औरंगाबाद : वृत्तसंस्था ‘मी मारायला पण घाबरत नाही आणि मरायला पण घाबरत नाही … मग कोण पण समोर येऊ दे..’ असे रात्री सोशल मीडियावर स्टेटस ठेवणाऱ्या पाटोदा तालुक्यातील जाधव वस्तीवरील दूध विक्रेेता तरुण कृष्णा दिलीप जाधव याचा तालुक्यातील निरगुडी-लिंबादेवी पुलाच्या जवळ बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास संशयास्पदरीत्या मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी त्याच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असून ते पोलिसांना अहवाल देणार आहेत. अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे गूढ उकलणार आहे. पाटोदा तालुक्यातील जाधव वस्तीवरील कृष्णा जाधव हा दररोज सकाळी घरचे दूध लिंबादेवी फाटा येथे…
Author: editor desk
सध्या देशासह राज्यातील विविध भागात डेंग्यूचा आजार मोठ्या झपाट्याने पसरत असून त्याचे रुग्ण वाढत चालले आहेत. डेंग्यूचा ताप झपाट्याने पसरतो. असा ताप आल्यास रुग्णाला चांगली विश्रांती घेण्यास सांगितले जाते. तसेच लवकर बरे वाटावे व डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी भरपूर द्रव पदार्थ सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अशी अनेक सुपरफ्रुट्स आहेत, जी खाल्याने रुग्णाला या आजाराशी लढण्याची ताकद मिळते, तसेच रिकव्हरीचा वेगही वाढतो. 1) किवी डेंग्यू झालेला असताना किवी खाल्याने चांगला परिणाम होतो. यामध्ये असलेले कॉपर, हे निरोगी लाल रक्तपेशींच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन देते आणि संसर्गापासून संरक्षण करते. किवी हे फळ पोटॅशिअम, व्हिटॅमिन -ई आणि व्हिटॅमिन -ए यांचा समृद्ध स्त्रोत आहे. जे शरीराचे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था तुम्ही आतापर्यत भरपूर बातम्या बघितल्या असतील कि मुलाने मुलीची छेड काढली किवा विनयभंग केला पण हि बातमी वाचून तुम्हाला नक्की धक्का बसेल. पंजाबमधील एक अपहरण आणि लैंगिक शोषणाची एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सगळं पंजाब हादरले आहे. जालंधरमधील एका लेदरच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या एका व्यक्तीने असा दावा केला आहे की, कारमधून जाणाऱ्या चार मुलींनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला दारू पाजवून त्याच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार केला असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याच्यावर मुलींनी बलात्कार केला असला तरी त्या व्यक्तीने अजून पोलिसात तक्रार दाखल केली नाही. या घटनेतील ज्या व्यक्तीवर बलात्कार झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्या…
धरणगाव : प्रतिनिधी कब चौ. उमावि जळगाव व एरंगेल विभाग किडा समिती अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा (मुले व मुली) कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे २० रोजी संपन्न झाली. यात एरंडोल विभागातील विविध महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला सदर स्पर्धत विजयी संघ / महाविद्यालय प्रथम क्रमांक कला वाणिज्य विज्ञान महाविदयालय धरणगाव (मुले संघ) व उपविजेता किसान महाविदयालय पारोळा तृतीय त्रिमूर्ती फार्मसी महाविद्यालय पाळधी तसेच कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव मुली संघ विजयी तर कै.म.धु.पाटील कला महाविद्यालय मारवड उपविजयी सदर स्पर्धेच्या उद्घाटनास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.मेजर, मेजर डॉ. ए. डी. वळवीसर उद्घाटक म्हणून लाभले. तर प्रमुख पाहुणे म्हणून एरंडोल क्रिडा विभागाचे सचिव प्रा.डॉ.देवदत्त पाटील…
जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद नगरपालिका स्थापन झाल्यापासून नगरपालिकेत कुठलेही नगरसेवक नसल्याने प्रशासक असून नशिराबाद मधील मालमत्ता हस्तांतरण करतांना नागरिकांनी खरेदी केलेल्या मालमत्तेवर १ टक्के रक्कम नगरपरिषदेत भरण्यासाठी जी सक्ती केली जात आहे ती एकदम चुकीची असल्याबाबत नशिराबादचे माजी सरपंच पकंज महाजन यांनी नशिराबादचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे कि, नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर होवून गेले कित्येक महिने झालेली असली तरी निवडणूक न झाल्याने संचालक मंडळ अजुनपर्यंत स्थापन झालेले नाही. अश्यात प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या यंत्रना पूर्ण करण्याचे काम सुरु आहे, ज्यामध्ये अनेक बाबी नागरिकांसाठी जाचक व गैरसोयीच्या सिध्द होत आहे. प्रशासकीय यंत्रणा अपूर्ण असल्याने व निर्णय…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजप व ठाकरे गट फक्त एकमेकावर टीका करण्यासाठी संधी शोधत असतोय. त्यातच आता शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी थेट राणे कुटुंबावर निशाणा साधलाय. शिवरायांनाही स्वराज्य निर्मितीसाठी संघर्ष करावा लागला होता. राज्यपालांनी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. तर, राज्य तोडण्याचं काम भाजपानं केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्ता जाणार हे अगोदरच माहिती होतं. मात्र, आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत. राणे कुटुंबीयांना सत्तेचा माज आला आहे, अशी टीका नाईक यांनी राणे कुटुंबावर केलीय. ते कणकवलीतील श्रीधर नाईक चौक इथं शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेअंतर्गर जाहीर सभेत बोलत…
सध्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या आई होण्याचा आनंद घेत आहे. आपल्य लाडक्या मुलीसोबत वेळ घालवण्याची एकही संधी ती सोडत नाही. ती अनेकदा तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससोबत फोटो शेअर करत असते. मात्र या फोटोत ती तिचा चेहरा स्पष्ट दिसू देत नाही. त्यामूळे काही वेळा तिचे फॅन्स तिच्यावर नाराजही होतात. पण आज काही वेगळ चित्र पाहायला मिळतयं. प्रिंयकावर आणि तिच्या लेकीवर प्रेमाचा वर्षाव होत आहे. त्याचे कारणही तितकेच खास आहे. प्रियंकाने तिच्या चाहत्याची सकाळ गोड करण्यासाठी मालतीचा नवीन फोटो पोस्ट केलायं. बुधवारी पहाटे प्रियांकान इंस्टाग्राम स्टोरीवर मालती मेरीचा झोपलेला फोटो शेअर केलाय. याफोटोत, मालती मेरी चोप्रा जोनास बेबी स्ट्रॉलरच्या…
मुंबई : वृत्तसंस्था बेळगाव सीमाप्रश्न अजून सुटलेला नसताना कर्नाटक राज्य आता कोल्हापूरच्या पुढे जाऊन सांगली जिल्ह्यातील तालुक्यावर दावा करत आहेत. तरीही शिंदे सरकार गप्प आहे. हे सरकार लवकर गेले नाही तर महाराष्ट्राचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मांडले आहे. संजय राऊत म्हणाले, कुणाला महाराष्ट्रातून मुंबई तोडायची आहे, कुणाला गाव, जिल्हे तोडायचे आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र कुरतडण्याचे काम सुरू आहे. तरीदेखील आता आमचे मुख्यमंत्री त्यांच्या 50 आमदारांसह गुवाहाटीला जात आहे. ते गुवाहाटीला गेल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना महाराष्ट्राचा काही भाग मागितला नाही म्हणजे मिळवल, असा टोला राऊतांनी लगावला. संजय राऊत म्हणाले, शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य…
मुंबई : वृत्तसंस्था देशातील इंधन दरवाढ दिवसेदिवस होतच आहे तर दुसरीकडे राज्यातील काही भागात पेट्रोल डिझेलचे दर सुद्धा कमी अधिक प्रमाणात होत आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. शहर पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर) मुंबई शहर …
जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा परिसरातील एका भागातून २१ हजार ५०० रुपये किमतीचे दागिन्यासह इतर वस्तूंची चोरी उघड झाली आहे. या प्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील पिंप्राळा परीसातील हुडको येथील रहिवासी आशा रतनलाल जैन(वय ६०) या मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात, दि ९ ते १३ रोजी दरम्यान अनोळखी इसमाने जैन यांच्या मालकीच्या १० ग्राम सोन्याची चैन, १ हजार रुपये किमतीचे सिलेडर यासह स्टीलची शेगडी घेत चोरी केली आहे. या प्रकरणी जैन यांनी रामानंद पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संजय सपकाळे हे करीत आहेत.

