Author: editor desk

यावल : प्रतिनिधी शहरातील बुरूज चौकाजवळ शुक्रवारी कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिला ही गंभीर जखमी झाली होती. या महिलेचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंकलेश्वर बऱ्हाणपूर या राज्य मार्गाच्या कडेला भरत असलेल्या बाजार तसेच रस्त्यात विविध व्यवसाय करणाऱ्या हातगाडी धारकांमुळे रहदारीस अडथडा निर्माण होवून हा अपघात घडल्याने शहरातून संताप व्यक्त होत आहे. तर या पुढे प्रत्येक बाजाराच्या दिवशी हातगाडीसह रस्त्यात दुकान लावणाऱ्यांवर यावल पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिली आहे. सविस्तर वृत्त असे कि, यावल शहरातून अंकलेश्वर बहऱ्हाणपूर राज्य मार्गस्थ होतो. या राज्य मार्गाच्या कडेला शुक्रवारचा आठवडे बाजार भरतो. रस्त्याच्या कडेला व्यवसायिकांच्या दुकाना…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील बोरखेडा येथील विनोद पुंजू पाटील (वय ४८) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून २७ रोजी सकाळी ९ वाजता स्वतःच्या शेतात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. विनोद पाटील या शेतकऱ्याची बोरखेडा शिवारात शेती आहे. सततची नापिकी, उत्पन्न कमी तर हमीभाव नाही, यातच डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, २ मुले असा परिवार आहे. ते पुंजू पाटील यांचे चिरंजीव तर सुरेश पाटील यांचे पुतणे व सुमित पाटील यांचे वडील होत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात एका ४८ वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला आणि मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकून देण्यात आला. ही घटना दि. २५ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी महिला व खून करणारा संशयित आरोपी उंदीरखेडा (ता. पारोळा) येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीचे नाव उघड केलेले नाही. शोभाबाई रघुनाथ कोळी असे या मृत महिलेचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील सुमठाणे शिवारात दि. २५ रोजी सामाजिक वनीकरणाच्या जंगलामध्ये सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास इंधवे (ता. पारोळा) येथील काही तरुण बकऱ्या चारून घरी परत येत होते. त्यावेळी त्यांना एका महिलेचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गोलाणी मार्केट परिसरात दुकानाजवळ येऊन टोळक्याने फिरोज खान सरदार खान (३६, रा. मुस्लीम कॉलनी, आकाशवाणी केंद्राच्या मागे) यांना दमदाटी करीत लाकडी काठीने मारहाण केली. ही घटना २७ जून रोजी घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन ते चार अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, आकाशवाणी केंद्राच्या मागील बाजूस असलेल्या मुस्लीम कॉलनीतील रहिवासी फिरोज खान सरदार खान यांच्या दुकानाजवळ तीन ते चार जण आले व वाद घातला. तसेच शिवीगाळ करीत खान यांना लाकडी काठीने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी फिरोज खान यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी घरगुती वापरासह व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा करून ठेवणाऱ्या वसीम चंगा शाह (२८, रा. वीर सावरकर नगर, पिंप्राळा) याला रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेत १९ गॅस सिलिंडर जप्त केले. ही कारवाई २७ जून रोजी वीर सावरकर नगरात करण्यात आली. या प्रकरणी शाह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, पिंप्राळा परिसरातील वखारीजवळ एका व्यक्तीच्या घरात विक्री करण्याच्या उद्देशाने गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या साठा केल्याची माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोउनि सचिन रणशेवरे, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, विनोद सूर्यवंशी, अजय सपकाळे यांना कारवाईच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावर दि.२६ जून रोजी घराकडे जात असलेल्या भूषण मोतीलाल पवार (३४) व त्यांचा मोठा भाऊ शरद पवार यांची दुचाकी अडवून जुन्या वादातून तीन जणांनी त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भूषण पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सुरेश आव्हाड करीत आहेत. जुन्या जोशी कॉलनीतील रहिवासी भूषण पवार व त्यांचा भाऊ शरद पवार हे दुचाकीने घरी जात होते. शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावर तीन जणांनी जुन्या वादातून दुचाकी अडविली व शिवीगाळ करीत…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या गृह विभागाच्या निकालामध्ये दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक  नारायण व्यंकटराव पाटील यांची लिपिक पदी निवडीबद्दल त्यांचे दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा. वासुदेव पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आपल्या मनोगतात नारायण पाटील यांनी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे आभार व्यक्त केले. शासकीय नोकरीची ही माझी चौथी वेळ आहे याअगोदर माझी डाक सहाय्यक, कालवा निरीक्षक व तलाठी या तीन ठिकाणी निवड झाली होती.  परीक्षेचा अभ्यास करत असतांना अनेक वेळा अपयशाला तोंड द्यावे लागते पण विद्यार्थ्यांनी  ध्येय, जिद्द, अभ्यासात सातत्य चालू ठेवले पाहीजे यश निश्चित मिळतेच. नारायण पाटील यांनी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये अनेक…

Read More

मेष : श्रीगणेश म्हणतात की, वेळ आव्हानात्मक असेल. तथापि, तुम्ही तुमच्या योग्यतेने आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊ शकाल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. भविष्यातील योजनांबाबत कुटुंबासोबत काही चर्चा होऊ शकते. आर्थिक बाबतीत कोणाशी तरी थोडे मतभेद होऊ शकतात. व्यवसायातील घडामोडी मंदावू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकते. आरोग्यामध्ये थोडे चढ-उतार असू शकतात. वृषभ : आजची वेळ थोडा अनुकूल असेल. तुम्ही तुमची विशेष कौशल्ये सुधारण्यात चांगला वेळ घालवाल. फोन किंवा इंटरनेटद्वारे नातेवाईक आणि मित्रांना भेटणे सोपे होईल. विद्यार्थी वर्ग आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेईल. आर्थिक अडचणी आणि त्रास समोर येतील. पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही. कुटुंबातील सदस्यांचे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या मुद्यावरून काढण्यात येत असलेल्या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ही केवळ राजकीय भूमिका आहे असे मी म्हणणार नाही. कोणाच्याही समोर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतका वेगळ्या पद्धतीने विरोध झाला नसता. असा दावा फडणवीस यांनी केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत. म्हणून काय झाले? मात्र त्यांच्या काही भूमिका आहेत. तर माझ्या काही भूमिका आहेत. सर्वांच्या सारख्या भूमिका असत्या तर सर्व एका पक्षात राहिले असते. त्यामुळे भूमिका वेगळ्या असू शकतात. मात्र उद्धव ठाकरे यांनी जर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरून वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सरकारला हा निर्णय मागे घेण्यास वेळोवेळी सांगितलेही होते. मात्र त्यावर तोडगा निघत नसल्याने आता ठाकरे बंधूंचा हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा निघणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही, तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे. भाषा, शिक्षण हा एक असा मुद्दा आहे, जो खूप गांभीर्याने घेतला पाहिजे. आपण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जायला पाहिजे. इतर कोणतेही राज्य अशाप्रकारे काम करत नाही. महाराष्ट्र इतका आग्रही पवित्रा…

Read More