• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

editor desk by editor desk
June 19, 2025
in क्राईम, जळगाव
0
भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत असतांना आता भुसावळ शहरात झालेल्या चोरीच्या घटनेची पोलिसांनी उकल केली आहे. भुसावळ येथील गायत्री नगरमधून १५ लाखांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी मोठा मुद्देमाल शिरपूर येथे एका खाजगी गोदामात लपवला होता. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखा, भुसावळ तालुका पोलिसांच्या मदतीने हा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. किंमत १८ लाख ८० हजार रुपये असून, यात फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी आणि एलईडी टीव्ही असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, दि. १५ जून रोजी मध्यरात्री नंदलाल मिलकीराम मकडीया यांच्या गायत्री नगर येथील राजस्थान मार्बलच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या गोदामाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी गोदामात प्रवेश केला. (केसीएन)त्यांनी गोदामातून एकूण ३५ हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, ज्यात फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी आणि एलईडी टीव्ही चोरून नेल्या होत्या.

याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, वरिष्ठांच्या आदेशानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या पथकांनी समांतर तपास सुरू केला. चोरी झालेल्या मालाच्या ठिकाणाबाबत तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीची खात्री केली असता, सदरचा मुद्देमाल शिरपूर शहरातील करवंद रोड, महावीर लॉन्स येथील एका खाजगी पत्र्याच्या गोदामात ठेवलेला असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून १८ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

तसेच, गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल ज्या खाजगी गोदामात ठेवण्यात आला होता, त्याचे मालक मुजावर जामील शेख चांद (वय ४८, रा. न्यु बोराडी ता. शिरपूर, ह.मु. गणेश कॉलनी आर सी पटेल उर्दू शाळे जवळ शिरपूर) आणि जफर शेख मुजावर (वय २४, रा. मुजावर मोहल्ला शिरपूर ता. शिरपूर जि. धुळे) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळचे कृष्णात पिंगळे, स्था गु शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यांनी केली कारवाई

उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळचे उमाकांत पाटील, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पो हे कॉ विजय नेरकर, पो हे कॉ संदीप धनगर, पो शि सचिन चौधरी, पो शि प्रशांत परदेशी, पो शि योगेश माळी, पो शि अमर अढाळे, पो शि प्रशांत सोनार, पो शि भूषण चौधरी, पो शि राहुल वानखेडे, पो शि जावेद शहा, स्था गु शाखा पथक पो उप निरी शेखर डोमाळे,(केसीएन)सहा फौज रवी नरवाडे, पो हे कॉ गोपाळ गव्हाळे, पो हे कॉ मुरलीधर धरगर, पो हे कॉ संदीप चव्हाण, पो हे कॉ प्रविण भालेराव, चालक भरत पाटील, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पो हे कॉ महेश चौधरी, पो शि राहुल भोई यांचा समावेश होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राहुल टि वाघ, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

 

Previous Post

संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !

Next Post

प्रशासकीय क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता

Next Post
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !

प्रशासकीय क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रवीण गायकवाड यांनी हल्ल्याप्रकरणी सरकारला धरले जबाबदार !
क्राईम

प्रवीण गायकवाड यांनी हल्ल्याप्रकरणी सरकारला धरले जबाबदार !

July 14, 2025
जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर अजितदादांचे सूचक विधान !
राजकारण

जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर अजितदादांचे सूचक विधान !

July 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

लाकडी काठीने तिघांनी केली तरुणाला बेदम मारहाण !

July 14, 2025
सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्यांची शनीपेठ भागातून काढली धिंड !
क्राईम

सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्यांची शनीपेठ भागातून काढली धिंड !

July 14, 2025
भुसावळातील दोघांवर हद्दपारीची कारवाई !
क्राईम

जळगावातील दोघांना जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार !

July 14, 2025
कुत्रा आडवा आला अन अपघातात महिला ठार !
क्राईम

कुत्रा आडवा आला अन अपघातात महिला ठार !

July 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group