Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » “पैसे द्या, तरच मिळेल अनुदान”; शेतकऱ्याला लाचेची मागणी महागात ; जामनेरात खळबळ !
    क्राईम

    “पैसे द्या, तरच मिळेल अनुदान”; शेतकऱ्याला लाचेची मागणी महागात ; जामनेरात खळबळ !

    editor deskBy editor deskJune 23, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    तुम्ही विहरीचे ठिकाणी बदल केले असून तुम्हाला पैसे मिळणार नाही. जर तुम्हाला विहरीचे पुढील अनुदान पाहिजे असतील तर तुम्हाला मला ३० हजार द्यावे लागतील. असे म्हणत ३० हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या जामनेर पंचायत समिती कार्यालयातील तांत्रिक सहाय्यक कंत्राटी कर्मचारी सागर अशोक नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव, ता. जामनेर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याप्रकरणी जामनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तक्रारदार यांची जामनेर शिवारात शेती असून सन २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षात पंचायत समिती यांच्याकडून प्रस्तावित सिंचन विहीर मंजूर झाली होती. पंचायत समितीचे कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सागर नावकर यांनी प्रस्तावित विहिरीची स्थळ पाहणी करण्यापुर्वीच तक्रारदार यांच्याकडून गावातील रोजगार सेवक यांच्या मार्फत ३० हजार रुपये स्विकारुन स्थळ पाहणी करुन फोटो काढून नेले होते. त्यानंतर तक्रारदार यांना पंचायत समिती यांच्याकडून वेळोवेळी ६० हजार ९६६ रुपये मिळाले होते. उर्वरीत रक्कम मिळण्याकरीता तक्रादार यांनी सागर नावकर यांची भेट घेवून ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

    लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रादार यांनी दि. ६ जून एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. ८ एप्रिल व दि. १४ मे रोजी झालेल्या पडताळणीमध्ये तांत्रीक सहाय्यक यांनी दि. ६ एप्रिल रोजी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार जामनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, कार आणि दोन मोबाईल जप्त

    July 20, 2026

    चाळीसगावच्या निर्णयविरोधात
    किशोर आप्पांचा एल्गार!

    July 17, 2026

    जाणता राजा नगरात भव्य शिव मंदिराचे भूमिपूजन; आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते सोहळा संपन्न

    July 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.