Author: editor desk

धरणगाव : प्रतिनिधी  पहाटे झालेल्या भीषण अपघातात अमळनेरचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे. हा अपघात धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ झाला आहे. या संदर्भातील माहिती अशी की, अमळनेर येथील गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज पहाटे शासकीय कामासाठी नाशिकला जात होते. एमएच १९ डीव्ही ४१९९ क्रमांकाच्या शासकीय वाहनाने निघाले होते चौधरी. धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ त्यांच्या वाहनाने समोरच्या ट्रकला मागून धडक दिली. यात ड्रायव्हरच्या बाजूच्या सिटवर बसलेले एकनाथ चौधरी हे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. गटविकास अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी देखील अपघातस्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, शेवटचे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  दिल्लीतील श्रध्दा वालकर हत्याकांडाचं प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा देशाची राजधानी दिल्ली एकदा क्रूरतेच्या घटनेनं हादरलीय. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील कालका पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आलंय. शाळेतील एका सफाई कामगारावर विद्यार्थिनीसोबत हा अघोरी प्रकार घडवल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपी सफाई कामगाराला अटक केलीय. आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाची संपूर्ण माहिती समोर आलेली नाहीये. दिल्लीत याआधीही शाळेतील विद्यार्थिनींसोबत अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या वर्षी 6 ऑक्टोबरला दिल्लीच्या केंद्रीय विद्यालयात 11 वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला होता. शाळेतील दोन वरिष्ठ विद्यार्थ्यांवर…

Read More

अभिनेत्री विश्वसुंदरी मानुषी छिल्लर हि देशातील बड्या उद्योगपतीच्या प्रेमात पडल्याची बातमी सध्या व्हायरल होत आहे. त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. ती सध्या भलतीच चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसचं आहे. तिच्या प्रेमप्रकरणाची चाहुल आता नेटकऱ्यांना लागली आहे. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या पृथ्वीराजमध्ये मानुषीनं प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केलं होतं. तिची ती भूमिका चाहत्यांना आवडलीही होती. मात्र प्रेक्षकांना सम्राट पृथ्वीराज काही भावला नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला मोठा धक्का बसला. तीनशे कोटींपेक्षा अधिक बजेट असणाऱ्या पृथ्वीराजच्या अपयशानं अक्षयही नाराज झाला होता. यासगळ्यात मानुषी मात्र भाव खावून गेली होती. https://www.instagram.com/p/ClQGW9RoWf7/?utm_source=ig_embed&ig_rid=76dbf0c5-2e1f-4cb8-aac6-47b583e3ad97 मानुषी सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे नेहमीच नेटकऱ्यांच्या चर्चेचा…

Read More

बॉलिवूडसह टॉलिवूडमध्येही आपली विशेष छाप सोडणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना व अभिनेता विजय देवरकोंडा हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असतात. डिअर कॉम्रेड आणि गीता गोविंदम या चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर ही जोडी लोकप्रिय झाली. मात्र खऱ्या आयुष्यातही या दोघांमध्ये काहीतरी नक्कीच शिजतंय, अशी शंका चाहत्यांना आहे. आता तर सोशल मीडियावर थेट त्यांच्या लग्नाचाच फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. विजय आणि रश्मिकाने गुपचूप लग्न केलं की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या दोघांनी नेहमीच विविध मुलाखतींमध्ये अफेअरच्या चर्चांवर नकारात्मक उत्तर दिलं. आम्ही दोघं एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत, असंच दोघांनी म्हटलंय.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  ठाकरे गटाची आणि वंचित बहुजन आघाडी युती होण्याबाबत गेल्या काही दिवसापासून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. २० नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमानिमित्त उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावरही दिसून आले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीबाबतच्या युतीबाबत खासदार संजय राऊत यांनी सुचक विधान केलं आहे. तसेच देशात हुकूमशाही असून त्याविरोधात सर्वांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले. “युतीचा विषय हा केवळ मुंबई महापालिकेपुरता मर्यादित नाही. सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा देणं महत्त्वाचं आहे. देशात आणि राज्यात परिवर्तन घडवण्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना इतर राज्यातील विरोधीपक्ष, अशा सर्वांनी एकत्र येणं काळाची गरज आहे. महाराष्ट्रासाठी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या हत्येचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने कट रचल्याचा आलाय. त्यामुळे खळबळ उडालीय. मुंबई पोलिसांना व्हॉटसअॅप मेसेज आला. मोदींना यापूर्वीही ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. एकीकडे भारत जोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधी यांना धमकी देण्यात आल्याची बातमी नुकतीच आली होती. त्यानंतर आता पंतप्रधान मोदीही टार्गेटवर असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू केलाय. मुंबई पोलिसांना पाठलेल्या ऑडिओमेसेजमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने कट रचला आहे. त्यासाठी त्याने मुस्ताक अहमद आणि मुस्ताक या दोघांना पंतप्रधानांच्या हत्येची सुपारी दिलीय.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शिंदे गटातील मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात येवून त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी धरणगावात दाखल गुन्ह्यात युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना जळगाव न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. काही दिवसांपूर्वी धरणगावात ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा पार पडली. यात युवसेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी अतिशय आक्षेपार्ह शब्दांमध्ये पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या विरोधात टिका केली होती. यामुळे त्यांनी पालकमंत्र्यांचा अवमान केल्यासह गुजर समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून धरणगाव पोलीस स्थानकात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी बाळू जाधव यांनी धरणगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. यानुसार भादंवि कलम-२९५…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरची आज सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे आणि कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली आहे. ठाकरेंच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी या याचिकेतुन गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांनी केली आहे. ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी. आता त्यांच्याकडे जितकी संपत्ती आहे याचा हिशोब लागत नाही असा आरोप भिडे यांनी केला आहे. प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे नेमकं स्त्रोत काय? उद्धव ठाकरे…

Read More

अहमदाबाद : वृत्तसंस्था  देशातील गुजरातमध्ये निवडणुकीचे धामधूम सुरु आहे नुकतेच १ डिसेंबर व ५ डिसेंबर रोजी गुजरात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजराती कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे सरकारने हा निर्णय घेतला असून याबाबत शासननिर्णयही जारी करण्यात आला आहे. सर्व खासगी व शासकीय संस्थांना हा आदेश लागू असणार आहे. त्यानुसार या संस्थांना आपल्या गुजराती कर्मचाऱ्यांना 1 डिसेंबर व 5 डिसेंबररोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाने जारी केलेल्या जीआरनुसार, राज्यातील पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे जिल्ह्यांतील ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहे, अशा सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्यात यावा, यासाठी या कर्मचाऱ्यांना…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  बेळगावला महाराष्ट्रात सहभागी करुन घेण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. पण सर्व प्रयत्न आतापर्यंत निष्फळ ठरले आहेत. पण तरीही राज्य सरकार त्याच जोमाने बेळगाव महाराष्ट्रात सामील करुन घेण्यासाठी लढणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अॅक्शन मोडवर आले आहेत.दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना चँलेज दिले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने समिती गठीत केलीय. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ही सर्वपक्षीय समिती गठीत केलीय. तसेच, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या प्रश्नासंदर्भात पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांची लवकरच भेट घेणार आहेत. यावर बोलताना, संजय राऊत यांनी सीमाप्रश्नासंदर्भात पंतप्रधान यांच्याशी काय चर्चा करणार हे जनतेसमोर उघड…

Read More