून ती आईसोबत राहात होती. ‘आई तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक खर्च फार…

Read More

नाशिक :  वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारची लाडकी बहिण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेविषयी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठे विधान केले आहे. भुजबळ म्हणाले, ज्यांच्याकडे गाड्या, बंगले आहेत, त्यांच्यासाठी ही योजना नाही. ही योजना गरिबांसाठी आहे, श्रीमंतांसाठी नाही. नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ बोलत होते. छगन भुजबळ यांच्या या स्पष्ट विधानामुळे लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची अट अधिक स्पष्ट झाली आहे. पुढे ते म्हणाले, मी मागेच सांगितले होते की स्वतःहून त्यांनी सांगावे मी या नियमांमध्ये बसत नाही. एवढे करुनही ती मंडळी यामध्ये बसत असतील तर ते अडचणीचे होते. अजूनही गाडी बंगले…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण येथील पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कार्तिक बळीराम खंडाळे (वय 10) याचा खून त्याचा चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे (वय 38) याने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यास चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. भावकीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. सविस्तर वृत्त असे कि, शनिवारी सकाळी जाधववाडी (ता. माढा) शिवारात बेपत्ता कार्तिक खंडाळे याचा कॅनॉलमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. त्याचा निर्घृण खून झाल्याचे समोर आले. या ठिकाणी श्वान पथक, ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅब पथक यांनी भेट दिली होती. मानवतेला काळिमा फासणार्‍या या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी केंद्रीय कार्यकारीणीचे आदेशानुसार मराठासेवासंघाचे विभागिय अध्यक्षपदी(जळगांव धुळे नंदुरबार जिल्ह्यांसाठी) राम पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी विचारमंचावर सहसचिव चंद्रशेखर भदाणे,प्रदेशऊपाध्यक्ष सुरेंद्र पाटील,नाशिक विभागिय अध्यक्ष दिपक भदाणे,सुरेश पाटील,लिनाताई पवार ,आबासाहेब पाटील,ऊपस्थित होते.यावेळी पुर्व जळगांव जिल्हाध्यक्ष डाॕ अनिल पाटील( रावेर लोकसभा मतदारसंघ तालुक्यांसाठी),पश्चिम जळगांव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे (जळगांव लोकसभा मतदारसंघ तालुक्यांसाठी ) खुशाल चव्हाण (जळगांव महानगर व ग्रामिण मतदारसंघसाठी) तसेच विभागिय कार्याध्यक्ष पदी सुमित पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कार्यक्रमाचे सुरुवातीला राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.स्मृतिशेष सुर्यकांत सुर्यवंशी(जळगांव ) व शांताबाई पाटील (गाळण )यांना शिवांजली व्यक्त करण्यात आली. संभाजीब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांचेवरील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून २० वर्षीय तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. यातून ही मुलगी गर्भवती राहिली. गेल्या एक वर्षापासून हा तरुण स्वतःच्या घरासह मुलीच्या घरी तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करीत होता. या प्रकरणी निखिल लीलाधर कोळी (२०) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरातील १५ वर्षीय मुलगी शिक्षण घेत असून, तिच्याशी निखिल कोळी याने ओळख निर्माण केली. त्यानंतर, तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि तो तिच्या घरी येत राहिला. या दरम्यान, त्याने स्वतःच्या घरी आणि मुलीच्या घरी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी औद्योगिक वसाहत परिसरातून मुख्य रस्त्याला लागणाऱ्या ट्रकला जळगावकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्सने धडक देऊन ती विरुद्ध दिशेला जाऊन काँक्रीटच्या गटारीवर धडकली. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात रविवारी (२० जुलै) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रेमंड कंपनीच्या मागील बाजूच्या रस्त्यावर झाला. सविस्तर वृत्त असे कि, असताना औद्योगिक वसाहत परिसरातील एसएस ९ सेक्टरकडून एक मालवाहू ट्रक मुख्य रस्त्यावर येत असतांना गाडेगावकडून येणाऱ्या खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स ट्रकच्या चालकाकडील बाजूला केबीनवर धडकली. या धडकेवेळी ट्रॅव्हल्स चालकाने एकदम ब्रेक दाबल्याने ही ट्रॅव्हल्स विरुद्ध बाजूच्या रस्त्याकडे जाऊन काँक्रीटच्या गटारीवर धडकली. यामध्ये ट्रॅव्हल्सचे काच फुटून समोरील बाजू चक्काचूर झाली.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रात्रीच्या वेळी महाविद्यालयाचे प्रवेशद्वार उघडून चोरट्यांनी रोख एक लाख रुपयांसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा एनव्हीआर असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना १८ जुलै रोजी मध्यरात्री गोदावरी आयएमआर लेखापाल विभागात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, १८ जुलै रोजी गोदावरी आयएमआर महाविद्यालयाचे सर्व विभाग व मुख्य प्रवेशद्वार बंद करून अधिकारी, कर्मचारी घरी निघून गेले. त्यानंतर चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वार उघडून व आतील लेखापाल विभागाचा दरवाजा उघडून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे जमा झालेले एक लाख रुपये टेबलाचे काऊंटर व  कपाटातून लांबविले. चोरट्यांनी रोकड शोधताना कार्यालयातील फाईल व इतर…

Read More