Author: editor desk

भविष्यात या रस्त्यावर दुर्दैवी घटना घडल्यास याल जबाबदार कोण ? जळगाव : प्रतिनिधी  जळगाव-पाळधी महामार्गावर गेल्या काही दिवसापासून रस्त्याचे काम सुरू आहे मात्र हे काम संथ गतीने सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वाहतूक जाम होत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. जळगाव-पाळधी महामार्गावर पाळधी ते बांभोरी या रस्त्यावर एका रस्त्याचे काम सुरू आहे त्यामुळे सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक जाम होत आहे तर आज पहाटे रुग्णवाहिका देखील या रस्त्याच्या कामामुळे काही वेळ अडकून राहिली होती भविष्यात या रस्त्यामुळे अशी जर रुग्णवाहिका अडकून राहिली तर सर्वसामान्य रुग्णाच्या जीवाशी खेळ होऊ शकतो त्यामुळे ठेकेदाराने या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरापासून नजीक असलेल्या एमआयडीसी परिसरात नुकतेच दि.२ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अवैध दारू विक्रेत्याने गोळीबार केल्याची घटना ताजी असताना आता  एरंडोल तालुक्यातील कढोली गावात झालेल्या या गोळीबारात ३१ वर्षीय तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कढोली गावातील हा तरुण एका खाजगी कंपनीत काम करत असून उद्या पारोळा येथे होणाऱ्या रथोत्सवासाठी तो आई-वडिलांसोबत गावी जाण्याच्या तयारीत होता. आज (दि. ३) दुपारी सुमारास चार वाजताच्या सुमारास तो घराच्या मागील बाजूस उभा असताना अचानक अज्ञात दिशेने गोळी झाडण्यात आली. गोळी थेट छातीत घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. तत्काळ त्याला जळगाव शहरातील एका…

Read More

चाळीसगाव येथे सुवर्णा स्मृती उद्यान लोकार्पण व १४२ कोटी रुपयांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न… चाळीसगाव  : प्रतिनिधी  कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर रविवारी सायंकाळी दिव्यांच्या रोषनाईत, फटाक्यांच्या आतषबाजीत न्हाऊन निघालेल्या अल्हाददायक वातावरणात चाळीसगाव शहरात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या सुवर्णा स्मृती उद्यानाचे लोकार्पण तर शहरासाठी पुढील ३० वर्षाचे नियोजन लक्षात घेऊन १४२ कोटी रुपये खर्चाच्या मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपुजन आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या संपन्न झाले, यावेळी स्केटींग खेळणा-या मुलांच्या हस्ते उद्यानात साकारलेल्या स्केटिंग ग्राउंडचे उद्घाटन देखील करण्यात आले. नुकतेच केबीसी मध्ये सहभागी होत चाळीसगावचे नाव बिग बी अमिताभजी यांच्या ओठी आणणारी कु. श्रद्धा किशोर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  रामानंद नगर पोलिसांनी माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांच्या शिवराम नगर येथील ‘मुक्ताई’ निवासस्थानी झालेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा केला असून, पोलिसांनी तिघांना अटक करून सुमारे ६ लाख ४५ हजार रुपयांचा सोन्या–चांदीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, ही घटना २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते २८ ऑक्टोबर सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोंडा तोडून सुमारे ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल व ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली होती. घराची देखभाल करणारे चेतन सुरेश देशमुख यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक महेश्वर…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने सोमवारी सुप्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांची वकिलीची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करून त्यांना जोरदार झटका दिला. असीम सरोदे हे सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत. पण आता त्यांची सनद रद्द झाल्यामुळे त्यांना या प्रकरणात कोणताही युक्तिवाद करता येणार नाही. असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल व विधानसभा अध्यक्ष यांच्याविषयी काही आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यांच्या या विधानांमुळे न्याय व्यवस्थेचा अवमान झाला असून, न्यायालयांविषयी अविश्वास निर्माण झाला आहे, अशी तक्रार एका व्यक्तीने बार कौन्सिलकडे केली होती. या प्रकरणी असीम सरोदे यांना 19…

Read More

हैदराबाद : वृत्तसंस्था तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात २० प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हैदराबाद-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील खानपूर गेटजवळ एका डंपर ट्रकने आरटीसी बसला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. ही बस तंदूरहून हैदराबादकडे जात होती. बसमध्ये ७० हून अधिक प्रवासी होते, त्यापैकी बहुतेक विद्यार्थी होते. हे विद्यार्थी रविवारच्या सुट्टीसाठी घरी गेले होते व कॉलेजसाठी हैदराबादला परत येत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर ट्रकचा चालक नियंत्रण गमावल्याने त्याने बसला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत बसचे मोठे नुकसान झाले. डंपरवर भरलेली खडी बसच्या समोरील भागात कोसळली, ज्यामुळे अनेक प्रवासी आत…

Read More

दोघे गंभीर जखमी; आरोपी फरार, पोलिसांचा तपास सुरू जळगाव : प्रतिनिधी शहरापासून नजीक असलेल्या एमआयडीसी परिसरातील विजेता इंडस्ट्रीज कंपनीच्या बाहेर अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्याकडून कंपनीतील कामगारांवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २ नोव्हेंबर) रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास घडली. या गोळीबारात दोन कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची नावे राजन शेख रफिउल्ला (वय २०) आणि अहेमद फिरोज शेख (वय २६) अशी आहेत. दोघेही विजेता इंडस्ट्रीजमध्ये काम करीत असून, त्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी जी सेक्टर १४ मधील विजेता इंडस्ट्रीजमध्ये काम करणारा सरफू शेख हा रविवारी नाईट ड्युटीसाठी कंपनीत जात असताना…

Read More

यावल : प्रतिनिधी आमोदा मोर नदी पुलाजवळ रविवारी सकाळी भीषण अपघात घडला. केळी मजूर घेऊन जाणारी ट्रक उलटल्याने २५ मजूर जखमी झाले. हा अपघात सकाळी ८.३० वाजता झाला. दरम्यान अपघात स्थळी उभ्या असलेल्या दोन मोटरसायकलस्वारांनाही खासगी बसने धडकल्याने तिघे जखमी झाले. या रविवारी सावदा येथून जामनेर येथे केळी कापणीसाठी आयशर ट्रकने (एमएच ४३ वाय ५०७४) ३० ते ४० मजूर जात होते. आमोदा मोर नदीच्या अलीकडील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेऊन जखमींना बाहेर काढले आणि फैजपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. जखमींवर डॉ. शैलेंद्र खाचणे यांनी उपचार केले. रुग्णालयात जखमींच्या नातेवाइकांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असताना आता  मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे पैशाच्या वादातून व्यसनी मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडका घालून त्याचा खून केला. ही घटना अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथे शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटजवळ घडली. यातील आरोपीस रविवारी सकाळी अंतुर्ली परिसरातील एका शेतातून अटक करण्यात आली आहे. जगदीश दामू तायडे (६०), असे खून झालेल्या पित्याचे तर गणेश जगदीश तायडे (२५), असे आरोपी मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश यांचा लहान मुलगा गणेश हा व्यसनी असल्यामुळे त्याला नेहमी पैसे पाहिजे असत. आंदलवाडी (ता. रावेर) येथील शेतीचे मला पैसे द्या किंवा बोकड विकून आलेले पैसे द्या,…

Read More

आजचे राशिभविष्य दि ३ नोव्हेंबर २०२५ मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस त्यांच्या बाजूने असेल. त्यांना नशीब साथ देईल. व्यवसायात अनपेक्षित आर्थिक फायदा होऊ शकतो. कोणाकडूनही पैसे उधार घेणे टाळा. जोडीदाराच्या मदतीने कौटुंबिक वाद दूर होतील. नातेसंबंध सुधारतील. कुटुंबासोबत जेवणाचा आनंद घ्याल. त्यामुळे मुले आनंदी राहतील. जुन्या मित्राची भेट फायदेशीर ठरेल. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. सकारात्मक विचार करा वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींना आज त्यांच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. सर्वजण घरकामात मदत करतील. प्रवासाचे नियोजन करा. ज्यामुळे प्रवासाचा आनंद घेता येईल. एखाद्या मित्राच्या भेटीमुळे तुमचा मूड चांगला होईल. नोकरी करणाऱ्यांना अनुकूल बदली मिळू शकते.…

Read More