Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था बीड येथील कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झाल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणातील एक आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या जवळचा असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता संदीप क्षीरसागर यांनी स्वतः पुढे येत स्पष्टीकरण दिले आहे. प्रस्तुत प्रकरणात आरोपी माझ्या जवळचे असले तरी पीडितेने तक्रार दाखल करतात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मी त्यांच्यासारखा 150 दिवस पळून गेलो नाही, असे ते म्हणालेत. बीड येथील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झाले होते. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार 2 शिक्षकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यापैकी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था जालना जिल्ह्यात भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्य प्रकरणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सभागृहात मांडला. या प्रकरणात लोणीकर, कृषिमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी त्यांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ जात राजदंडला देखील स्पर्श केला. त्यामुळे अध्यक्षांनी त्यांनी एका दिवसासाठी निलंबित केले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रोज निलंबित केले तरी सभागृहात आवाज उचलणार असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक दिवसासाठी निलंबित केले आहे. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. लोणीकरांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आज जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील प्राथमिक विद्या मंदिर तांडा या शाळेत हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या सहकार्याने प्राप्त झालेल्या वह्यांचे वाटप १ली ते ४थीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा दुध संघाचे संचालक रमेश पाटील हे होते. सुरवातीला अध्यक्षांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंर आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भारती सोनार यांनी केले व उपस्थित मान्यवरांनी वसंतराव नाईक यांच्या बद्दल माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात रमेश पाटील…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सरकारचे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दूसरा दिवस असून आज विरोधक शक्तिपीठ महामार्गावरून सरकारला घेरू शकतात. तसेच ज्या जिल्ह्यांमधून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे, त्या भागातील शेतकरी व स्थानिक आंदोलन करणार असल्याची माहिती आहे. तसेच बीडमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या मुद्दा सभागृहात व बाहेर देखील तापण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या मुंब्रा येथे झालेल्या लोकल अपघाताचा देखील प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. गजनी सरकार, विसरभोळा कारभार असे रोहित पवारांकडून विधानभवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली. रोहित पवार म्हणाले, आज विधिमंडळात कृषी दिन साजरा केला जाणार आहे. पण हे जे गजनी सरकार आहे, विसरभोळा कारभार अशी यांची परिस्थिती आहे. सरकारमध्ये…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजपासून जुलै महिन्याला सुरुवात झाली असून तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची कपात केली आहे. हे नवीन दर मंगळवार (१ जुलै) पासून लागू झाले आहेत. त्याचवेळी, घरगुती गॅस सिलिंडरच्या म्हणजेच १४ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात केल्याने व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेली कपात ही दैनंदिन कामकाजासाठी गॅसवर अवलंबून असलेल्या सर्व व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी आहे. या सिलिंडरच्या दरात कपात केल्याने हॉटेल, रेस्टॉरंट्स, ढाबे इत्यादी व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळेल कारण, ते मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरतात. कमी किमतींमुळे, या…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अडावद येथून जवळ असलेल्या वर्डी येथून अवैधपणे ओला गांजाची विक्री करणाऱ्या तरूणावर अडावद पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून १ लाख ४ हजारांचा ओला गांजा जप्त केला करुन अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील वर्डी गावातून एक तरूण अवैधपणे गांजाची चोरटी विक्री करत असल्याची गोपनिय माहिती अडावद पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी २८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता कारवाई करुन संशयित सुनील उर्फ तिसमाऱ्या जगन बारेला (वय १९, रा. वर्डी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख ४ हजार रूपये किंमतीचा ५ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी हवालदार संजय धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील सुमठाणे येथील वनक्षेत्राच्या कुरण जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत सापडलेल्या शोभाबाई रघुनाथ कोळी (वय ४८, रा. उंदिरखेडे, ता. पारोळा) यांच्या मृतदेहाची पोलिसांनी ओळख पटवली. त्यानंतर तपासचक्रे फिरवित महिलेचा खून करुन पसार होत असलेल्या अनिल गोविंदा संदांशिव (वय ४५, रा. उंदीरखेडे, ता. पारोळा) याच्या मुसक्या आवळल्या. त्याला खाक्या दाखविताच महिलेकडे असलेल्या सोन्यांच्या दागिन्यांसाठी आणि महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून त्याने खून केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सविस्तर वृत्त असे कि, वनक्षेत्राच्या राखीव कुरण जंगलाच्या मध्यभागी एका महिलेला छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजून गेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव- चांदवड महामार्गावरील चाळीसगाव शहराला लागून असलेल्या खडकी बु, या गावातून गेलेल्या महामार्गावर सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, गावातील आबा जानराव (धनगर) (३५) हे गावातील भगवान कोल्हे (२६) याला सोबत घेऊन दुचाकीवरून शेताकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिली. या धडकेत आबा जानराव याचा मृत्यू झाला. भगवान कोल्हे हा गंभीर जखमी झाला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर कोणीच दिसत नसल्याचा फायदा घेत वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. अपघात करणारे वाहन हे टेम्पो…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील तरुणीला नोकरीच्या आमिषाने नाशिकला नेत काही जणांनी तिचे कोल्हापूरच्या मुलाशी परस्पर लग्न लावून देण्याच्या प्रकरणात आता वर मुलाने जळगावची वधू व मध्यस्थांविरुध्द तक्रार दिली आहे. त्यावरून मुलीसह पाच जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. आशिष सदाशिव गंगाधरे (३०, रा. थेरगाव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे या तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, आशिषच्या तक्रारीत म्हटले आहे की, वधू, मीनाक्षी जैन, सुजाता ठाकूर, अक्षय ठाकूर व धनश्री या मंडळींनी आपल्याला मुलगी दाखविली. आपण त्यांना एक लाख ९५ हजार रुपये दिले आणि…

Read More

मेष : पालकांच्या आशीर्वादाने, कामात चांगले परिणाम मिळून, आनंद होईल. कामाचा आणि वागण्याचा इतरांवर सकारात्मक परिणाम होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर व्यवसाय क्षेत्राशी संबंधित लोकांचा सल्ला नक्कीच घ्या. पैशाशी संबंधित कोणताही जुना व्यवहार आज फायदेशीर ठरू शकतो. वृषभ : बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी असे संकेत आहेत. जे काम करत आहेत, त्यांना चांगल्या कामासाठी पगारवाढ मिळू शकते. तुमच्या उत्साहासोबतच, नवीन गोष्टी जाणून घेण्याची मनात उत्सुकता देखील असेल. मिथुन : ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांकडून तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टबद्दल सल्ला मिळू शकतो, परंतु तुम्हाला तुमच्या समजुतीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. खूप दिवसांपासून प्रलंबित असलेले कोणतेही काम पूर्ण होईल. व्यवसायात…

Read More