Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !
    क्राईम

    दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

    editor deskBy editor deskJune 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    गोलाणी मार्केट परिसरात दुकानाजवळ येऊन टोळक्याने फिरोज खान सरदार खान (३६, रा. मुस्लीम कॉलनी, आकाशवाणी केंद्राच्या मागे) यांना दमदाटी करीत लाकडी काठीने मारहाण केली. ही घटना २७ जून रोजी घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन ते चार अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, आकाशवाणी केंद्राच्या मागील बाजूस असलेल्या मुस्लीम कॉलनीतील रहिवासी फिरोज खान सरदार खान यांच्या दुकानाजवळ तीन ते चार जण आले व वाद घातला. तसेच शिवीगाळ करीत खान यांना लाकडी काठीने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी फिरोज खान यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. विरेंद्र शिंदे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव क्रुझरची दुचाकीला जोरदार धडक; यावलमध्ये पोलीस कर्मचारी जखमी

    April 20, 2026

    अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर हल्ला? जळगाव तालुक्यात १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

    April 20, 2026

    आठ दिवसावर लग्न असताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.