रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका २५ वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींनी ५० हजाराची मागणी केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील बलवाडी येथील रहिवासी असलेली विवाहिता दुर्गा दिलीप तायडे(वय २५) हिस माहेरून ५० हजार रुपये आणावे या कारानावारुन्न दि १ नोव्हेबर २०१९ ते १ सप्टेबर २०२२ या कालावधीत विवाहितेस शारीरिक व मानसिक छळ तसेच मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संशयित आरोपी दिलीप रमेश तायडे, सासू- निर्मला रमेश तायडे , सासरे-रमेश तायडे, पुतण्या – करन दीपा तायडे, चुलत सासू – अनिताबाई राजेश तायडे, सर्व रा.बलवाडी ता.रावेर यांच्या विरोधात निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल…
Author: editor desk
चोपडा : प्रतिनिधी प्रेमसंबंध ठेवले नाहीत, म्हणून अल्पवयीन तरुणीस जीवेठार मारण्यासह फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध चोपडा पोलिसात विनयभंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आहे. सागर दगडू पाटील (रा.चोपडा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पिडीत मुलीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिडीता अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखील सागर पाटील याने वेळोवेळी पाठलाग करुन तसेच पिडीत मुलीचा मोबाईल क्रमांकवर वेळोवेळी संपर्क साधायचा. पिडीत मुलीची ईच्छा नसतांना देखील सागर याने बळजबरीने प्रेमसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले. परंतू त्यानंतर होणाऱ्या त्रासाला कंटाळून पिडीत तरुणीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. याचा राग आल्याने सागर याने दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळी ११…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील गोलाणी मार्कट परिसरातून एका खाजगी नोकरी करणाऱ्या युवकाची दुचाकी चोरी झाल्याची तक्रार दि २७ रोजी जळगाव शहर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील गोलाणी मार्कट परिसरातील मनपाच्या मागील बाजूस असलेले अग्निशमन दलाच्या कार्यालाजवळ लावलेली क्र.एम.एच.१९ सी.एम.५८८९ दुचाकी पर्कीगच्या जागेवर लावलेली असताना कुणीतरी स्वताच्या फायद्यासाठी लांबविल्याची घटना दि २६ रोजी घडली असून अजय प्रदीप चांदेलकर यांनी शहर पोलिसात धाव घेत दुचाकी चोरीबाबत तक्रार दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना राजकुमार चव्हाण हे करीत आहेत.
उन्नाव : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये अंधश्रद्धेतून एका तरुण साधू ने त्याच्या जीवावर बेतणारा प्रकार केला. मोक्ष मिळवण्यासाठी 22 वर्षांच्या साधूने मंदिरातील चार पुजाऱ्यांच्या मदतीने स्वतःला जमिनीत गाडून घेतले होते. हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जिवंत समाधी घेऊ पाहणाऱ्या साधूला जमिनीतून बाहेर काढले. त्यामुळे त्या साधूचे प्राण वाचले. मंदिराच्या परिसरात हा प्रकार केल्याचे उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. साधू वेशधारी तरुणाने मोक्ष मिळवण्याचा निर्धार केला. यासाठी त्याने समाधी घेण्याचे ठरवले व मंदिरातील चार पुजारींची मदत मिळवली. साधूसाठी मंदिराच्या परिसरातच खोल खड्डा खोदण्यात आला होता. त्यात साधू गेल्यानंतर वरुन माती टाकून खड्डा बुजविण्यात आला होता. वास्तविक…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना मुंबईत शिवसेना आणि शिंदे गटाचे पदाधिकारी दसरा मेळाव्यात व्यग्र आहेत. शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच दसरा मेळावा होणार असल्याने शिवसैनिक हा मेळावा जय्यत करून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक शहरातून शिवाजी पार्कच्या दिशेने शिवसैनिक पायी निघाले आहेत. तर खरी शिवसेना आमचीच, असा दावा करणाऱ्या शिंदे गटानेही दसरा मेळावा घेऊन आपली ताकद दाखवण्याची तयारी केली आहे. यासाठी शिंदे गटाने साडेचार हजार बसेस बुक केल्याचे सांगितले जात असून या गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. दोन्ही मैदानांची क्षमता एक लाख लोकांची आहे. दोन्ही मैदानांची एक लाख लोकांची क्षमता…
नंदुरबार : वृत्तसंस्था आलापल्ली-आष्टी मार्गावरील शांतिग्राम गावाजवळ सूरजागडवरून लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. बिजोली सुभाष जयदार (45 रा. कांचनपूर) असे मृत महिलेचे नाव असून अपघातात पती सुभाष जयदार थोडक्यात बचावले. या घटनेनंतर संतप्त जमावाने 10 पेक्षा अधिक ट्रकला आग लावून पेटवून दिल्याने रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते. सूरजागड लोहखाणीतून कच्चा माल वाहून नेणाऱ्या शेकडो अवजड वाहनांमुळे आलापल्ली-चंद्रपूर मार्ग खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास सुभाष जयदार पत्नी बिजोलीसह आपल्या दुचाकीने कांचनपूरला जाण्यासाठी निघाले होते. शांतीग्राम जवळ मागून येणाऱ्या भरधाव…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील वेगवेगळ्या सहकारी सोसायट्यांसह बँका, साखर कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांवर स्थगिती आणण्यात आली होती. सहकारी संस्था निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. 30 सप्टेंबरपर्यत निवडणुका घेऊ नये, असा स्थगिती आदेशही जारी करण्यात आला होता. दरम्यान, या अनुषंगाने राज्य सरकारच्या वतीने बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बुधवारी राज्य सरकारने स्थगिती आदेश मागे घेत असल्याचं पत्र औरंगाबाद खंडपीठात सादर केलं. त्याला खंडपीठानेही मान्यता दिली आहे. त्यामुळे अखेर आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय. राज्यातील सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागांच्या मुख्य सचिवांनी 15 जुलै 2022 रोजी एक पत्र जारी केलं होतं. या पत्रानुसार 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया…
धरणगाव : प्रतिनिधी पावसामुळे कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने व जास्त पावसामुळे बोंडावर कोंब आल्याने शेतकरी खुपच अडचणीत सापडला आहे परंतु संघटीत नसल्याने शासन, प्रशासन त्याच्याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत त्यामुळे शेतकरी गावा-गावात संघटीत झाला पाहिजे आणि महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे हेच काम आहे असे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी प्रतिपादन केले ते अहिरे खुर्दे येथे शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदराव पाटील यांनी केले. याप्रसंगी महाराष्ट्र शेतकरी संघटनेची अहिरे खुर्दे गावात शाखा स्थापन करण्यात आली. शाखेचे शाखाध्यक्ष म्हणून गिरीष गोकुळ चव्हाण,कार्याध्यक्ष म्हणून वाल्मिक सुधाकर पाटील, उपाध्यक्ष म्हणून प्रदिप एकनाथ चव्हाण,सचिव म्हणून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या विविध तपास यंत्रणांनी देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर छापे मारले होते. पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात पीएफआय ही संघटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत होती. या संघटनेवर आता केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातला अध्यादेशही जारी केला असून तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. २२ सप्टेंबर रोजी एनआयए तसंच ईडी अशा काही तपास यंत्रणांनी संयुक्तपणे पीएफआयवर कारवाई केली होती. या संघटनेशी संबंधित १०६ लोकांना या पहिल्या फेरीमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या गोष्टींच्या आधारे दुसऱ्या फेरीत जवळपास २४७ लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर आता या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कामकाजाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. यामुळं शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यास निवडणूक आयोग आता मोकळं झालं आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा झटका मानला जात आहे. सुप्रीम कोर्टात आज सकाळपासून शिवसेनेबाबतच्या विविध याचिकांवर पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत शेवटी कोर्टानं निवडणूक आयोगाच्या कामकाजात ढवळाढवळ करणार नसल्याचं म्हटलं आहे. कोर्टाच्या या निकालाबाबत अॅड. सिद्धार्थ शिंदे म्हणाले, “सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाच्या कामकाजात ढवळाढवळ करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. त्यामुळं हा शिंदे गटासाठी मोठा दिलासा असून उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेसाठी झटका आहे. त्यामुळं आता उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगासमोर…

