मुंबई : वृत्तसंस्था दोन दिवसांपूर्वी, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणी संपवू शकत नाही. असा इशारा त्यांनी दिला. तसेच, नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना , मी बेरोजगार आहे.मी तुम्हाला काय रोजगार देऊ? असा उलट सवाल उपस्थित केला होता. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चेला उत आला आहे दरम्यान, राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. पंकजा मुंडे या भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील असं मिटकरींनी म्हटलं आहे. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन बीडच्या अंबाजोगाई येथे करण्यात…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था अंधेरी येथून अपहरण केलेल्या 15 वर्षांच्या शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिच्यावर चाकूने 48 वार केल्याचे समोर आले आहे. वसई स्टेशन परिसरातील रेल्वे पुलाखाली या मुलीचा मृतदेह बॅगेत आढळून आला आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या प्रियकरासह एका आरोपीला गुजरातमधून ताब्यात घेत त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? मृत मुलीचा प्रियकर संतोष मकवाना (वय 21) आणि विशाल अंभवणे (वय 21) या दोघांनी तिच्यावर अत्याचार करत तिची निर्घृण हत्या केली. यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून एका बॅगमध्ये ठेवला. हा मृतदेह घेऊन रेल्वेने जवळपास 10 स्थानके त्यांनी ओलांडली. यानंतर मृतदेह नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात फेकून दिला. नायगाव रेल्वे…
फैजपूर : प्रतिनिधी तालुक्यातील वडील आणि मुलगा बँकेतून पैसे काढून घरी जात असतांना एका दुचाकीवर असलेले दोन अनोळखी इसमानी हातातून पिशवी घेत पसार झाले. याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील केळी वेफर्स बनविणारे मुलगा व वडील फैजपूर येथील स्टेट बँकेच्या शाखेत दि २८ रोजी दुपारी १ लाख रुपये काढून घरी जात असताना पीपरूड शिवारातील आकाश लक्ष हॉटेल जवळ त्यांची दुचाकी बंद पडली ते याठिकाणी रस्त्याच्या बाजूला उभे असताना एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर २ अनोळखी इसम २५ ते ३५ वयोगटातील याठ्कानी येत त्यांच्या हातातील पिशवी हिस्कावीत फैजपूरच्या दिशेने पळून गेले. यावेळी सुधाकर गोडू पाटील…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील गलंगी येथे एका २८ वर्षीय तरुणाला दोन अनोळखी इसमानी दगड मारून त्याची दुचाकी पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील गलंगी येथील फोरेस्ट चौकीजवळ गणपूर रोडच्या उतारावर एका २८ वर्षीय तरुणाला दोन अनोळखी इसमानी दि २७ रोजी रात्रीच्या सुमारास त्या तरुणाला दगड मारून त्याच्या मालकीची असलेली दुचाकी क्र.एम.एच.१८.बि.एफ.२७४४ हि त्याच्या ताब्यातून घेवून बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडल्याने तरुणाने दि २८ रोजी सकाळी चोपडा ग्रामीण पोलिसात धाव घेत राकेश लोटन श्रीराव(वय २८) ता.शिरपूर, जि.धुळे याच्या फिर्यादी वरून २ अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला…
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आज दि २९ रोजी जळगाव मनपाच्या आवारात पदाधिकाऱ्यानी ठिय्या आंदोलन देत घोषणाबाजी सुरु असताना आयुक्त गायकवाड हे याठिकाणी आले असता ते कार्यालयात जात असताना कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदनासाठी पुढे आले असता आयुक्त गायकवाड यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले नसल्याने कार्यकर्त्यांनी आयुक्त हटावच्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला होता. काय होते निवेदन गेल्या चार वर्षांपासून जळगाव शहरातील रहिवाश्यांना जळगाव शहर मनपा प्रशासन व लोकप्रतिनीधी रस्ते, गटारी, स्वच्छता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा इ. नागरी सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असून शहरातील सर्वच प्रमुख रस्ते व प्रभागातील, कॉलन्यांमधील रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली असून अमृत योजना व भुयारी गटारी खेदकामाने सर्वच भागातील रस्त्यांना…
जालना : वृत्तसंस्था पत्नी चारचौघात अपमानास्पद बोलली म्हणून संतापाच्या भरात पित्याने दीड वर्षाच्या मुलीचा शेततळ्यात फेकून खून केल्याची घटना तालुक्यातील निधोना शिवारात बुधवारी घडली. जगन्नाथ डकले असे पित्याचे नाव आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर सोशल मिडियावरील अफवांचा आधार घेत मुलीचे अपहरण झाल्याचा बनाव या पित्याने केला होता. निधोना शिवारातील शिवाजी पवार यांच्या शेतामध्ये तीन महिन्यांपासून सिल्लोड तालुक्यातील गव्हाण येथील जगन्नाथ डकले सालगडी म्हणून कामाला आहे. पत्नी प्रियंका, पाच वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षाच्या श्रावणीसह तो शेतात वास्तव्याला आहे. दरम्यान, बुधवारी (ता.२८) सकाळी डकले कुटुंबीय शेतात काम होते. तेव्हा दीड वर्षाची मुलगी श्रावणी ही झोपल्याने तिला वडील जगन्नाथ याने सकाळी दहा…
पालघर : वृत्तसंस्था बोईसर टीमा हॉस्पीटलजवळ तरुणाने केलेल्या गोळीबारात तरुणीचा मृत्यू झाला आहे. हत्येनंतर वाहनासमोर उडी मारून तरुणानेही आत्महत्या केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. नेहा दिनेश महतो असे मृत तरुणीचे नाव आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी तरुण कृष्णा यादवने सीआयएसएफच्या वाहनाखाली उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बोईसर टीमा हॉस्पीटलजवळ काल दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास कृष्णा यादव (रा. कोलवडे) या माथेफिरू तरुणाने स्नेहा मेहतो (रा. सरावली) या तरुणीची पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडत हत्या केली. यानंतर तिथून पळून…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील तहसिल कार्यालय येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हे ब्रीद असलेला सेवा पंधरवाडा साजरा करण्यात आला या अंतर्गत 20 उत्पन्न दाखले,15 जात प्रमाणपत्र, व 10 नागरिकांना रेशन कार्ड वितरित करण्यात आले.सदर पंधरवाडा 2ऑक्टोबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.तसेच माहिती अधिकार दिन अंतर्गत सर्व कार्यालयीन कर्मचारी यांना तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी माहिती अधिक्कारबाबत माहिती देऊन सर्व नागरिकानी याबाबत दक्ष राहण्याचे आवाहन तहसीलदार देवरे यांनी केले. या कार्यक्रमास नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते व इतर सर्व कर्मचारी,सेतू चालक हजर होते. सर्व नागरिकांनी सेवा पंधरवाडा अंतर्गत आपले आवश्यक कागदपत्रे तहसिल कार्यालयात काढून घ्यावेत.विद्यार्थ्यांनी देखील या पंधरवाड्याचा लाभ घायवा.असे आवाहन यावेळी करण्यात आले.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील रामदास कॉलनीतील विवाहितेचा ठाणे येथील सासरच्या मंडळींनी छळ केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील रामदास कॉलनीतील माहेर असलेल्या ३४ वर्षीय विवाहितेचा सासरच्या मंडळींनी विवाहितेच्या नणंदेसाठी शिक्षणासाठी पैसे आणावे अशी मागणी पती प्रतिक सुभाष पाटील, सासू आशा सुभाष पाटील, सासरे सुभाष गणपत पाटील, नणंद प्रतीक्षा सुभाष पाटील रा.मानसरोवर ठाणे यांच्याविरोधात विवाहिता प्रियका प्रतिक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रशांत पाठक हे करीत आहेत.
मुंबई : वृत्तसंस्था लतादीदी गेल्यापासून मी त्यांच्याबद्दल फारसं कुठेच बोललो नाही. सार्वजनिक व्यासपीठावर तर नाहीच नाही. दीदींच्या निधनानंतर एक रितेपण जाणवायला लागलं आणि ह्या रितेपणाच्या तीव्रतेचा अंदाज येण्यातच मधले काही महिने निघून गेले. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी लता दीदींना एक भावनिक पत्र लिहित त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आपल्या पत्रात राज यांनी म्हटले आहे, लतादीदींची आज जयंती. आपल्याला वाढदिवसाच्या मिळणाऱ्या शुभेच्छांचा आनंद असतोच, पण आपल्याला एखाद्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात पण विशेष आनंद असतो, त्या व्यक्तींमध्ये दीदी होत्या. त्यांना थेट शुभेच्छा देण्याचा आनंद मला दोन दशकांहून अधिक काळ मिळाला, हे माझ भाग्यच. पुढे राज लिहितात, दीदीबद्दल काही लिहायचं ठरवलं तर, त्यांच्या…

