Author: editor desk

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील पैलाड भागातील शिवाजी नगरमधील चेतन उर्फ़ सत्तूकिरण धोबी (वय २०) याला उपविभागीय दंडाधिकारी मयूर भंगाळे यांनी ६ महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहेत. चेतन धोबी यांच्याविरुद्ध पैसे लुटणे, मोबाईल हिसकावणे, शारीरिक दुखापत करून रक्कम लुटणे, गावठी पिस्टल बाळगणे, दुचाकी चोरी आदी प्रकारचे ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यापासून शहरातील नागरिकांच्या सुरक्षेस धोका असून गावातील शांतता व कायदा व सुव्यवस्थेस धोका निर्माण झाला आहे म्हणून पो.नि. दत्तात्रय निकम यांनी चेतन धोबी याला जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून २ वर्षे हद्दपार करण्यासाठी डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी मयूर भंगाळे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. तर…

Read More

वरणगाव : प्रतिनिधी शहरातील एका व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने शहरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील रहिवासी संजय हरी सुरवाडे (४६) यांनी सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घराच्या खिडकीच्या गजाला दोर बांधून गळफास घेतला. आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत चुलतभाऊ विजय सुरवाडे यांच्या खबरीवरून पोलिसांत ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.हे.कॉ. सुभाष सपकाळ करत आहेत.

Read More

आजचे राशिभविष्य दि.९ डिसेंबर २०२५ मेष राशी आज, तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीची भेट होऊ शकते जी फायदेशीर ठरेल. तुमच्या मुलांकडून मिळालेली चांगली बातमी तुमच्या हृदयाला आनंद देईल. आळस झटका नी कामाला लागा नाहीतर नंतर होईल पश्चाताप. वृषभ राशी आज, तुम्ही मित्रांची समस्या सोडवून द्या, त्यांना आनंद होईल. तुमचा दिवस समाधानी जाईल. घरच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये वेळ घालवाल, बरेच पैसे खर्च होतील. मिथुन राशी आज, कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या कामगिरीमुळे तुमच्या घरात आनंदी वातावरण येईल. रात्रीचे जेवण आणि मनोरंजन हा एक संस्मरणीय कार्यक्रम असू शकतो. थोड्याशा मेहनतीने तुम्ही उच्च पदावर पोहोचू शकता. कर्क राशी आज तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाच्या योजना…

Read More

क्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्टीचं आकर्षण वर्षभर असतं. या खास दिवसांत प्रत्येकाला आपला लुक ग्लोइंग, फ्रेश आणि सगळ्यांपेक्षा वेगळा दिसावा असं वाटतं. पण पार्टीच्या दोन दिवस आधी स्किन केअर सुरू केल्याने जादू होत नाही. विशेषतः हिवाळ्यात त्वचा कोरडी, निस्तेज आणि खवट झालेली असते. त्यामुळे आजपासूनच योग्य स्किन रूटीन सुरू केल्यास तुमचा पार्टी लुक एकदम परफेक्ट दिसू शकतो. 1. डीप क्लींजिंगने करा सुरुवात थंडीत चेहऱ्यावर धूळ, तेल आणि मळ पटकन जमा होतो. त्यामुळे चेहरा डल दिसतो. दररोज रात्री स्लीपिंगच्या आधी डीप क्लींजरने चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा. यामुळे रोमछिद्रांमधली घाण निघून जाते आणि त्वचा नैसर्गिकरित्या उजळू लागते. 2. हायड्रेटिंग सीरम खूप महत्त्वाचं…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था  पार्थ पवार यांच्याशी संबंधित कथित जमीन घोटाळा प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अनिल पाटील यांनी दमानिया यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार प्रहार केला आहे. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना अनिल पाटील म्हणाले, “अंजली दमानिया सुपारी घेऊन काम करतात. त्या ज्यांच्या इशाऱ्यावर चालतात, त्या मास्टरमाइंडचा उद्देश राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचा आहे.” अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा अधिकार दमानिया यांना कोणी दिला असा प्रश्नही त्यांनी केला. पाटील पुढे म्हणाले, “कधी अजित पवार, तर कधी धनंजय मुंडे— ज्यांची सुपारी घेतली…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था  राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद सुपूर्द करण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या नावाला कडाडून विरोध करत आदित्य यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले तर 2019 मध्ये शिवसेना आमदारांना जो अनुभव आला तोच अनुभव आता ठाकरे गटाच्या आमदारांना येईल, असे ते म्हणालेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर येथे सुरुवात झाली. या अधिवेशनात पहिल्यांदाच विधानसभा व विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. विरोधकांनी सरकारवर हे पद हेतुपुरस्सर रिक्त ठेवण्याचा आरोप केला आहे. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेतेपद निवडीचा अधिकार मुख्यमंत्री किंवा सरकारकडे नाही,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील अनेक दावे करीत असताना आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. मी चांगले काम करत असल्याने माझ्यावर जळणारे लोक माझा घातपात करण्याच्या तयारीत आहेत. माझ्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पकडलेल्या तीन आरोपींनी जबाबात धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे. असे असतानाही जालन्याच्या पोलिस अधीक्षकांनी धनंजय मुंडे यांना अटक करण्यासाठी गृहमंत्र्यांकडे परवानगी का मागितली नाही? असा सवाल उपस्थित करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा प्रशासनावर आणि सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, नोंदी सापडूनही प्रमाणपत्रे दिली जात नसल्यास पुन्हा आंदोलनाचा विचार करावा लागेल, असा इशाराही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात महिला घरामध्ये झोपलेली असतांना मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास संशयित महिलेच्या घरात शिरला. त्याने महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. ही घटना दि. ६ रोजी घडली. याप्रकरणी संशयित धनराज सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय महिला वास्तव्यास आहे. दि. ६ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास झोपलेल्या होत्या. यावेळी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास संशयित धनराज सोनवणे हा अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरला. त्याने महिलेच्या अंगावर हात फिरवून तिच्या मनास लज्जा होईल असे कृत्य केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर महिलेने दुसऱ्या दिवशी सकाळी तालुका पोलिसात तक्रार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी नशिराबादकडून पाळधीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा टायर अचानक फुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन दोनदा उलटले व दुभाजक ओलांडत विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलरच्या डिझेल टॅंकवर धडकले. या विचित्र व भीषण अपघातात कारचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला असून कारमधील दोघे युवक-युवती गंभीर जखमी झाले. ही घटना रविवार, दि. ७ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास बायपासवरील आव्हाणे शिवारात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शहराबाहेरील बायपास मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याच मार्गावरून तरसोद फाट्याकडून (एमएच 19 EG 1878) क्रमांकाची कार पाळधीकडे जात होती. दरम्यान, अचानक टायर फुटल्याने वाहनाचा तोल सुटला व कार दोनदा उलटून दुभाजक ओलांडत पाळधीकडून तरसोदकडे जाणाऱ्या (CJ 07 BR…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी जळोद रस्त्यावर आर्मी स्कूलजवळ २४ नोव्हेंबरला दुपारी जावयाने सासूच्या कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून तिला मारहाण केल्याची घटना घडली. उपचार घेतल्यानंतर पीडित महिलेने फिर्याद दिली असून जावयाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबापिंप्री (ता. पारोळा) येथील मीनाबाई समाधान कोळी असे सासूचे तर विनोद विक्रम कोळी (रा. खंबाळे, ता. शिरपूर) असे जावयाचे नाव आहे. पत्नीने तीन वर्षापूर्वी आत्महत्या केली आणि दुसरे लग्न केले असले तरीही विनोद हा पहिल्याच सासुरवाडीत राहत होता. मीनाबाईचा मुलगा भरत आणि जावई विनोद कोळी यांच्यात वाद झाला. तो मिटविण्यासाठी २४ नोव्हेंबरला विनोदने फोन करून मीनाबाईला अमळनेर शहरात  पैलाड येथे बोलावले. ती आल्यावर…

Read More