धरणगाव : प्रतिनिधी पथराड खुर्द येथे सोमवारी सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी सुनंदाबाई दिनकर निकुंभ यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. ए. पाटील यांनी काम पाहिले. माजी सरपंच सुनीताबाई निकुंभ यांनी २० महिने सरपंचपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नूतन सरपंचपदी सुनंदाबाई दिनकर निकुंभ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी सरपंच सुनीताबाई प्रवीण निकुंभ, माजी उपसरपंच मीराबाई पाटील, नवीन उपसरपंच सिंधुबाई शिवाजी निकुंभ तसेच ग्रामपंचायत सदस्य मंजुळाबाई श्रीकांत चव्हाण, गजानन बन्सीलाल पाटील, सावित्रीबाई भीमा सोनवणे उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी पी. ए. पाटील, तलाठी कांचन वाणी, ग्रामसेवक…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील मूक व बहिरी युवतीची तीन अनोळखी इसमांनी तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मेहूणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात दि ४ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील एक २५ वर्षीय युवती हि पाण्याच्या टाकीजवळ असता यावेळी ३ अनोळखी इसम दुचाकीवर येत या युवतीच्या डोळ्यावर मारहाण करीत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली, तेथून या युवतीला धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. यावेळी हि घटना घडली असल्याचे लक्षात आले त्यानंतर मेहुणबारे पोलिसात अत्याचाराचा गुन्हा ३ अनोळखी इसमावर दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील समता नगरातील तरुणाने महाबळ परिसरातील त्र्यंबकनगरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना 4 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनूसार कांतीलाल मोहन पवार (वय 28) रा. समतानगर हा आई, पत्नी व तीन वर्षाचा मुलगा यांच्यासह वास्तव्याला आहे. हात मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान मंगळवार 6 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता आईसोबत कामावरून येत असताना दुकानावर जोतो असे आईला सांगून गेला. त्यानंतर महाबळ रस्त्यावरील त्र्यंबकनगरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर जावून तेथून त्याने उडी घेत आत्महत्या केली. या…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी नदीवर जात असतांना रस्त्यात थांबवून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, पाचोरा तालूक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी दि ५ रोजी सकाळच्या सुमारास नदीवर कपडे धुण्यासाठी रस्त्याने जात असतांना त्याठिकाणी अल्पवयीन मुलगा दुचाकी घेवून आला व त्याने मुलीस थांबवून तु इतकी काय भाव खाती, तु मला खूप आवडते. तु घरी जावून सांगू नको म्हणत व जर तु घरी काही सांगितले तर मी तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल असे म्हणत मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली त्यामुळे अल्पवयीन…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे आता राज्यातील पुण्यात पडसाद उमटल्याचे चित्र पाहायला मिळाले असतांना अजून वातावरण खराब न होता निर्णय घेणे गरजेचे असल्याचेहि काही नेते सांगत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना गंभीर इशारा दिला आहे. महाराष्ट्राचे तुकडे होणार असतील तर सर्वकाही राख होईल, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. चैत्यभूमी इथं महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले असताना ते मीडियाशी बोलत होते. आव्हाड म्हणाले, “जर तुम्ही आमच्या बस फोडाल तर आम्ही तुमच्या बस फोडू शकत नाही का? आम्ही हातात बांगड्या घातल्या आहेत असं समजू नका. संपूर्ण कर्नाटकात जर मराठी माणसांचं प्रमाण पाहिलं…
पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्न पुन्हा राज्यात पेटला असून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सीमाप्रश्नावरुन सुरु असलेल्या शाब्दिक वादाने आता हिंसक वळण घेतले आहे. कर्नाटक सरकारने सोमवारी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात पाऊल ठेवण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर मंगळवारी कन्नड वेदिका रक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव-हिरेबागवाडी टोलनाक्याजवळ महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक, शाईफेक केली आहे. या घटनेने सीमावाद आणखीच चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कन्नड वेदिका रक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी जोरदार आंदोलनही केले. त्याचदरम्यान बेळगावातील राडाचे पुण्यात पडसाद उमटू लागले आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात जोरदार राडा देखील करण्यात आला आहे. कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवले. पोलिसांनी…
धरणगाव : प्रतिनिधी ग्रामपातळीवर विकास कामांचा विचार करता केंद्र व राज्य शानच्या योजनांची प्रत्यक्ष अमलबजावणी ग्रामपंचायत करत असते. ग्रामपंचायत ही विकासाच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा दुवा असून गावाचा विकास हा गाव भूमिकेवर अवलंबून असतो. यासाठी गावाचा अभिमान बाळगून काम करणाऱ्यांच्या पाठीशी राहून एकजुटीने गावाचा सर्वांगीण विकास साध्य करावा असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. नागरिकांसाठी रस्ते, वीज व पाणी देण्याच्या कामांना गती दिली असून अंगात मंत्री पद येऊ दिले नाही. असेही ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले. ते तालुक्यातील अनोरे येथे ग्रामपंचायत कार्यालय व पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते.* अशी असेल पाणी पुरवठा योजना…
सोलापूर : वृत्तसंस्था दोन दिवसा आधीच राज्यातील एका विवाह सोहळा मोठा चर्चेत आला होता. दोन नवरी व एक नवरदेव असा विवाह सोहळ्याचे व्हिडीओ राज्यात प्रंचड व्हायरल झाले होते. पण त्यानंतर नवरदेवावर गुन्हा दाखल झाला होता आता नवरदेवाची चौकशी झाली असता मोठी माहिती समोर आल्याने वधू पक्षाने कपाळाला हात मारला आहे. मुंबईच्या जुळ्या बहिणींशी या तरुणाने लग्न केलं आणि अडचणीत सापडला. महिला आयोगाने चौकशीचे आदेशही दिले. मात्र आता या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. पोलीस चौकशीत या तरुणाचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे मुलीकडच्यांचेही धाबे दणाणले असणार. दोन जुळ्या बहिणींसोबत संसार थाटण्याची स्वप्नं पाहणाऱ्या अतुल अवताडेचं आधीच एक लग्न…
चोपडा : प्रतिनिधी येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी शिक्षण मंडळ परिवार आणि रक्तपेढी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कै.मा.ना.अक्कासो सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षणमंत्री,महाराष्ट्र राज्य) यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘भव्य रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उदघाटन महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिराप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य अधिकारी सौ.रक्षिता प्रसाद पाटील, सौ.माधवी अनिल वानखेडे, सौ.अलका नंदकिशोर पाटील, सौ.सुरेखा माधवराव पाटील, सौ.लीना विपुल छाजेड, सौ.नूतन दिलीप पाटील, सौ.संगीता संतोष अहिरे, मेमोसा हायस्कूल चोपडाच्या सेक्रेटरी सौ.नीलम स्टीफन सपकाळे, सौ.संध्या संदेश जैन, रजिमाबी आरिफ शेख,…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एकाचे लग्न लावून देण्यासाठी बेळगाव येथील एका इसमाने शहरातील व्यक्तीकडून तब्बल लाखो रुपये उकड्ल्याची घटना उघडकीस आली आहे, या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील ४६ वर्षीय इसम शहरात फरसाण विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. दि २१ एप्रिल २०२२ रोजी संशयित आरोपी प्रकाश सोनी रा.बेळगाव हा त्यांच्या फरसाणच्या दुकानावर येत याने फिर्यादी व्यक्तीचे विवाह करून देण्याचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी रोख व फोनपे च्या माध्यमातून घेत २ लाख ६१ हजार रुपये घेतले त्यानंतर त्या संशयिताने त्यांचे लग्न सिधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील ३३ वर्षीय महिलेशी लावून दिले पण ती…

