धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव बाळासाहेबांची शिवसेना आणि भोणे ग्रुप ग्रामपंचायतच्यावतीने वाहतूक नियंत्रकांना निवेदन देण्यात आले. भोणे गावातील विद्यार्थी धरणगाव येथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या वेळेत बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे म्हणून भोणे ग्रामस्थांनी वाहतूक नियंत्रकांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की सकाळी ६ वाजता आणि १० वाजता व दुपारी आणि संध्याकाळी एस. टी.बस सुरू करण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे होणारे गैरसोय थांबेल या प्रसंगी सरपंच:- रतिलाल पाटील उपसरपंच:- निंबा पवार ज्येष्ठ शिवसैनिक देविदास पाटील शाखाप्रमुख समाधान पाटील दीपक पाटील भूषण पाटील सुनील पाटील प्रदीप पाटील गुलाब शिंदे सागर पाटील गजानन फुलपगार कमलबाई शिंदे अरुण पाटील तसेच…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात शिवसेनेतून बंडखोरी करून नव्याने स्थापन झालेल्या ठाकरे गटाची शिवसेना खरी की शिंदे गटाची शिवसेना खरी हा वाद अजूनही सुटलेला नाही. मात्र, दोन्ही गटाकडून एकमेकांना शह काटशह देण्याचं काम सुरू आहे. इकडे ठाकरे गटाने शिवाजी पार्कात दसरा मेळाव्याचं आयोजन करताच दुसरीकडे शिंदे गटाने बीकेसी मैदानावर तोडीस तोड दसरा मेळावा घेतला. एवढंच नव्हे तर ठाकरे गटाकडून होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला शिंदे गटाकडून जशास तसे आणि रोखठोक उत्तर दिलं जात आहे. आता तर दोन्ही गटाचे कार्यालयही समोरासमोरच असणार आहेत. शिंदे गट ठाकरे गटाच्या कार्यालयासमोरच आपलं कार्यालय थाटणार आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय काही दिवसातच सुरू होणार आहे. मुंबईतील…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चिखलफेक केल्यामुळे विद्यमान सरकारविरोधात प्रचंड संतापाची लाट आहे. यावरील लक्ष विचलित करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पुढे करण्याचं षडयंत्र रचण्यात आलं आहे. भाजपचे मुख्यमंत्री भाजपच्याच उपमुख्यमंत्र्यांविरोधात अशी भाषा करणं शक्य आहे का? ही सगळी स्क्रिप्ट आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मलाही भविष्य कळतं, पुढच्या दोन महिन्यांत त्यांच्या पत्रिकेत सत्तायोग नाही, असा टोलाही राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रावर हल्ला केलाय, मी याला युद्ध म्हणतो, दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सुरु केलाय, राज्यपाल…
पाचोरा : प्रतीनीधी पाचोरा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पाचोरा पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय मुलगी क्लासेसला जात येत असतांना २०२१ पासून ते आतापर्यंत नेहमी संशयित आरोपी प्रवीण गरुड(वय १९) याने मुलीला मी तुझ्यावर प्रेम करतो, अशी चिट्ठी लिहून देत तिच्या भावाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एरंडोल : प्रतिनिधी शहरातील शासकीय रेस्ट हाऊस चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास फोडून तब्बल ३ लाख २४ हजाराच्या दागिन्यासह रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी एरडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, एरंडोल शहरातील कासोदा रोडवर असलेल्या शासकीय रेस्ट हाऊसमध्ये दि २३ रोजी मध्यरात्री कुळाच्या घराचे कुळ तोडून अनोळखी चोरट्यांनी शासकीय रेस्ट हाऊसची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या निवासस्थानात घुसत घरातील २ लाख ३४ हजाराची सोने व चांदीचे दागिने व ९० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना दि २४ रोजी उघडकीस आल्यानंतर प्रताप मदन बारेला यांनी एरंडोल पोलीस स्थानक गाठत घरफोडीची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि गणेश अहिरे…
मुंबई : वृत्तसंस्था भारतीय जवानाचा आपण नेहमीच कौतुक करीत असतो मात्र अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने लष्कराबाबत एक ट्विट केले असून, तिच्यावर लष्कराचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून अभिनेत्री रिचा चढ्ढावर नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी सांगितले होते की, पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज आहे. भारतीय सेना कुठल्याही कारवाईसाठी पूर्णपणे तयार आहे. भारत सरकार जो आदेश देईल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. असं द्विवेदी म्हणाले होते. या विधानाचा संदर्भ देत रिचा चड्ढाने ट्विटरवर लिहिले की, ‘गलवान ही कह रहा है’. यानंतर भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘मक्कल निधी मय्यम’ या पक्षाचे संस्थापक आणि प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेन्नईतील श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये त्यांच्यावर बुधवार संध्याकाळपासून उपचार सुरु आहेत. त्यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्याचे समजते. कमल हासन हे नुकतेच हैदराबादला गेले होते. तिथे त्यांनी त्यांचे गुरू आणि दिग्गज दिग्दर्शक के विश्वनाथ यांची भेट घेतली. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिथल्या काही कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर ते बुधवारी दुपारी चेन्नईला परतले. मात्र संध्याकाळी बरे वाटत नसल्याने चेक-अपसाठी ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांना आज डिस्चार्ज…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सीमा प्रश्नी वाद आता चव्हाट्यावर आला असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यासह सोलापूरमधील काही गावांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात संतापाचं वातावरण पसरलं आहे. भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यानेच महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगितल्याने ठाकरे गटातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार संजय राऊत यांनी तर थेट बोम्मई यांना इशारा दिला आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा नाही, तर धमकी देतो. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. मी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा देत नाही. धमकी देतोय. तुमची बकबक बंद करा. हे घेऊ,…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे सरकार कधी हि कोसळू शकते असे विरोधाकडून आरोप होत असतानाच मुख्यमंत्री शिंदे खूप तणावात आल्यानंतर त्यांनी अचानक ज्योतिषाची भेट घेतल्याचीही चर्चा रंगली आहे. झालं असं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सपत्नीक शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर ते नाशिकच्या दिशेने निघाले.. मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील मिरगाव येथील एका ज्योतिष्याकडे हात दाखवल्याची चर्चा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच सुप्रिया सुळे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. श्रद्धा असावी, मात्र अंधश्रद्धा नसावी, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. शिर्डी येथून मुख्यमंत्र्यांचा ताफा हेलिपॅडच्या दिशेने जाईल, अशी शक्यता असतानाच सगळ्या गाड्या अचानक सिन्नर तालुक्याच्या दिशेने वळाल्या. वावी गावातील मिरगावच्या…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील नवीन नाका परिसरातून एकाची दुचाकी अनोळखी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील नवीन नाका हिरापूर रोड येथील एका विद्यालयाजवळून शैलेश किसन शिरसाठ (वय २७) यांची दुचाकी क्र.एम.एच.१८.बी.पी.५५०८ हि दुचाकी अनोळखी चोरट्याने लांबविल्याची घटना दि २२ रोजी रात्री घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना.भूषण पाटील हे करीत आहेत.

