धरणगाव : प्रतिनिधी येथील रहिवाशी विनय व विक्रम भावे यांच्या मातोश्री स्व.श्रीमती वीणा शशिकांत भावे यांचे आज दिनांक:-०८/१२/२०२५ वार:-सोमवार रोजी दुःखद निधन झाले तरी त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक:-०८/१२/२०२५ वार:-सोमवार रोजी सकाळी ठीक:-११:०० वाजता राहते घर गणेश नगर हेडगेवार नगर ग्रामपंचायत येथून निघणार आहे तरी परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रभू चरणी प्रार्थना. अमरधाम:-मार्केट कमिटी स्मशानभूमी धरणगाव. ठिकाण:- गणेश नगर हेडगेवार नगर ग्रामपंचायत धरणगाव वेळ:-सकाळी ११:०० वाजता वार:-सोमवार दिनांक:-०८/१२/२०२५
Author: editor desk
आजचे राशिभविष्य दि.८ डिसेंबर २०२५ मेष राशी वडीलधाऱ्यांकडून आज तुम्हाला आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे तुमची सकारात्मकता वाढेल. तुमचा आदर वाढेल. आज तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. प्रतिकूल परिस्थिती आल्यास घाबरू नका; जर तुम्ही उपाय शोधण्याचा प्रयत्न केला तर सर्व काही ठीक होईल. वृषभ राशी कामाता चुका होऊ शकतात, मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. आज तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या कामात सुधारणा करण्यावर द्या. मनोरंजन आणि ऑनलाइन शॉपिंग सारख्या गोष्टींमध्ये तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल. मिथुन राशी आज, तुमच्या सभोवतालच्या लोकांशी चांगलंवागा, नम्रतेने बोला. जुनी कामं पटापच उरकून टाका, टाळाटाळ नको. तुमच्या दैनंदिन रूटीमनध्ये बदल मिळविण्यासाठी, एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची…
जळगाव : प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानिया पार्क परिसरातून एका गॅरेज मेकॅनिकला अटक करून चार दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास उकलला आहे. आरोपी माजिदअली लियाकतअली (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) याला शनिवारी, ६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, माजिदअली हा गॅरेज मेकॅनिक असून, मोटारसायकल दुरुस्तीचे ज्ञानाचा गैरवापर करून गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी करत होता. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी पथकासह सापळा रचून आरोपीला पकडले. चौकशीत त्याने जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यात ४ एप्रिल रोजी धुळे सायकल मार्टजवळून (मुद्देमाल: MH 19…
मुंबई : प्रतिनिधी उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाल्याने त्यांचा एकमेव उद्योग म्हणजे टोमणे मारणे आणि टीका करणे असा घणाघाती आरोप शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. महायुतीमध्ये काय सुरू आहे, याच्याशी तुम्हाला काय देणे-घेणे? तुम्ही तुमचे पाहा, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. शिरसाट म्हणाले, “तुमचे स्वतःचे अस्तित्व काय आहे, हे आधी पहा. स्वतःच पक्ष सोडून आता इतरांच्या पक्षात नाक खूपसण्याचे कारण काय?” आम्ही कसे काम करतो हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. आमच्या पद्धतीवर टीका करून काहीही फरक पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली भेटीवरूनही शिरसाट यांनी टीकास्त्र सोडले. “दिल्लीला जाऊन…
जळगाव : प्रतिनिधी जलजीवन मिशनच्या कामाचे बिल अदा केले जात नसल्याच्या कारणावरून संतापलेल्या एका ठेकेदाराने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कामकाज थांबवून दालनाच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही काळ कोंडून ठेवले. हा धक्कादायक प्रकार ५ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेत घडला. या प्रकरणी ठेकेदार नीलेश रमेश पाटील (रा. दादावाडी) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील अनेक ठेकेदारांच्या बिले रखडली आहेत. अलीकडे काही प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यानंतर सर्व ठेकेदारांना अंशतः रक्कम देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला. ठेकेदार नीलेश पाटील याचे बिलही प्रलंबित असल्याने…
धरणगांव : प्रतिनिधी गुह रक्षक दलातर्फे ७९ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने गावातून सवाद्य पथसंचलन करण्यात आले शहरातील सुरक्षा व शांती प्रस्थापित करण्यासाठी गृहरक्षक दल आपले करत असलेले कार्याची जनतेला ओळख करून देण्यात आली दि 6 डिसेंबर 1946 साली गुह रक्षक दल अर्थात् होमगार्ड संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. त्या निमित्ताने होमगार्डस् जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक जळगांव श्री अशोक नखाते यांचे आदेशान्वये तसेच प्रशासकीय अधिकारी श्री रामनाथ काळे केंद्र प्रमुख श्री गंगाधर महाजन सामग्री प्रबंधक सुभेदार श्री मदन रावते यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका समादेशक होमगार्ड अधिकारी श्री ईश्वर सखाराम महाजन यांच्या नेतृत्वात धरणगांव होमगार्ड…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर पोलिसांच्या दामिनी पथकाने शाळा, कॉलेज सोडून शहराबाहेर निर्जनस्थळी प्रेमचाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांवर धडक कारवाई केली. तर मुलांच्या पालकांना बोलावून त्याना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुली तसेच तरुणी पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळा, महाविद्यालयातील अल्पवयीन मुले, मुली अंबर्शी टेकडी, गलवाडे रस्ता, साने गुरुजी स्मारक, डुबकी मारोती, शहराबाहेरील मंदिरे, शिवाजी बगीचा आदी ठिकाणी तसेच काही निर्जन स्थळी शाळा, महाविद्यालय सोडून प्रेमचाळे करत असल्याची तक्रार केली जात होती. तर पो.नि. दत्तात्रय निकम यांनी याची गांभीर्याने दखल घेत दामिनी पथकाला सक्रिय केले. पो.नि. निकम यांनी मोनिका पाटील, नम्रता जरे, श्यामल पारधी, मिलींद सोनार, गजेंद्र…
गोवा : वृत्तसंस्था देशातील गोवा राज्यातून एक भीषण आगीची घटना घडली आहे उत्तर गोव्यातील अर्पोरा गावात एका नाईटक्लबमध्ये आग लागली आणि काही मिनिटांतच संपूर्ण इमारतीला वेढले. या घटनेत किमान २५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री घडलेल्या या दुःखद घटनेचा एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आग कशी वेगाने पसरली हे व्हिडिओमध्ये दाखवले आहे, ज्यामुळे क्लब धुराने आणि ज्वाळांनी भरला. दूरवर सायरनचे आवाज ऐकू येतात. गोव्याचे डीजीपी आलोक कुमार यांनी याविषयी माहिती दिली. त्यानुसार,”प्राथमिक तपासात गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचे दिसून येते.” असे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, “ही घटना रात्री १२:०४ वाजता घडली. पोलिस, अग्निशमन दल आणि…
मेष राशी आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांशी समन्वय ठेवा. व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळेल. वृषभ राशी काही कारणास्तव तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजना बनवाल आणि या योजना यशस्वी होतील. मिथुन राशी तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीची भेट होऊ शकते जी तुम्हाला मौल्यवान मदत करेल. तुमच्या व्यवसायात नफा होईल. कौटुंबिक कार्यक्रमात पैसे खर्च होऊ शकतात. कर्क राशी तुम्ही तुमच्या कामाकडे धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहाल. सहकाऱ्यांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. कौटुंबिक खर्च…
मुंबई : वृत्तसंस्था भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांनी मुंबईतील दादर मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी असे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला सत्ताधारी व विरोधकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सरकार या प्रकरणी कोणता निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्ताने दादरच्या चैत्यभूमीवर मोठा जनसागर उसळला आहे. अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांनी आज चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दादर मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी असे नाव देण्याची मागणी केली. विशेष म्हणजे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारीच या प्रकरणी निदर्शने केली होती. नरेंद्र जाधव…

