Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पत्नीला करायला लावली सर्वांसमक्ष अंघोळ ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !
    क्राईम

    पत्नीला करायला लावली सर्वांसमक्ष अंघोळ ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

    editor deskBy editor deskAugust 22, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    व्यवसायात भरभराट व्हावी, घरात सुख शांती नांदण्यासोबत पुत्रप्राप्ती व्हावी, यासाठी पत्नीला सगळ्यांसमोर अंघोळ करण्यास पतीनेच भाग पाडल्याची संतापजनक घटना पुण्यातून समोर आली आहे.

    पुणे जिल्ह्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. एका बिझनेसमनने व्यवसायात भरभराट व्हावी, घरात सुख शांती नांदावी, यासाठी मांत्रिकाची मदत घेतली. इतकंच काय तर पुत्रप्राप्तीसाठीही त्याने मांत्रिकाची मदत घेत त्याला अघोरी पूजा करण्यास सांगितलं होतं. मांत्रिकांच ऐकून या बिझनेसमनने आपल्या पत्नीलाही पुजेत सामील करुन घेतलं.संतापजनक बाब म्हणजे यावेळी पूजेच्या नावाने या पतीने सर्वांच्या देखत आपल्या पत्नीला अंघोळ करण्यास भाग पाडलं. या संतापजनक प्रकाराची पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानंतर अखेर भारती पोलिसांनी आरोपी पतीसह पीडित महिलेच्या सासू सासऱ्यांसह मांत्रिकावरही गुन्हा दाखल करुन घेतला आहे. भारती विद्यापीठ पोलीस सध्या या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

    तक्रारदार महिलेनं केलेल्या आरोपात खळबळजनक आरोप केला आहे. आपल्यावर भानामती असून ती नाहीतशी व्हावी यासाठी मला सर्वांसमोर अंघोळ करण्यास लावली, असं पीडितेनं तक्रारीत म्हटलंय. तसंच माझ्याकडून एक ते दोन कोटी रुपये घेतल्याचाही आरोप केला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून संशयित आरोपींची चौकशी करुन पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंचा आघाडीचा एकमुखी पाठिंबा; सुप्रिया सुळे यांच्या ट्विटने राजकारणात नवा रंग !

    April 23, 2026

    सप्तशृंगी गडावर चांदी अपहार प्रकरण : २२ किलोहून अधिक चांदी गायब !

    April 23, 2026

    ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी !

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.