मुंबई : वृत्तसंस्था दिवाळीच्या दरम्यान आफताबचे कुटुंबीय मीरा रोज येथील 2 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये रहायला गेले. आफताबचे आई-वडील आधी कचरा टाकायला आल्यावर बाहेर दिसायचे. मात्र हल्ली ते दिसत नसल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. 2019 मध्ये मुंबईच्या एका कॉल सेंटरमध्ये श्रद्धा आणि आफताबची भेट झाली होती. त्यानंतर दोघे प्रेमात पडले. श्रद्धा वालकर ही महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील रहिवासी आहे. 18 मे 2022 रोजी दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्याची कबूली आफताबने दिली आहे. खून केल्यानंतर आफताबने तिच्या शरीराचे 35 तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले आणि त्यानंतर अनेक दिवस तो एक-एक तुकडा जंगलात फेकत होता. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावरून लिव्ह इन रिलेशनशिप नाते…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील वाघ नगर परीसरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने मुलीस काही तरी फूस लावीत पळवून नेल्याची घटना दि २० रोजी सकाळी घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी तालुका पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनी नयन पाटील हे करीत आहेत.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रविवारी रात्री बिहार राज्यातील वैशाली येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. दरम्यान या अपघातामध्ये लहान मुले आणि महिलांसह एकूण 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अपघातात मृत झालेले आणि जखमी झालेले लोक पिंपळाच्या झाडाखाली उभे राहून पूजा करत होते. तेवढ्यात एक ट्रक 120 च्या वेगाने आला आणि लोकांना चिरडून निघून गेला. दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासना घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या रुग्णवाहिकेतून मुलांचे मृतदेह आणि जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी…
नेहमीच सर्वाना ॲसिडिटीच्या समस्येमुळे त्रस्त असतात त्यावर नेमका उपाय आजही काहीना सापडलेला नाही. पोटात काही उलट-सुलट पदार्थ गेला नाही की लगेच गॅस, अपचन, आंबट ढेकर येणे असा त्रास दिवसभर होत राहतो. या समस्यांमुळे पोटदुखी , पोट जड होणे, चिडचिड होणे, अशा समस्याही उद्भवतात. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी बरेचसे लोक गॅसचा त्रास दूर करणारी औषधे, गोळ्या यांचे सेवन करण्यास सुरवात करतात. ॲसिडची समस्या अनेकदा उद्भवत असेल तर तुम्हाला गॅस्ट्रिक प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे वेदना होणे, जळजळ होणे असेही त्रासही होतात. अशा परिस्थितीत तुम्ही अधिक तळलेले पदार्थ तसेच मसालेदार पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. आपली जीवनशैली तसेच आहार-विहारात बदल केल्यास ॲसिडिटीच्या समस्येवरही मात…
तुळशी हि प्राचीन काळापासून आरोग्यासाठी महत्वाची वनस्पती म्हणून मानली जाते तर हिंदू धर्मात तुळस ही पूजनीय मानली जाते. लोक विधीवत तुळशीची पूजा करतात. आयुर्वेदातही तुळशीला विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही असतात. तुळशीमुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. दररोज तुळशीच्या 4 पानांचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. बद्धकोष्ठता दूर होते तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. पचनसंस्था निरोगी राहण्यासाठी तुम्ही दररोज तुळशीच्या पानांचे सेवनही करू शकता. हाडे मजबूत होतात तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशिअम आणि फॉलेट यासारखी पोषक तत्वे असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.…
औरंगाबाद : वृत्तसंस्था साहेब, मी बायकोला मारून आलोय, मला अटक करा,’ असे म्हणत आपतगाव ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याचा पती रविवारी दुपारी २ वाजता चिकलठाणा पाेलिस ठाण्यात हजर झाला. कडुबा भागाजी हजारे (४२) असे आरोपीचे नाव असून त्याने ठाण्यात येण्याच्या तासाभरापूर्वी पत्नी सुनीता (३८) यांचा शेतात गळा दाबून खून केला. चिकलठाणा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रविवारी दुपारी चिकलठाणा पोलिस ठाण्यात दैनंदिन कामे सुरू होते. पोलिस कर्मचारी काही स्थानिकांच्या तक्रारी ऐकत होते. तेवढ्यात कडुबा ठाण्यात आला. समोर बसलेल्या अधिकाऱ्याने काय काम आहे? असे विचारले. तेव्हा ‘साहेब, मी बायकोला मारून आलाेय, मला अटक करा,’ असे चेहऱ्यावर शांत…
पुणे : वृत्तसंस्था मुंबई-बंगळुरू बाह्य वळण महामार्गावर नवले पूल परिसरात वेगाने जात असलेल्या चालकाचे उतारावर नियंत्रण सुटल्याने ट्रकने ४८ वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात २० जण जखमी झाले. सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले. रविवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. आंध्र प्रदेशमधील मालवाहतूक करणारा एक ट्रक रविवारी रात्री साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले ब्रिज परिसरातील दरी पूल पार केल्यानंतर ट्रक नवले पुलाजवळील तीव्र उतारावर आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकने समोरून येणाऱ्या कार आणि रिक्षा यांना धडक दिली. हा ट्रक ४०० ते ५०० फूट गेला. वाहनांना धडकून थांबल्यानंतर चालक ट्रक सोडून पसार झाला. वाहनांत अनेक चालक अडकून पडले…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून बोचरी थंडी होती मात्र कालपासून उत्तर भारतातील हिमवृष्टी आणि उत्तरेकडून येणाऱ्या बोचऱ्या गार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडी वाढली असून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले आहे. महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या (१०.६) तुलनेत औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगावात तर पारा जास्तच खाली आला आहे. नाशिक जिल्ह्यात आेझर येथे रविवारी सर्वात कमी म्हणजे ६ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. हवामानतज्ज्ञांच्या मते पुढील १०-१२ दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. राज्यात यंदा पंधरा दिवस थंडीचे अगोदर आगमन झाले. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून किमान तापमानात घसरण होण्यास सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात अंशत: ढगाळ वातावरण तयार झाल्याने थंडी…
जळगाव : प्रतिनिधी भारताचे आराध्य दैवत व महाराष्ट्राची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी “छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहेत” आणि भाजप चे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला 5 वेळा माफीनामे लिहुन दिले” असे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे व आक्षेपार्ह , संतापजनक बेताल वक्तव्य केलेले आहे . या वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव तर्फे तिव्र आंदोलन करून निषेध करण्यात आला . आंदोलनादरम्यान भगवान सोनवणे यांनी प्रतिकात्मक स्वरूपात कोषारी यांची वेशभूषा करत डोक्यावरची काळी टोपी काढुन त्यातून कांदे बटाटे खाली पडल्यावर , कोषारी यांचे डोक्यात कांदे बटाटे भरलेले आहे…
औरंगाबाद : वृत्तसंस्था ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्या काही दिवसापासून राज्याचे लक्ष वेधून धरले आहे ते शिंदे गटाच्या आमदारावर त्यांच्या मतदार संघात जावून तुटून पडत आहे. त्यांनी नुकतेच राज्याचे कृषी अब्दुल सत्तार यांच्या होमपिचवर जात तुफान फटकेबाजी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फुटीर आमदारांना घेऊन कामाख्या मंदिरात दर्शनाला गेले होते. त्यावेळी अब्दुल सत्तार कुठे होते? असा संतप्त सवाल करतानाच अब्दुल भाई तुम्ही घरवालीचे तरी आहात का? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला. सिल्लोडमध्ये महाप्रबोधन यात्रेला संबोधित करताना सुषमा अंधारे यांनी हा हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे आमच्या अब्दुल सत्तार भाईला गुवाहाटीला घेऊन गेले. तुम्ही कामाख्या मंदिरात गेला…

