Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शनिपेठ पोलिसांची कारवाई : ६१ गॅस सिलिंडरसह साहित्य जप्त !
    क्राईम

    शनिपेठ पोलिसांची कारवाई : ६१ गॅस सिलिंडरसह साहित्य जप्त !

    editor deskBy editor deskJune 18, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्यांवर शनिपेठ पोलिसांनी कारवाई करीत ६१ गॅस सिलिंडर व साहित्य जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (१७ जून) दुपारी असोदा रस्त्यावर पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. याप्रकरणी नारायण दाजीबा सोनवणे (वय ६०), राहुल नारायण सोनवणे (२९, रा. दोघे रा. दिनकरनगर), आदेश राजू पाटील (२३, रा. दिनकरनगर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, असोदा रस्त्यावरील पिवळी भिंत परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार होत असल्याची माहिती शनिपेठ पोलिसा ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ शशिकांत पाटील, प्रदीप नन्नवरे, कमलेश पाटील विक्की इंगळे, गजानन वाघ, नवजीत चौधरी, रवींद्र साबळे, अमोल वंजारी नीलेश घुगे, पराग दुसाने यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथक घटनास्थळी पोहोचले असता घरगुती गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरताना तीनजण आढळले. पथकाने ६१ गॅस सिलिंडर, पंप, वजनकाटा व मालवाहतूक रिक्षा असा एकूण दोन लाख २३ हजार २३८ रुपयांचा ऐवज जप्त केला-याप्रकरणी पोलिस कर्मचारी गजानन वाघ यांनी फिर्याद दाखल केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव क्रुझरची दुचाकीला जोरदार धडक; यावलमध्ये पोलीस कर्मचारी जखमी

    April 20, 2026

    अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर हल्ला? जळगाव तालुक्यात १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

    April 20, 2026

    आठ दिवसावर लग्न असताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.