Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रभाग ७ मध्ये महायुतीच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; शिव कॉलनीत उमेदवारांचे जल्लोषात स्वागत
    जळगाव

    प्रभाग ७ मध्ये महायुतीच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; शिव कॉलनीत उमेदवारांचे जल्लोषात स्वागत

    editor deskBy editor deskJanuary 8, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    जळगाव शहरात विधानसभा निवडणुकीचे वारे वेग घेत असतानाच प्रभाग ७ मध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. बुधवारी शिव कॉलनी परिसरात निघालेल्या या पदयात्रेने पाहता पाहता भव्य जनसागराचे रूप धारण केले होते.

    पदयात्रेच्या स्वागतासाठी परिसरातील महिलांनी घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अनेक ठिकाणी उमेदवारांवर पुष्पवृष्टी करण्यात आली, तर सुवासिनींनी औक्षण करून विजयाचा टिळा लावत शुभेच्छा दिल्या. घराघरांतून झालेल्या या आपुलकीच्या स्वागतामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

    या पदयात्रेत प्रभाग ७ मधील महायुतीचे सर्व अधिकृत उमेदवार सहभागी झाले होते.
    प्रभाग ७ ‘अ’ – दीपमाला मनोज काळे,
    प्रभाग ७ ‘ब’ – अंकिता पंकज पाटील,
    प्रभाग ७ ‘क’ – विशाल सुरेश भोळे,
    प्रभाग ७ ‘ड’ – चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे

    या उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच प्रलंबित विकासकामांबाबत चर्चा केली.

    प्रचारादरम्यान स्थानिक तरुण व निष्ठावान कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा सहभागी झाला होता. चेतन तिवारी, मनोज भंडारकर, जितेंद्र चव्हाण, रोहित भोंबे, प्रीतम गुजर, पंकज पाटील, बंटी नेरपगार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी दिलेल्या जोरदार घोषणांनी शिव कॉलनी परिसर दणाणून गेला. महायुतीच्या या शक्तिप्रदर्शनामुळे प्रभाग ७ मध्ये निवडणुकीची रंगत वाढली असून, नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता महायुतीच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मेहुणबारे पोलिसांचे यश; मोटरसायकल चोरी प्रकरणी आरोपी अटकेत

    January 20, 2026

    मुंगसे–सावखेडा रस्त्यावर ट्रॅक्टर उलटले; १५ वाळू मजूर जखमी

    January 20, 2026

    दोन सख्या भावांविरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल !

    January 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.