Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रभाग क्र. १३ मध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदानाचे आवाहन; बंडखोर उमेदवारांबाबत भाजपचा इशारा
    राजकारण

    प्रभाग क्र. १३ मध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदानाचे आवाहन; बंडखोर उमेदवारांबाबत भाजपचा इशारा

    editor deskBy editor deskJanuary 8, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १३ मध्ये भाजपा–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस–रिपाई महायुतीकडून अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर महायुतीचे कमळ, धनुष्यबाण व घड्याळ चिन्हावरील सर्व अधिकृत उमेदवार जाहीर झाले असून, मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता अधिकृत उमेदवारांनाच मतदान करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

    प्रभाग क्र. १३ मध्ये भारतीय जनता पक्षाचे १३-अ गटातून नितीन प्रभाकर सपके, १३-ब गटातून सौ. सुरेखा नितीन तायडे हे अधिकृत उमेदवार असून १३-क गटातून सौ. वैशाली अमित पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १३-ड गटातून देवकर प्रफुल्ल गुलाबराव हे अधिकृत उमेदवार आहेत.

    दरम्यान, भाजपकडून इच्छुक असलेल्या काही उमेदवारांनी पक्षाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपली उमेदवारी मागे न घेता अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. हे उमेदवार जणूकाही पक्षाचेच अधिकृत उमेदवार असल्याप्रमाणे प्रचार करत असल्याचे निदर्शनास येत असून त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

    याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करताना सांगण्यात आले आहे की, प्रभाग क्र. १३ मधील अ, ब व ड गटातील कमळ व घड्याळ चिन्हावरील उमेदवार हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. संबंधित बंडखोर उमेदवारांनी येत्या दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट न केल्यास त्यांच्यावर पक्षातर्फे योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग क्र. १३ मधील सर्व सुजाण मतदारांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन महायुतीकडून करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगाव नगर परिषदेत विनय (पप्पू )भावे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

    January 13, 2026

    राजकारण नव्हे, समाजकारण! प्रभाग क्र. १६ मध्ये विकासासाठी सज्ज इच्छा दीपक अत्तरदे

    January 11, 2026

    प्रभाग ९ मध्ये जयश्री राहुल पाटील यांना वाढता प्रतिसाद

    January 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.