Author: editor desk

मेष : दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. विरोधकही सहकार्य करतील. तुम्ही नवीन काम सुरू करू शकता, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस सकारात्मक राहील. नफा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास करावा, त्यांना यश मिळू शकते. वृषभ : कामाच्या ठिकाणी नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही जुने काम सोडून देऊ शकता. नवीन काम सुरू करणे शक्य आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक खरेदीमध्ये खर्च होऊ शकतो. अभ्यासात रस वाढेल, तुम्हाला यश मिळेल. मिथुन : कामात अस्थिरता असेल. बाह्य सहल शक्य आहे, परंतु यश संदिग्ध आहे. पूर्ण झालेले काम बिघडू शकते, सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. खर्च वाढू…

Read More

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर सहकऱ्यांची दोष मुक्त करण्याच्या अर्जावर तसेच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर ७ जुलै रोजी युक्तिवाद करण्यात आला. या युक्तिवादानंतर देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडने दोषी नसल्याचा अर्ज न्यायालयाकडे केला होता. या अर्जावर आज न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. आरोपी दोष मुक्तीसाठी स्वतंत्र अर्ज करुन कोर्टाचा वेळ वाया घालवत असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आरोपींचे दोष मुक्तीचे अर्ज फेटाळण्यात आले. संपत्ती जप्तीच्या अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. या प्रकरणात 4 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्याच्या विधीमंडळ सभागृहातच मोबाईलवर रम्मी खेळत असल्याच्या व्हिडिओवरुन वादात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आणखी एक वादगग्रस्त वक्तव्य केले आहे. १ रुपया पीक विमा प्रश्नी बोलताना मंगळवारी (दि.२२ जुलै) कोकाटे यांनी ‘शेतकरी भिकारी नाही, तर शासन भिकारी आहे’, असे वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांकडून शासन १ रुपया घेत नाही. शासन भिकारी आहे, शेतकरी नाही. पीक विम्याची १ रुपया किंमत खूप थोडी आहे. १ रुपये पीक विम्यामुळे पाच- साडेपाच लाख बोगस अर्ज सापडले. ते मी रद्द केल्याचे कोकाटे यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोकाटे यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याला ‘भिकारी’ म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी पुरनाड पुलाचे काम मंगळवारी आज दि. २२ जुलै सकाळी पोलिस बंदोबस्तात पुन्हा सुरू करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद करण्यासाठी आंदोलन सुरू केले. पोलिसांनी हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना अडवले आणि काहींना ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी काम थांबवण्याची मागणी केली. प्रांताधिकाऱ्यांनी महामार्गाचे काम सुरूच राहील, असा ठाम पवित्रा घेतल्याने आमदार संतप्त झाले आणि त्यांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले. पोलिसांनी अनेक वेळा विनंती करूनही आमदारांनी आंदोलन मागे घेतले नाही, त्यामुळे त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. उल्लेखनीय म्हणजे, इंदूर राष्ट्रीय महामार्गाच्या या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या असून त्यांना…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात हनीट्रॅपची जोरदार चर्चा सुरु असतांना आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कोणत्याही परिस्थितीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावाच लागेल, असे देखील त्यांनी ठणकावून सांगितले. इतकेच नाही तर प्रफुल्ल लोढा प्रकरणावर त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळात या प्रकरणातील मोठा मासा बसलेला असल्याचा दावा त्यांनी केला. तर एकनाथ शिंदे यांची केवळ आठच आमदार निवडून येण्याची क्षमता होती, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार…

Read More

सातारा : वृत्तसंस्था शहरातील बसाप्पा पेठ येथे सोमवारी दुपारी 4 वाजता एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीच्या गळ्याला धारदार चाकू लावत खळबळ उडवून दिली. एक हात मुलीच्या गळ्यात होता, तर दुसर्‍या हाताने चाकू उगारत तो मुलीला जीवे मारण्याची धमकी देत होता. तो कोणालाही पुढे येऊ देत नव्हता. मुलीच्या गळ्यावर चाकू लावल्यामुळे बघणारे काहीही करू शकत नव्हते. त्याचवेळी पाठीमागून एकाने झडप घालून त्याला पकडले. त्यानंतर जमावाने त्या मुलाला बेदम चोप दिला. अधिक माहिती अशी, संशयित मुलगा गेल्या काही महिन्यांपूर्वी बसाप्पा पेठेत राहत होता. त्यावेळेपासून तो अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. ही बाब मुलीच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी मुलाला समज दिली होती.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतील आमदार निवासातील कँटीन चालकास मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत आलेले, आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरणारे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान करून नवीन वाद ओढवून घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच हॉटेलमध्ये वेटर आणि कुकला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, आता त्यांनी थेट माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना चॅलेंज दिले आहे. संजय गायकवाड यांनी जाहीरपणे म्हटले की, मुंबईतील आझाद मैदानात तू आणि मी एकटे भेटू. तिसरा कोणी मध्ये येणार नाही. हे चॅलेंज देत त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांपूर्वीच गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद न ठेवण्याचा निर्णय…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील रामकृष्ण नगरजवळ फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ महिलेस पोलीस असल्याची बतावणी करत तिघा अनोळखी व्यक्तींनी तब्बल १ लाख ८ हजारांचे सोन्याचे दागिने फसवणूक करून लंपास केल्याची धक्कादायक घटना २० जुलैला सकाळी घडली. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जुने विमानतळ परिसरातील नवलेवाडी येथील शोभा सीताराम देवरे (वय ६५) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, शोभा देवरे या सकाळी ६.१५ वाजता दररोजप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडल्या. सुमारे ६.४५ वाजता मालेगाव रोडवरील रामकृष्ण नगरच्या पाटीजवळ दुचाकीवरुन दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगून महिलेस तिसऱ्या व्यक्तीजवळ…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यात १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली. मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याची घटना उघडकीस आली असून पारोळा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय मुलगी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पारोळा येथील शाळेतून घरी येत असताना तिची पारोळा बसस्थानकावर एका मुलासोबत ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत त्याने पीडित मुलीला आपल्या दुचाकीवर बसवून शहरातील एका हॉटेलमध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार फेब्रुवारी २०२५मध्ये घडला होता. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्या नराधमाने मुलीला दुसऱ्या एका हॉटेलवर नेत तिच्यावर दुसऱ्यांदा अत्याचार केला. गेल्या काही दिवसांपासून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मेहरुण परिसरातील शुभांगी कुणाल नाईक या मृत्यूप्रकरणी विवाहितेच्या तिचा पती कुणाल रवींद्र नाईक (रा. मेहरुण) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मेहरुण परिसरातील शुभांगी नाईक या विवाहितेने शनिवारी (१९ जुलै) दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी मुलीला गळफास देऊन मारले, असा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला होता. या प्रकरणात विवाहितेचे वडील राजेंद्र भागवत वाघ यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, शुभांगीचा पती कुणाल याने तिला वारंवार मारहाण करून व शिवीगाळ करून तिचे जगणे कठीण केले व…

Read More