जळगाव : प्रतिनिधी दि १ रोजी शनिवार रोजी नवरात्री उत्सवानिमीत्त नवीन विचारांचा जागर करण्याच्या दृष्टीने नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅड नॅपकिन चे वाटप राज माध्यमिक विद्यालय मेहरुण येथे करण्यात आले. याप्रसंगी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ सारिका पाटील ह्यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळी या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी त्या काळात घ्यावयाची काळजी तसेच वापरावयाची साधने तसेच आरोग्य या विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी महापौर जयश्रीताई महाजन या उपस्थित होत्या. यावेळी प्रत्येक किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. याप्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था पदाधिकारी अध्यक्ष सौ मनिषा पाटील, श्रीमती ज्योती राणे, किमया पाटील, सौ माधुरी शिंपी, सौ…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी येथील प्राचीन परंपरा असलेल्या बालाजी वहनोत्सवात रविवारी (ता २) राजहंसाचे वहन निघाले. त्यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी काही वेळ वहनाची गाडी चालवून गाडी वाहनाची भूमिका निभावली. धरणगावात निघालेल्या वहनोत्सवात आजच्या वाहनाचे जोडीचे मालक सत्यवान जगन्नाथ कंखरे व श्दिनेश जगन्नाथ कंखरे यांच्या तर्फे वाहन उत्सवात सहभाग घेणाऱ्या प्रत्येक लेझीम पथकास १ हजार १११/- रूपये बक्षिस श्री देवकर व शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी सुरेश सीताराम चौधरी. जीवन आप्पा बयस, माझी उपनगराध्यक्ष गोविंदा प्रकाश कंखरे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन यादवराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणगाव तालुका कार्याध्यक्ष…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील भादली-कानसवाडा रस्त्यावरील पाटचारीवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. घटनास्थळावरील मृतदेहाची अवस्था लक्षात घेता घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली शिवारातील भादली कानसवाडा रस्त्यावर असलेल्या पाटचारीवर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती सोमवारी ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता भादली येथील पोलीस पाटील राधीका ढाके यांनी नशिराबाद पोलीसांनी माहिती दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी घेतली आहे. अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून चौकशीला सुरूवात केली आहे. मयत व्यक्ती जळगावातील दशरथ नगरातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मुंबई : वृत्तसंस्था साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी मंदिरात प्राण्यांच्या बळी देण्यास परवानगी देऊ अशी माहिती महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाला दिली. यामुळे 2017 च्या राज्य सरकारच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. सप्तश्रृंगी मंदिर परिसरात पशुबळी देण्यावर राज्य सरकारने 2107 मध्ये बंदी लादली होती. राज्य सरकारच्या या आदेशाला आदिवासी विकास संस्थेने 2019मध्ये आव्हान दिले होते. न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला आणि आरएन लड्ढा यांच्या खंडपीठाने ही याचिका निकाली काढली. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, मंदिर ट्रस्ट तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी केलेली व्यवस्था पाहता याचिकेचा उद्देश टिकत नाही असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. 2016 मध्ये…
सावदा : प्रतिनीधी शहरातील काजीपुरा भागातील सार्वजनिक शौचालयाजवळ नाल्यावर तडवी वाड्यातील दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटाकडून लोखंडी रॉड, लाकडी बॅट, लाठ्याकाठ्या, दगडविटांनी हल्ला करून जखमी केले. याप्रकरणी अमीर रमजान तडवी याच्या फिर्यादीवरून सुलतान तडवी, अमीन तडवी, शाहरुख तडवी, राजू तडवी, नबाव तडवी, समीर तडवी, रहेमान तडवी, जमीर तडवी, शेखर तडवी, अरबाज तडवी, मोईन तडवी, आसिफ तडवी, जुबेर तडवी आदींसह २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, तर नवाब उस्मान तडवी याच्या फिर्यादीवरून मुराद तडवी, जावेद तडवी, नवाज तडवी, सलीम तडवी, रमजान तडवी, नवाज तडवी, अमीन तडवी, सलमान तडवी, आदिल तडवी आदींसह २२ ते २५ जणाविरुद्ध गुन्हा दाखल…
धुळे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामध्ये शिवसेनेची कोंडी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना त्यांच्या गटात आणत आहेत. त्यामुळे आता शिवसेनेला नेहमीच खिंडार पडत आहे, तर नुकेतच मंत्री गुलाबराव पाटील यांनीही सांगितले की, लवकरच उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील शिंदे गटात सामील होणार असल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. स्व.बाळासाहेब ठाकरेंचे सेवक चम्पासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला. हा शिवसेनेसाठी धक्काच होता. मात्र आता अजून एक मोठा धक्का म्हणजे गुलाबराव पाटील यांनी केलेले वक्तव्य ते म्हणजे उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील शिंदे गटात सामील होणार.…
धरणगाव : प्रतिनधी येथील साने पटांगणावर शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ याचा अध्यक्षतेखाली शिवसैनिक याची बैठक संपन्न झाली यांत दिनांक ५ रोजी होणारा दसरा मेळावा संदर्भात चर्चा झाली यावेळी धरणगाव शहरतील हजारो शिवसैनिक मेळाव्यास येणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना पदाधिकारी यांनी वाघ यांना सांगितले त्या संदर्भात नियोजन करण्यात आले. यावेळी धरणगाव शहरतील उद्योगपती व माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, फिरोज पटेल अँड शरद माळी धिरेंद्र पुरभे बापू महाजन नगरसेवक भागवत चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले तसेच माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी यांनी सांम दाम दंड आपण पक्ष वाढीसाठी लावू परंतु गद्दारी चा शिक्का लावणार नाही असे मत व्यक्त केले. गुलाबराव वाघ…
धरणगाव : प्रतिनिधी पंचायत राज्यव्यवस्थेत ग्रामपंचायतीला महत्वपूर्ण स्थान आहे. ग्रामीण जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधणारी ‘लोकशाही संस्था’ असे तिचे स्वरुप असल्याने तिला पंचायतराज संस्थेचा पायाभूत घटक मानले जाते. ग्रामपातळीवर विकास कामांचा विचार करता ग्रामपंचायतीच्या विकास कामांना मूर्त रूप देण्यासाठी ग्रामपंचायतीची भूमिका मोलाची असून ग्रामपंचायत ही विकासाच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा दुवा असतो. या ठिकाणी येणाऱ्या जनतेला न्याय देण्याची भूमिका सरपंच, सदस्यांनी ठेवून अधिक विकासात्मक कामे करावी असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पोखरी तांडा येथील उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण, नव्याने अंगणवाडी, ग्रामपंचायत समोरील चौक येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे व सुशोभीकरण करणे आदी कामांना मंजुरी देऊन गावासाठी स्वतंत्र…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील अयोध्यानगर येथे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने सुसाईड नोट लिहून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी समोर आली आहे. भागवत शामराव जाधव वय ४८ रा. गणपती मंदिराजवळ, अयोध्यानगर असे मयताचे नाव आहे. घरांत सर्वांना कळेल म्हणून भागवत जाधव यांनी बाहेर जावून सुसाईड नोट लिहली. त्यानंतर घरी आले कुणाला कळू दिले नाही, की त्याच्या मनात काय सुरु आहे म्हणून मुलाचा मुका घेतला, त्याला खर्चासाठी पैसेही दिले. तो बाहेर गेल्यानंतर भागवत जाधव यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सुसाईडनोटमध्ये ज्या तिघांनी फसवणूक केल्याचा उल्लेख आहे, त्याच तिघांच्या दबावाला कंटाळून भागवत जाधव यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मयत भागवत…
जळगाव : प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद गटांसाठीचे आरक्षण आज सकाळी जाहीर करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या केव्हा होणार याबात संभ्रमाचे वातावरण आहे. कारण प्रभाग रचनांवरून सुप्रीम कोर्टात याचिका प्रलंबीत असून यासोबत ओबीसी आरक्षणाचा तिढा देखील सुटलेला नाही. यामुळे निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. निवडणुकांबाबत संभ्रम असला तरी निवडणूक आयोगाने निवडणुकांची जय्यत तयारी केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. याबाबत राजपत्रात देखील अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यामधील ३४ नगरपालिकांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर केले असून यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण गटासाठी खुले निघाले आहे.…

