Author: editor desk

चोपडा : प्रतिनिधी चोपडा – धरणगाव रस्त्यावर चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत १ ठार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चोपडा पोलिसात चारचाकी चालकविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत असे कि, दि १७ रोजी रात्रीच्या सुमारास जीतेद्र प्रताप पाटील(रा.एकलग्न) हा तरुण दुचाकीने जळगावकडे येत असतांना चोपडाकडून भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकी क्र.एमएच.१९.डी.व्ही.५२३१ हिने तरुणाच्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने तरून गभीर जखमी होत मयत झाला. यावेळी कुठलीही अपघाताची माहिती न देता चारचाकी चालक घटनास्थळाहून फरार होवून गेला या प्रकरणी विशाल लीलाधर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा पोलीस स्थानकात चारचाकी चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप राजपूत हे…

Read More

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ म्हणून आचार्य चाणक्य हे ओळखले जातात. त्यांची कूटनीती आजही तितक्याच प्रभावीपणे अंमलात आणली जाते. आचार्य चाणक्य म्हणतात की, जर तुम्हाला जीवनात चांगला काळ आणायचा असेल तर प्रथम तुम्हाला वाईट काळाशी लढावे लागेल. वाईट काळ माणसाची परीक्षा घेतो. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीला भविष्यात सुखाची किंमत कळते. आचार्य चाणक्य यांनी वाईट काळाशी लढण्यासाठी काही नीती सांगिल्या आहेत. ता नीतीचे योग्य रीतीने पाळले तर संकटकाळात हानी टाळणे शक्य आहे. वाईट काळात कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या याबद्दल जाणून घेऊया. संयम ठेवा भीती माणसाला कमकुवत बनवते आणि हळूहळू ती आपल्या जीवनावर वर्चस्व गाजवते. आचार्य चाणक्य म्हणतात की, आयुष्यात वाईट वेळ आल्यावर घाबरू…

Read More

पारोळा : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावाच्या शेत शिवारातील घरातून चोरी करीत ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील उंदीरखेडा येथील शेत शिवारातील ४१२ मधील एका घरातून दि २० रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शेतातील दुवारसिंग काशीराम पावरा (वय ३५) यांच्या घरातील लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश करीत घरातील ५० हजार रुपये रोकड व १५ हजार रुपयांची चांदीचा कमरेचा पट्टा चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय राजू जाधव हे करीत आहेत.

Read More

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये सर्वाधिक प्रसिद्ध मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. गेल्या दीड दशकांहून अधिक काळ या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. त्या मालिकेतील कित्येक पात्रं ही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. त्यातच बबिता फेम मुनमुन दत्ताला अपघात झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे. मुनमुन ही गेल्या काही दिवसांपासून युरोपच्या दौऱ्यावर आहे. त्यात जर्मनीमध्ये असताना तिला अपघात झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे. मुनमुनने इंस्टावरुन एक स्टोरी शेयर केली आहे. तिच्या पायाला दुखापत झाली आहे. तिनं चाहत्यांना काळजी न करु नका. आपण सुखरुप असल्याचे म्हटले आहे. मला दुखापत झाल्यानं दौरा अर्धवट सोडावा लागत असल्याचे मुनमुननं म्हटले आहे. मुनमुनची बातमी सोशल…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या” सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक” मुख्य परीक्षा 2020- या परीक्षेचा अंतिम निकाल दिनांक २१ रोजी जाहीर करण्यात आला. त्यानुसार एकूण 233 उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता अंतिम निवड करण्यात आली आहे. अमळनेर येथील निखिल ठाकूर याची सहायक मोटर वाहन निरीक्षक ( आरटीओ ) पदी निवड झाल्याबद्दल (आयपिस) आधिकरी विश्वास नागरे पाटील यांचा लिखित ग्रंथ मन मे हे विश्वास हा ग्रंथ भेट देण्यात आला. यात निखिल अनिल ठाकूर याची वरील पदाकरिता पहिल्याच प्रयत्नात निवड झाली असून त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय निखिल आपला परिवार तसेच त्याचे गुरुवर्य यांना प्रदान…

Read More

आपल्या बहारदार गायनानं श्रेयानं चाहत्यांना जिंकून घेणारी बॉलीवूडची प्रसिद्घ गायिका श्रेया घोषालची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ घेतले आहे. श्रेया ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. मात्र आता तिच्या त्या पोस्टनं लाखो चाहत्यांच्या काळजात धस्स झाले आहे. तिनचं केलेल्या खुलाशानंतर चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थनाही केली आहे. https://twitter.com/SonaSsg/status/1594307390567948288?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1594307390567948288%7Ctwgr%5E7eb57441b90a1414fc36a8c2810f3deaddd87a01%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fglobal%2F20-people-killed-and-at-least-300-injured-in-an-earthquake-in-indonesia-main-island-of-java-rak94 श्रेयाच्या पोस्टमध्ये काय आहे… श्रेयानं लिहिलं आहे की, गेल्या रात्री माझा ओरलँडोमध्ये नाईट कॉन्सर्ट होता. त्यानंतर अचानक माझ्या आवाजात बिघाड झाला. मला त्रास होऊ लागला. माझा आवाज हा त्या कॉन्सर्टनंतर गेलाच होता. त्यामुळे मी खूप घाबरुन देखील…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सहा लोकांचे संशयास्पदरित्या घरात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये आई-वडिल आणि चार मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सर्व मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले. कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याबाबत अद्याप कोणताही खुलासा होऊ शकला नाही. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत. प्रकाश गमेती आणि दुर्गा गमेती अशी मयत जोडप्याची नावे असून, त्यांच्या चार मुलांचाही मृत्यू झाला आहे. घटनास्थळी डॉग स्कॉड पण दाखल झाले असून, घरातील प्रत्येक वस्तू तपासण्यात येत आहे. प्रथमदर्शनी आर्थिक विवंचनेतून कुटुंबाने आत्महत्या केल्याचे दिसत आहे.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  देशातील गुजरातमध्ये निवडणुकीचे पडघम वाजायची सुरुवात झाली असून याठिकाणी भाजपसह कॉंग्रेस व आम आदमी पार्टीने कंबर कसली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. आज सुरेंद्रनगर येथील प्रचारसभेत त्यांनी आपल्या नेहमीच्या अंदाजात गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले – ‘मी तर जनतेचा सेवक आहे. माझी औकात काय?’ मिस्त्रींनी नुकतेच एक वादग्रस्त विधान करत मोदींना त्यांची औकात दाखवण्याची भाषा केली होती. पीएम मोदी म्हणाले, ”काँग्रेसचे नेते मोदींना औकात दाखवण्याची भाषा करतात. हा त्यांचा अहंकार आहे. तुम्ही राजघराण्यातील आहात. मी एका सर्वसामान्य कुटुंबातील आहे. माझी काहीच औकात नाही. तुम्ही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  २०१५ मध्ये नीतेश राणे यांनी सावरकरांच्या विरोधात ट्विट केले होते. आता भाजपमध्ये आल्यावर सावरकरांवरून बोलणारे शेंड्यावरून शहाणे झालेले बोलायला लागले की, असे नाही बोलायचे तसे नाही बोलायचे, भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नारायण राणेंच्या कणकवलीमधील घरी जात आंदोलन करावे, असे आव्हान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. ​​​​​​ सुषमा अंधारे म्हणाल्या की, तुम्ही सावरकरांचा अपमान करताय असे आता म्हणणारे राणे यांनी 2015 मध्ये सावरकरांनी माफी मागितली होती, असे ट्विट केले होते. त्यावर अंधारे म्हणाल्या की, भाजपने कणकणवलीमध्ये जात राणेंच्या घरात घुसून आंदोलन करावे आणि नीतेश राणेंना बाहेर काढत पालथा घालून तुडवावा. मग आम्ही मानू, असे अंधारेंनी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील शिंदे गट व ठाकरे गट कोणत्या न कोणत्या कारणाने समोरा समोर आल्यानंतर राडा होत आहे नुकतेच प्रभादेवी रेल्वे स्टेशन परिसरात ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आला. विकासकामांच्या उदघाटन करताना श्रेयवादाच्या मुद्यावरुन दोन्ही गट समोरासमोर आल्याचं कळतं. ठाकरे गटाकडून यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. या भागातील विकासकामांचं उद्घाटन शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते होणार होतं. परंतु यावेळी तिथे ठाकरे गटाकडून घोषणाबाजी करुन उद्घाटनाला विरोध करण्यात आला. यावेळी काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. एल्फिन्स्टन विभागातील मुरलीधर सामंत मार्ग, फिटवला रोड फुटपाथ याच्या नुतनीकरणाचं हाती घेण्यात आलं…

Read More