रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील सावदा येथे जडीबुटी विक्रीसाठी आलेल्या हरयाणातील दोन वैदूंना मुले चोरणारे असल्याचे समजून रविवारी दुपारी बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली. या घटना मुंजलवाडी, कुसुंबा आणि लोहारा (ता. रावेर) या तीन ठिकाणी घडल्या. पोलिस वेळीच पोहोचल्याने पालघर घटनेची पुनरावृत्ती टळली आहे. या प्रकरणी सावदा पोलिसांत परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जस्सानाथ पुनुनाथ (वय ६०) आणि मोनुनाथ जस्सानाथ (२०, दोघे रा. सिरसा हरयाणा) अशी या जखमी वैदूंची नावे आहेत. त्यांच्यावर सावदा रुग्णालयात उपचार करण्यात आले. आणखी मारहाणीचे प्रकार घडू नयेत, यासाठी त्यांना सावदा पोलिस ठाण्यात थांबवण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि,…
Author: editor desk
मेष : तुम्ही नवीन कामाची योजना आखू शकता, कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहाल. व्यवसायात परिस्थिती सामान्य राहील, नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या चढ-उतार येतील, प्रवासात खर्च संभवतो. अभ्यासात रस असेल, परंतु तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागेल. वृषभ : शिक्षण क्षेत्रात तुम्ही नवीन सत्र सुरू करू शकता, तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुम्हाला अडकलेले पैसे मिळतील, भावांकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. खर्च वाढू शकतो, परंतु उत्पन्नात संतुलन राहील. तुम्हाला नवीन विषयांमध्ये रस निर्माण होईल. मिथुन : तुमच्या जोडीदाराच्या मदतीने तुम्हाला कामात यश मिळेल. तुम्हाला नवीन भागीदारीतून फायदा होईल, तुम्हाला मोठा प्रकल्प मिळू शकेल. उत्पन्न वाढेल, आर्थिक स्थिती मजबूत राहील. सकारात्मक ऊर्जा राहील. कर्क…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी गेम खेळता नाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड गदारोळ माजला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट सरकार आणि मंत्रिमंडळावर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे येड्याची जत्रा आणि पेढ्याचा पाऊस झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारची खरडपट्टी काढली. एखादा आमदार चड्डी-बनियान मध्ये फिरतो, कुणी पैशाच्या बॅगा मोजतो, कुणी कर्मचाऱ्यांना मारहाण करतो आणि आता मंत्री सभागृहात ‘रमी’ खेळतात. हे लोक कुणाच्या आशीर्वादाने मंत्रिपदावर आहेत? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. सुषमा अंधारे यांनी अधिवेशनाच्या खर्चावरही लक्ष वेधले. एक सेकंदाचे अधिवेशन…
मुंबई: वृतसंस्था राज्यातील विधिमंडळाच्या सभागृहातच राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा एक व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ आज (दि. २०) सोशल मीडियावर पोस्ट केला असून, यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. “सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी,” असा सणसणीत…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील परसाडे येथील विष प्राषण केलेल्या ४५ वर्षीय प्रौढाचा उपचारा सुरु असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील परसाडे येथील रहिवासी विजय भास्कर पाटील (वय ४५) यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राषण केले होते. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने भुसावळ शहरातील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक अमित तडवी करत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरुण परिसरातील आदित्य चौक येथे राहत्या घरामध्ये शुभांगी कुणाल नाईक (२५) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (१९ जुलै) दुपारी मेहरुण परिसरात घडली. ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी मुलीला गळफास देऊन मारले, असा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला. तसेच जोपर्यंत सासरची मंडळी येत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही व मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. शुभांगीचे वडील राजेंद्र भागवत वाघ (रा. पिंपळा, ता. सोयगाव) यांनी सांगितले की, सहा वर्षांपूर्वी मुलीचे लग्न झाल्यापासून तिला सासरचे मंडळी त्रास देऊन सतत छळ करीत होते. तिला माहेरील मंडळींशी बोलू देत नव्हते व येऊदेखील देत नव्हते.…
जळगाव : प्रतिनिधी पुढे जाणाऱ्या वाळूच्या डंपरने इंडिकेटर न देता वळण घेतल्याने त्यावर दुचाकी धडकून हर्षल राजू पाटील (१९, रा. वराड बुद्रुक, ता. धरणगाव) हा तरुण ठार झाला. तसेच त्याच्या मागे बसलेला कुणाल गोकूळ पाटील (१९, रा. वराड बुद्रुक, ता. धरणगाव) हा तरुण जखमी झाला. बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे मारुतीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना शनिवारी (१९ जुलै) सकाळी साडेसहा वाजता महामार्गावर नशिराबादजवळ हा अपघात झाला. सविस्तर वृत्त असे कि, वराड बुद्रुक येथील दुग्धव्यावसायिक राजू पाटील यांचा मुलगा हर्षल पाटील याच्यासह गावातील काही तरुण १० ते १२ दुचाकी व कारने शनिवारी शिरसाळा येथे मारुतीच्या दर्शनासाठी जात होते. त्यासाठी ते पहाटे सव्वा…
जळगाव : प्रतिनिधी पैसे काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करून एका जणाने एटीएम कार्ड बदलवून सुधाकर पंडितराव सुरसे (६४, रा. शाहूनगर) यांची ४८ हजार ३०० रुपयांमध्ये फसवणूक केली. हा प्रकार १२ जुलै रोजी गणपती मंदिरासमोरील एटीएममध्ये घडला. या प्रकरणी १८ जुलै रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नूतन मराठा महाविद्यालयातून निवृत्त झालेले सुधाकर सुरसे हे १२ जुलै रोजी त्यांच्या पत्नीचे एटीएम कार्ड घेऊन चित्रा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गणपती मंदिरासमोरील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी पैसे काढण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली; मात्र पैसे निघाले नाही. त्यामुळे तेथे बाजूला उभ्या असलेल्या एका तरुणाने शेजारील मशीनमधून पैसे काढा,…
मेष : तुम्ही लांबच्या प्रवासाला किंवा परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. आजचा दिवस शास्त्रज्ञांसाठी विशेषतः यशस्वी ठरेल. वृषभ : एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळाल्याने समाजात तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी नोकरदारांचा आनंद वाढेल. मिथुन : राजकारणात, तुमच्या प्रभावी भाषणाचे कौतुक केले जाईल. जर तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रांसोबत एकत्र काम केले तर नफ्याची शक्यता जास्त असेल. कर्क : कौटुंबिक जीवनात विचार न करता पैसे खर्च करण्याच्या सवयीमुळे वाद होऊ शकतात. व्यवसायात उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी होतील. ज्यामुळे आर्थिक लाभ होईल. सिंह : व्यवसायात अपेक्षित उत्पन्न नसल्याने तणाव आणि चिंता असेल. तुम्हाला शेतीचे काम करण्यासाठी एखाद्याच्या प्रभावाखाली आणले जाऊ शकते. तुम्ही…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर पोलिसांनी वाहन चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आणत, ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि इतर चोरीच्या वाहनांसह एकूण २ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून, शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. सविस्तर वृत्त असे कि,जळगाव शहरातील गोलाणी मार्केटसमोर, मायटी ब्रदर्स दुकानासमोरून १४ जुलै रोजी रात्री ८.३० ते १५ जुलै रोजी सकाळी ९.३० दरम्यान, ६१ हजार रुपयांचा फोर्स टेम्पो (MH-१९ एस ०६६६) आणि ३० हजार रुपयांचा किर्लोस्कर कंपनीचा ३० किलोव्हॅट जनरेटर चोरीला गेला होता. याप्रकरणी मिलींद मुकुंद यत्ते यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली…

