नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली असून ठिकठिकाणी आपल्याला आनंदोत्सव साजरा होताना दिसतोय. मात्र या उत्साहात तुमच्याकडून काही चुका होता कामा नये याचीही तुम्ही काळजी घ्यायला हवी. त्यासाठी ज्योतिष शास्त्रात काही महत्वाच्या गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. तुमच्या घरात जर चार महत्वाच्या गोष्टी असतील तर तुम्हाला भरपूर प्रमाणात धनलाभ होऊ शकतो. पीतळेचा हत्ती : वास्तु शास्त्रानुसार, तुमच्या घरात पितळेचा हत्ती असेल तर तुमच्या घरात सकारात्मकतेचा वास होतो. पितळेचा हत्ती फक्त नकारात्मकताच दूर करत नाही तर तुमच्यासाठी यशाचे दरवाजेही उघडे करतो. हत्तीची प्रतिमा : घराच्या लिविंग एरियामध्ये जर हत्तीची प्रतिमा असेल तर धनलाभ होतो. प्रतिमेसाठी मूर्तीमध्ये हत्तीची सोंड वरच्या बाजूला असावी. यामुळे घरात सुख…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशयावरून महाविकास आघाडीच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी बंद होणार अशी चर्चा होती. मात्र, शिवसेनेच्या पुढाकारानं मविआ सरकारनं सुरु केलेली शिवभोजन थाळी यापुढेही सुरु राहणार आहे. आज पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवभोजन थाळी सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही थाळी बंद होणार अशी चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही थाळी सुरू राहिल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत ही थाळी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीसांनी भुजबळांना दिलेला शब्द पाळल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शिवभोजन थाळीचा घेणार आढावा घेतील असा निर्णय…
जळगाव : प्रतिनिधी युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना जळगाव जिल्ह्यातर्फे जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने कुमार गट जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकूल येथे करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातून १५ मुलांचे तर मुलींचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १० वा. शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ व महापौर जयश्री महाजन, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी महापौर नितिन लढ्ढा, शिवसेना जिल्हा संघटक गजानन मालपूरे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर, कुलभूषण पाटील, विस्तारक चैतन्य बनसोडे,…
जळगाव : प्रतिनिधी कॉंग्रेसचे युवानेते चंदन पाटील यांनी आज अखेर ठरल्या प्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात आपल्या अनेक समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे. जी.एम. फाऊंडेशनच्या कार्यालयात आज दुपारी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत चंदन पाटील यांचा प्रवेश सोहळा झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ हे उपस्थित होते. तर आज चंदन पाटील यांच्यासोबत शहरासह ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोपाल पाटील, भवरखेडा येथील विकास सोसायटीचे संचालक निलेश पाटील, अमोल माळी, भागवत मराठे, ज्ञानेश्वर पाटील, सागर पाटील, भाऊसाहेब पाटील, भूषण पाटील, अशोक पाटील, रमण धनगर, परेश…
जळगाव :प्रतिनिधी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांनी आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर शिरसोली, वडली आणि पात्री येथे देवी भक्तांनी सप्तशृंगी गडावरून आणलेल्या ज्योतीचे दर्शन घेतले. यावेळी जिल्ह्यात सुख समृद्धी नांदू दे, बळीराजाला मुबलक धनधान्य पिकू दे, नागरिकांना चांगले आरोग्य लागू दे, असे साकडे यावेळी देवकर यांनी दुर्गा मातेला घातले. पाथरी येथे ज्योतीच्या दर्शनाप्रसंगी देवकर यांच्यासह दिलीप धनगर, राजेश कोलते, पाचोरा येथील प्रकाश पाटील व ग्रामस्थ निलेश पाटील, भीमराव पाटील, अरुण पाटील, संतोष नेटके, सुकलाल नावे, प्रताप पाटील, नाना हरी, मोहम्मद पठाण, डॉ अरुण पाटील, शांताराम पाटील, वसंत माळी, एकनाथ माळी, संभाजी पाटील, कैलास जाधव, मोठाभाऊ सोनवणे,…
जळगाव : प्रतिनिधी प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत जळगाव तालुक्यातील रिधुर येथील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पॉलिसीचे वितरण मा.ना.श्री. गुलाबरावजी पाटील (मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी पिक विम्याचे कवच घेणे अतिशय आवश्यक असून बदलत्या हवामानामुळे व उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपण आपल्या शेतात लागवड करीत असलेल्या पिकाचा विमा उतरवणे गरजेचे असून नुकसान झाल्यास निदान लागवड केलेल्या पिकाचा प्राथमिक खर्च मिळण्यास तरी मदत होईल असे प्रतिपादन मा.गुलाबरावजी पाटील यांनी केले. शासनाने “फसल बिमा पाठशालेचे” आयोजन केलेले असून त्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेबाबत जनजागृती व शेतकऱ्यांना आपल्या पिकाच्या काढलेल्या विमा पॉलिसी घरपोच देण्याचे नियोजन करण्यात…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील जुना खेडी भागातील सदाशिव नगरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड, असा एकूण ६७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सविस्तर वृत्त असे की, सेवानिवृत्त मुख्याध्यापक नारायण गरबड चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार १० ऑगस्ट ते २४ सप्टेंबरच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे मेन दरवाज्याचे कडी कोयंडा तोडला. तसेच त्यामागील लाकडी दरवाजाचे सेंटर लॉक तोडून घरात घुसले. यानंतर घरातील सोन्याचे ७ हजार २० रुपयांचे दागिने, रोख रुपये व घरातील इतर सामान एकुण ६७ हजार ५०० रुपयांचा किमंतीचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून स.फो. रघुनाथ महाजन…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील गलंगी येथील 45 वर्षीय महिलेचा डोक्यात लाकडी दांडा मारून सावत्र खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. सहाबाई मगन बारेला (45, गलंगी, ता.चोपडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर या खून प्रकरणी संशयीत आरोपी म्हणून पोलिसांनी सावत्र मुलगा दीपक मगन बारेला (25) याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक बारेला यांची सहाबाई बारेला ही सावत्र आई असून ती मुलाला वागणूक व्यवस्थित देत नसल्याने या प्रकाराला दीपक वैतागला होता. रविवारी रात्री दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला.यातूनच संतप्त मुलाने सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर…
औरंगाबाद : वृत्तसंस्था अनेक दिवसांपासून पालकमंत्र्यांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी सरकारला घेरण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. अखेर शनिवारी संध्याकाळी शिंदे-फडणवीस सरकारने पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये शिंदे गटातील संदिपान भूमरे यांची औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. या पदावर वर्णी लागताच भूमरे यांनी दोन मोठे दावे केले असून, त्यांच्या या दाव्यांनंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तसेच अनेक चर्चांना उधाण आले आहे. औरंगाबादमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर असून, यावरून चांगलेच वातावरण तापलेले असून, येत्या वर्षभरात शहराचा पाणीप्रश्न तडीस नेणार असल्याचा दावा भूमरे यांनी केला आहे. पाणी प्रश्नावरून मध्यंतरीच्या काळात मविआ आणि भाजपमध्ये जोरदार आरोपप्रत्यारोप करण्यात येत होते. एवढेच नव्हे तर, खुद्द…
मोठा वाघोदा (ता. रावेर) : प्रतिनिधी महामार्गावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा बळी गेल्याची घटना शुक्रवारी दि.२३ रोजी घडली. वाघोदा बुद्रुक येथील नारायण साहेबराव धामोडे (वय ३३) हा रात्री काम संपवून घरी जाण्यासाठी निघाला होता. भारतीक बाबा भागाजवळ खखड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे युवकाचा तोल गेला व समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दोन चिमुकल्यांचे वडील व परिवारातील एकुलता एक कमवता सदस्य गेल्याने पत्नीवर व चिमुरड्यांना पडलेला आहे. संबंधित विभागाला अजून किती निष्पापांचा बळी घेतल्यानंतर जाग येईल, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.खड्डे बुजविण्याचे नावाखाली कच्चा मुरूम टाकला जातो व वेळ मारून नेली जाते. खड्ड्यांची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी,…

