जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील मजूर संस्थांना सर्व विभागांकडून ३३ टक्के कामे मिळावीत, अन्यथा मजूर फेडरेशनतर्फे संबंधित विभागांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हा बँकेचे चेअरमन तथा मजूर फेडरेशनच्या सभेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी दिला. त्यासोबतच त्यांनी मजूर फेडरेशनच्या वर्षभरातील कामकाजाचे कौतुक केले. जिल्हा मजूर फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आज (ता. ३०) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत मार्गदर्शन करताना श्री देवकर म्हणाले, की राज्यभरातील बऱ्याच मजूर फेडरेशनची स्थिती राजकीय हस्तक्षेपामुळे व कामे वाटपातील दुजाभावामुळे खराब झालेली आहे. मात्र जळगाव जिल्हा मजूर फेडरेशनच्या कामकाजात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याने फेडरेशन निरंतर प्रगतीपथावर आहे. फेडरेशनकडून सर्व संस्थांना सर्वसमावेशक पद्धतीने कामे वाटप केले…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा परिसरात दर बुधवारी आठवडे बाजरा भरतो. या बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या महिलेची ५० हजार रुपयांची मंगलपोत चेारट्यांनी तोडून नेली आहे. रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव शहरातील भिकमचंद जैन नगरा जवळील वाघोदे नगरातील कल्पना संजय पाटील (वय- ३०) या बुधवारी भाजीपाला खरेदी करण्यााठी पिंप्राळ्यात भरणार्या आठवडे बाजारात आल्या होत्या. बाजार करत असतांना सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किंमतीची मंगलबोत अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. प्रकार समोर आल्यानंतर कल्पना पाटील यांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास…
जळगाव : प्रतिनिधी नुकतेच दोन ते तीन दिवसापासून आ.बच्चू कडू यांचा सोशल मिडीयावर व्हीडीओ व्हायरल करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज जळगाव उपजिल्हाधिकारी भारदे यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्ष युवा आघाडी जळगाव शहरातर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अचलपूर मतदार संघातील गणोजा ता. चांदूरबाजार जि. अमरावती येथील घटनेविषयी आ.बच्चू कडू यांच्या संदर्भात खोटे व बनावट(मिक्सिंग) केलेला व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. आ.बच्चू कडू हे कुठल्याही प्रकारचे राजकीय पार्श्वभूमी नसतांना अपक्ष म्हणून चौथ्यांदा निवडून आलेले आहेत.त्याबाबत लोकशाहीच्या माध्यमातून जनताहिच राजा व मतदार असते. त्या बळावर बच्चू कडू हे सातत्याने निवडून येत आहेत. त्याच्या जो व्हिडीओ व्हायरल…
जळगाव : प्रतिनिधी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे भुलाबाई महोत्सव व नवरात्रीनिमित्त रास गरबा (दांडिया)चे विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे भुलाबाई महोत्सव व नवरात्री निमित्त रास गरबा (दांडिया)चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मुलांसोबत त्यांच्या पालकांनीही सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षक तथा संस्थेचे सचिव मुकेश नाईक यांनी केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दांडिया खेळून कार्यक्रमात चैतन्य आणले. दांडिया खेळाची माहिती यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली. मुख्याध्यापिका शितल कोळी, स्वाती नाईक, उज्वला नन्नवरे, साधना शिरसाट, रुपाली आव्हाड, नयना अडकमोल, साक्षी जोगी, दिव्या पाटील, आम्रपाली शिरसाट,…
जळगाव : प्रतिनिधी तुम्ही बातमीचे शीर्षक वाचून थक्क झाला असाल पण हो नुकतेच एका ठिकाणी ना.पाटील म्हणाले की, बिग बॉसमध्ये बोलावले तर ही सोन्यासारखी संधी आहे, मिळाली तर निश्चितपणाने जाऊ, आता हे पाहणे उस्तुक्त्याचे राहणार आहे . नुकतंच महेश मांजरेकरांना असा प्रश्न करण्यात आला होता, की राजकारणातील कोणकोणते चेहरे बिग बॉस मराठीच्या खेळात तुम्हाला पाहायला आवडतील. त्यावर उत्तर देताना मांजरेकर यांनी गुलाबराव पाटील यांचंही नाव घेतलं होतं. त्यानंतर जळगावातील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी बिग बॉसमध्ये बोलावलं तर नक्की जाऊ. बिग बॉसमध्ये जाण ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. गुलाबराव पाटलाला बिग बॉसमध्ये जर कोणी बोलवत…
डोंबिवली : वृत्तसंस्था डोंबिवलीत एका सावत्र आईने साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंतिमादेवी संजय जैस्वाल असे या सावत्र आईचे नाव आहे. याप्रकरणी डोंबिवली टिळक नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सावत्र आई अंतिमादेवीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. जयस्वाल यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. डोंबिवली पुर्वेकडील पाथर्ली, गायकवाडवाडी येथील सिताबाई निवास येथे राहणाऱ्या संजय जयस्वाल यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. जयस्वाल यांना पहिल्या पत्नीपासून तीन मुले आहेत. पत्नीच्या निधनानंतर मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी अंतिमादेवी यांच्याशी दुसरा विवाह केला. अंतिमादेवीचे पहिले लग्न झाले होते. मात्र…
धरणगाव : प्रतिनिधी येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात दि.३०सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विद्यार्थिनीसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एम. पाटील हे होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.डी.वळवी, राष्ट्रिय सेवा योजना विभागाचे विभागीय समन्वयक डॉ. संजय शिंगाणे तसेच ग्रामीण रुग्णालय धरणगाव इथून डॉ. गिरीश चौधरी, डॉ.मयुर जैन, श्री. शिंपी,श्री.गणेश कुंभार व त्यांची सर्व टीम आरोग्य तपासणीसाठी उपस्थित होते.या शिबिरामध्ये कोविड लसीकरण, रक्ततपासणी, वजन व उंची यांची तपासणी, ॲनिमिया तपासणी, निदान व औषध उपचार करण्यात आले.या शिबिरासाठी महाविद्यालयातील दीडशे विद्यार्थिनी उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. अभिजितजोशी, सूत्रसंचालन डॉ. गौरव महाजन…
शिरूर : वृत्तसंस्था तालुक्यातील शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथे एका बापाने त्याची सात वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याबाबत पोलिसात तक्रार दिली होती. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुलीच्या सततच्या आजारपणातून आणि आर्थिक विवंचनेतून वडिलांनीच खून केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सख्या बापच असे कृत्य करू शकतो यावर कुणाचाही विश्वास बसू शकत नाही. बजरंगवाडी येथून अपेक्षा युवराज सोळुंके (७) ही मुलगी मंगळवारी रात्री बेपत्ता झाली होती. मुलीच्या वडिलांनी शिक्रापूर पोलिसात याप्रकरणी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. दरम्यान, सीसीटीव्ही तपासले असता मुलीच्या वडिलांनी मुलीला नदीच्या कडेला नेल्याची माहिती समोर…
पुणे : वृत्तसंस्था स्पर्धा परीक्षेचा अभ्यासकरुन आधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी पुणे म्हणजे ज्ञानाची पंढरीच म्हणावी लागेल. तर केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी परीक्षेचे उमेदवार दिल्लीला जातात तर महाराष्ट्र राज्य आयोग अर्थात एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी परीक्षेचे उमेद्वार पुणे निवडतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास दिल्ली किंवा पुण्यातूनच होतो असं काही नाही. पण तालीम ती तालीमचं. म्हणून पुण्यातली भरपूर तरुण मंडळी ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना दिसून येतात. एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या स्पर्धकांसंदर्भात एक भयानक घटना पुण्यात घडली आहे. अभ्यासासाठी अभ्यासिकेत गेलेल्या एका मुलीचा चक्क हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचं सांगितलं जातयं. सतत अभ्यासचा विचार करुन त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करण्याची वृत्ती ही स्पर्धा परीक्षेचा…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी आलेल्या ३१ वर्षीय विवाहितेचा पोलिस ठाण्याबाहेर विषप्राशनाने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि २८ रोजी दुपारी घडली. विषप्राशनानंतर तत्काळ महिलेला उपचारार्थ दवाखान्यात हलविण्यात आले; मात्र तिचा मृत्यू झालेला होता. माया ललित फिरके असे मृत विवाहितेचे नाव असून, तिच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसांसह तिच्या पतीवर आरोप केले आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, माया फिरके (वय ३१) आणि ललित फिरके असे दोघेही पती-पत्नी दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. नुकतेच पाच महिन्यांपूर्वी माया फिरके यांचा ललित यांच्याशी मंदिरात दुसरा विवाह झाला होता. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. बाजारपेठ पोलिसांत त्यांनी यापूर्वी तक्रारी दिल्यात. माया आज दुपारच्या…

