अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील अमरावती जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चांदूरबाजार तालुक्यात शिरजगाव बंड येथील सहा वर्षांच्या चिमुरडीवर ५५ वर्षीय विकृताने अत्याचार केल्याची संतापजनक घटना २ डिसेंबर रोजी घडली. ही धक्कादायक घटना शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात स्पष्टपणे कैद झाली असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजू मुल्ला उर्फ रियाजुद्दीन जहिरुद्दीन मुल्ला (वय ५६, रा. शिरजगाव बंड ) याने आपल्या घराशेजारी राहणार्या चिमुरडीला बिस्किट देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी वीस रुपये देऊन तिला विश्वासात घेतले आणि जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. शाळा परिसरात शांतता असल्याचा फायदा घेत हा घृणास्पद प्रकार घडवून आणल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था देशभर चर्चेत असलेल्या पुण्यातील मुंढवा परिसरातील गाजलेल्या जमीन घोटाळ्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीचा सहभाग समोर आला आहे. या प्रकरणात जमीन विकणाऱ्या शीतल तेजवानी हिला अटक झाली असली, तरी जमीन खरेदी करणाऱ्या कंपनीच्या मुख्य मालकांवर कारवाई का नाही? असा सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. मुंढवा येथील जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ‘अमेडिया’ कंपनीचे नाव चर्चेत आले. या कंपनीत पार्थ पवार यांची 99 टक्के भागीदारी आहे, तर दिग्विजय पाटील हे केवळ 1 टक्का भागीदार…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील हरियाणातील पानिपतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पानिपत पोलिसांनी सहा वर्षांच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करताना चार मुलांचे खून उघडकीस आणले आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी ही पीडितांपैकी एका मुलाची आई आहे. पोलिसांनी 34 वर्षीय पूनमला अटक केली असून तिने चौकशीत थरकाप उडवणारी कबुली दिली आहे, तिला आपल्या मुलांपेक्षा ‘जास्त आकर्षक’ दिसणाऱ्या मुलांना ठार मारण्याची इच्छा व्हायची. पोलिसांच्या मते, पूनमने केवळ अन्य मुलांनाच नाही तर स्वतःच्या तीन वर्षांच्या मुलालाही मारले. कारण, तिला भीती वाटत होती की तो तिच्या आधीच्या खुनाबद्दल माहिती सांगेल. एक मुलगा आणि तीन मुलींची पूनमने हत्या केली आहे. ही मुलं…
धरणगांव : प्रतिनिधी पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलचा दुसरा हप्ता जमा करण्याच्या मोबदल्यात दहा हजारांची लाच घेणाऱ्या गृहनिर्माण कंत्राटी अभियंता गणेश संभाजी पाटील (वय ३१) सह सागर शांताराम कोळी (वय ३०, रा.निंभोरा, ता. धरणगाव) या पंटरला दहा हजारांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारच्या सुमारास झाली असून याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांना सन २०२४-२५ या ब्लॉकमध्ये पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) या योजने अंतर्गत घरकुल मंजुर झाले आहे. या योजनेतुन घरकुलचा पहीला हप्ता दि. ३ फेब्रुवारी रोजी १५ हजार त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले असून त्यातून त्यांनी घराचे बांधकाम केले आहे.…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील आंबापाणी येथे एका ४७ वर्षीय महिलेने फवारणीचे औषध असलेल्या ग्लासामध्ये नजरचुकीने पाणी पिऊन घेतल्याने त्यांना विषबाधा झाली. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या आंबापाणी येथील सायरा मुन्ना पावरा (वय ४७) असे मृत महिलेचे नाव आहे. ती महिला आपल्या घरी असताना तिने फवारणीचे औषध असलेल्या ग्लासमध्ये नजरचुकीने पाणी प्राशन केल्याने त्यांना विषबाधा झाली. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची…
आजचे राशिभविष्य दि. ४ डिसेंबर २०२५ मेष राशी तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेला वाद आज संपेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल तुम्हाला थोडी काळजी वाटू शकते. तब्येत जपा. वृषभ राशी तुमच्या चालू असलेल्या समस्या सोडवल्या जातील, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही घरी धार्मिक विधी करण्याची योजना आखू शकता. जीवन सुधारण्यासाठी तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्याल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. मिथुन राशी आज तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण कराल, ज्यामुळे तुम्ही समाधानी राहाल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा दिवस चांगला आहे. तुम्हाला नवीन बिझनेस ऑफर मिळू शकते. व्यवसाय जोरात चालेल. कर्क राशी तुम्ही तुमचा दिवस धर्मादाय कार्यात घालवू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठीही आजचा दिवस चांगला…
सांगली : वृत्तसंस्था राज्यातील नगरपालिका व नगपरिषदेच्या निवडणूक नुकत्याच पार पडल्या आहे तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज होणारी मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणारे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांपुढे तब्बल 18 दिवस ईव्हीएमवर कडा पहारा ठेवण्याचे आव्हान आहे. त्यातच सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत मतदानात तब्बल 2900 मतांचा फरक आल्यामुळे मोठा राडा झाला आहे. आष्टा नगरपरिषदेसाठी शहरात एकूण 30,574 मतदार आहेत. त्यापैकी 22,864 मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले. पण आता प्रशासनाने काल दिलेली आकडेवारी व आता पोर्टलवर दिसणाऱ्या आकडेवारीत तब्बल 2 हजारांहून अधिक मतांचा फरक दिसून येत आहे. पोर्टलवर एकूण मतसंख्या 33,328 दाखवण्यात…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले आहे. अनेक ठिकाणी शेतातील माती देखील वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पशुधनाचे नुकसान झाले. राज्यातील संकटात अडकलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी करा अशी आम्ही सर्वजणांनी मागणी केली आहे. परंतु हे सरकार कर्जमाफीबाबत गंभीर नाही. अतिवृष्टीनंतर काही महिने उलटून गेले तरीही, कर्जमाफीसाठी महाराष्ट्र शासनाने अद्याप प्रस्तावच पाठविलेला नाही. खुद्द केंद्र सरकारने याबाबतची सत्य परिस्थिती उघड केली आहे. राज्यातील शेतकरी बांधव दयनीय अवस्थेत असताना सत्ताधारी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट झाल्याचा एक फोटो समोर आला आहे. मुंबईतील एका खाजगी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट झाली. या दोघांमध्ये साधारण 20 मिनिटे चर्चा झाल्याचे म्हंटले जात आहे. या भेटीने सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.राज्याचे अन्न व नागरी पुरवठा सचिव राजेश नार्वेकर यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला. आयएएस अधिकारी नार्वेकर हे संजय राऊत यांचे व्याही आहेत. कौटुंबिक कार्यक्रम म्हणून संजय राऊत कुटुंबासह या विवाहाला उपस्थित होते. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विवाह…
मुंबई : वृत्तसंस्था स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या सायबर सुरक्षेसाठी केंद्र सरकारने आणलेल्या ‘संचार साथी’ अॅपमागे मुळात हेरगिरीसाठी वापरले जाणारे पेगासस तंत्रज्ञानच वापरले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. “सरकारने पेगाससचे नाव बदलून संचार साथी केले. हा जनतेवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न आहे,” अशी टीका त्यांनी पक्ष प्रवेश कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना केली. ठाकरे म्हणाले, “लोकांनी ज्यांना मतदान केले, त्यांच्यावर लक्ष ठेवण्याऐवजी देशावर हल्ले करणाऱ्यांवर पाळत ठेवावी. दिल्लीतील बॉम्बस्फोट, पहलगाममधील घुसखोरी – या प्रश्नांवर सरकारचे मौन चिंताजनक आहे.” ठाकरे यांच्या शिवसेनेत आज पुन्हा अनेक कार्यकर्त्यांनी पुनर्प्रवेश केला. “गद्दारांचा बुडबुडा फुटला आहे. त्यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, बाचाबाची सुरू आहे. त्यामुळे…

