मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे सरकारने आत्ता मदत करावी यासाठी सर्वच विरोधक हल्लाबोल करीत असताना आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. अजित पवार यांनी केलेल्या “सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?” या विधानावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले की, “अजित पवारजी, तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का?” महाराष्ट्रातील शेतकरी आजही अवकाळी पावसामुळे, पिकांच्या नुकसानीमुळे आणि शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे मोठ्या अडचणीत आहेत. “हे शेतकरी कठोर परिश्रमाने अन्न पिकवतात, पण तुमचे सरकार त्यांच्या कष्टाची परतफेडही करू…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था देशातील सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून निवडणूक आयोगाने अंग झटकून कामाला सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी गट व गणांची रचना, आरक्षण व मतदार यादीचे काम जवळपास पूर्ण केले आहे तर नगरपालिकेची प्रभाग रचना, आरक्षण सोडत, तर अंतिम मतदार यादी 31ऑक्टोबरला जाहीर केली आहे. त्यामुळे आता येत्या आठ दिवसातच जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिकाना मागे ठेवून पहिल्या टप्प्यात नगरपालिकांचा धुरळा उडणार आहे. त्यानुसार 7 नोव्हेंबरला मतदान केंद्राची यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीचे धुमशान आयोगाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य…
पारोळा : प्रतिनिधी न्यायालयातील केस मागे घेण्यासाठी तालुक्यातील दळवेल येथे शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना विचखेडे गावालगत बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. उद्धव कुवर व त्याचा साथीदार याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज हिरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या व आई निलाबाई हिरे यांच्या नावावर असलेल्या शेतासाठी तीन वर्षापूर्वी शासनाकडून शेडनेट अनुदान मंजूर झाले होते. शासनाकडून दोन शेडनेटसाठी १८ लाख रुपये अनुदान मिळाले होते. ठेकेदार उद्धव कुवर यांना अनुदान मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्याला पैशांची गरज आहे म्हणून दोन महिन्यांसाठी १८ लाख रुपये उसनवार मागितले. त्यानुसार हिरे यांनी १८ लाख…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील उमाळे गावाजवळ १ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात योगेश रामहरी नंदे (वय ३०, रा. गेंदालाल मील, जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला. तर अमोल सुरेश हुजदार (वय २८, रा. हुडको, शिवाजी नगर) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत योगेश नंदे हा सेंट्रिंगचे काम करून कुटुंबाला हातभार लावत असे. विशेष म्हणजे, सायंकाळी तो आपला लहान भाऊ नागेश याला शिव तीर्थ मैदान परिसरात पाणीपुरी विक्रीच्या गाडीवर मदत करायचा, योगेशच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याची आई ताराबाई एका केटरर्सकडे कामाला जाते, तर…
आजचे राशिभविष्य दि.2 नोव्हेंबर 2025 मेष राशी आज तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात यश मिळेल. सहकाऱ्यांशी आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांशी उदारतेने वागा. कोणत्याही कामात तुमच्या भावंडांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमची नियोजित कामे आज पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तुमचा प्रवास आनंददायी असेल. वृषभ राशी आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामात तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. नोकरीबाबत तुम्ही सल्ला घेऊ शकता, जो फायदेशीर ठरेल. मिथुन राशी आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमचे अडकलेली महत्वाची काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला काही चांगले लोक भेटतील जे तुम्हाला मदत करण्यास नेहमीच तयार असतील. आज…
‘कृषी नवतंत्र आणि बहुमाध्यमे वापरामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचे जीवनमान बदलले’ हा संशोधन प्रबंधाचा निष्कर्ष जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातर्फे जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप मनोरमा केशवलाल तिवारी यांना पीएच. डी. पदवी (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात विद्यावाचस्पती) प्रदान करण्याचे पत्र (नोटीफिकेशन) आज प्रदान करण्यात आले. विद्यापिठाचे कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते श्री. तिवारी यांना याबाबत अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रकुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, मार्गदर्शक प्रा. डाॅ. सुधीर भटकर, संशोधन विभागाचे सहायक कुलसचिव प्रविण चंदनकर, डाॅ. सोमनाथ वडनेरे, सुभाष तळेले उपस्थित होते. कबचौउमविती आंतर विद्याशाखेत जनसंवाद व पत्रकारिता…
धरणगाव : प्रतिनिधी येथील पक्षाचे निष्ठावंत शिलेदार तथा कॉन्ट्रॅक्टर मोहीत प्रकाश पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव जिल्हा युवक कार्याध्यक्ष (जळगाव लोकसभा क्षेत्र) पदी नियुक्ती करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई येथील बॅलाड इस्टेट परिसरात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या हस्ते पक्षाचे निष्ठावंत शिलेदार तथा कॉन्ट्रॅक्टर मोहीत प्रकाश पवार यांची जळगाव जिल्हा युवक कार्याध्यक्ष (जळगाव लोकसभा क्षेत्र) पदी नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी पक्षाचे प्रवक्ते शिवराज बांगर, जळगाव युवक अध्यक्ष विश्वजित पाटील उपस्थित होते. युवकांचे संघटन मजबूत व्हावे या उद्देशाने विविध पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.…
निवडणूक प्रक्रियेत आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली जिल्ह्यात आघाडी..! चाळीसगाव : प्रतिनिधी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भारतीय जनता पक्षातर्फे चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेत आचारसंहिता लागायची वाट पाहिली जात असताना आमदार मंगेश चव्हाण यांनी यात आघाडी घेतली असून चाळीसगावमध्ये झालेल्या या मुलाखतींना उमेदवारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षाशी असलेली निष्ठा आणि आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावरील विश्वास व्यक्त केला. नगरपालिका निवडणूक ही सर्वसामान्य जनतेचा आशिर्वाद आणि पक्षनिष्ठ लोकांच्या साथीने लढविण्याचा निर्धार आमदार मंगेशदादांनी यावेळी व्यक्त केला. “केलेल्या विकासकामांच्या बळावर आणि जनतेच्या आशीर्वादानेच आपल्याला नगरपालिकेत बहुमत मिळवायचे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडी अन् मनसेकडून आज काढण्यात येणारा सत्याचा मोर्चा हा त्यांच्या अपयशाची कबुली असल्याची टीका भाजपने केली आहे. आजच्या सत्याच्या मोर्चाद्वारे आम्ही अपयशी आहोत, बेजबाबदार आहोत, नाकर्ते आहोत याची जाहीर कबुली आज मविआचे नेते उद्धव ठाकरे, राज ठाकरे व अन्य मंडळी देतील, असे भाजपने म्हटले आहे. महाविकास आघाडी व मनसेने आज मतदार याद्यांमधील कथित घोळ व मतचोरीच्या मुद्यावर सत्याचा मोर्चा काढणार आहे. फॅशन स्ट्रीटहून निघणारा हा मोर्चा मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर धडकणार आहे. या मोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील काशीबुग्गा व्यंकटेश्वर मंदिरात शनिवारी एकादशीला झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले. रेलिंग कोसळून हा अपघात झाला. जखमी भाविकांना रुग्णालयात नेण्यात आले. अधिकाऱ्यांना मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. मृतांमध्ये बहुतेक महिला आहेत. चेंगराचेंगरीचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये मंदिराच्या पायऱ्यांवर महिला, मुले आणि अनेक वृद्धांसह लोकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. यावेळी, रेलिंग कोसळले आणि लोक गर्दीखाली चिरडले गेले. महिला आणि मुले बाहेर पडण्यासाठी ओरडताना दिसली. अनेक जण जीव वाचवण्यासाठी लोकांवर चढताना दिसले. दरम्यान, अपघातानंतरच्या व्हिडिओंमध्ये लोक गर्दीतून महिला आणि मुलांना बाहेर काढताना दिसत होते. चेंगराचेंगरीच्या ठिकाणी…

